bg_image

GS 2

संसदीय प्रणाली संबंधी पुढील विधाने विचारात घ्या. व त्यापैकी चुकीचे विधान निवडा.

राज्य विधिमंडळातील सामान्य विधेयकाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान/ने योग्य आहे?(अ) विधेयक संमत करण्याबाबत राज्य विधिमंडळाच्या दोन्ही गृहात कोंडी निर्माण झाल्यास राज्य विधिमंडळाच्या दोन्ही गृहाच्या संयुक्त बैठकीची तरतूद आहे.(ब) सामान्य विधेयक हे फक्त विधान सभेतच सादर करता येते विधानपरिषदेत नाही.

पुढीलपैकी योग्य विधान ओळखा.(अ) संसदेला सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार आणि अधिकारक्षेत्र कमी करण्याचा किंवा वाढविण्याचा अधिकार नाही.(ब) सर्वोच्च न्यायालय ही राज्यघटनेचा अर्थ लावणारी आणि तिचे संरक्षण करणारी अंतिम संस्था आहे.(क) उच्च न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेले खटले काढून घेऊन त्यावर स्वतः निर्णय देण्याचा सर्वोच्च न्यायालयाला अधिकार आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांसंबंधी पुढीलपैकी अयोग्य विधान ओळखा.

1983 मध्ये केंद्र सरकारने केंद्र-राज्य संबंधाबाबत सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश आर. एस. सरकरिया यांच्या अध्यक्षतेखाली आयोग नेमला. या सरकारीया आयोगासंबंधी पुढील विधाने विचारात घ्या.(अ) हा त्रिसदस्यीय आयोग असून यात बी. शिवरामन आणि एस. आर. सेन या इतर दोन सदस्यांचा समावेश होता.(ब) आयोगाने ऑक्टोबर 1987 मध्ये अंतिम अहवाल सादर केला आणि त्याचा अधिकृतरीत्या सारांश 1988 मध्ये प्रसिद्ध करण्यात आला.(क) केंद्राचे अधिकार कमी करावेत ही मागणी आयोगाने केली.(ड) राज्यपालांच्या नियुक्तीसाठी मुख्यमंत्र्यांची विचारविनिमय करण्याची प्रक्रिया घटनेतच मांडावी ही महत्त्वाची शिफारस या आयोगाने केली.(इ) राष्ट्रपती च्या महाभियोगाची या प्रक्रियेमध्ये आवश्यक ते फेरफार करून ती प्रक्रिया राज्यपालाच्या महाभियोग आला लागू करावी हीदेखील या आयोगाची शिफारस होती.

वित्त आयोगासंबंधी पुढीलपैकी योग्य विधाने ओळखा.(अ) वित्त आयोगाची स्थापना दर पाच वर्षांनी राष्ट्रपतींनी मार्फत केली जाते.(ब) राज्यघटनेच्या कलम 280 नुसार या अर्धन्यायिक संस्थेची तरतूद केली आहे.(क) सध्याच्या चौदाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष एन के सिंग हे आहेत.

संघराज्य प्रणाली संबंधी विविध तत्वज्ञ व त्यांचे मत यांच्या योग्य जोड्या जुळवा.(अ) वाटाघाटीचे संघराज्य (i) पॉल ॲपलबॉय(ब) एकमेव द्वितीय (ii) मॉरिस जोन्स(क) बहुअंशी संघराज्यीय (iii) अलेकझांड्रोवीच(ड) एकात्मिकतेकडे वाढता कल (iv) के संथाणाम (अ) (ब) (क) (ड)

विभागीय परिषद यांसंबंधी पुढीलपैकी योग्य विधान ओळखा.

पुढीलपैकी कोणत्या बाबतीत विधानपरिषद विधानसभेबरोबर समानतेचे अधिकार उपभोगते? (अ) साधे व धनविधेयक मांडण्याबाबत (ब) राज्य लोकसेवा आयोगाच्या अधिकारक्षेत्रात वाढ करण्याबाबत (क) घटनादुरुस्ती विधेयकाला संमती देण्याबाबत

अविश्वासाच्या प्रस्तावासंबंधी पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे?

पुढीलपैकी कोणत्या परिस्थितीमध्ये राष्ट्रपतीपद रिक्त झाल्यास नवीन राष्ट्रपतींची निवड होईपर्यंत उपराष्ट्रपती प्रभारी राष्ट्रपती म्हणून काम पाहतात?(अ) राष्ट्रपतींचा पाच वर्षांचा कार्यकाल संपल्यावर (ब) राष्ट्रपती अनुपस्थित असल्यावर(क) महाभियोग चालून राष्ट्रपतींना पदच्युत केल्यावर(ड) राष्ट्रपतींचा मृत्यू झाल्यावर(इ) राष्ट्रपतींनी राजीनामा दिल्यावर

अयोग्य नसलेली विधाने निवडा. (अ) कलम 280 नुसार राष्ट्रपती वित्त आयोगाची स्थापना दर पाच वर्षांनी करतात. (ब) वित्त आयोग ही अर्थ-न्यायिक संख्या आहे. (क) कलम 282 नुसार देण्यात येणाऱ्या सार्वजनिक उद्दिष्टांसाठीचे अनुदानांचे तत्त्वे वित्त आयोग ठरविते. (ड) पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष K. C निओगी होते तर दुसऱ्या वित्त आयोगाचे अध्यक्ष महावीर त्यागी हे होते.

पुढील पैकी चुकीचे विधान ओळखा.

राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळण्याचे निकषांपैकी खालील कोणते विधान योग्य नाही?

लोकपाल व लोकायुक्त यांच्यासंबंधी पुढील विधाने विचारात घ्या.(अ) लोकपाल ही भ्रष्टाचाराविरुद्ध केंद्रातील यंत्रणा तर लोकायुक्त ही भ्रष्टाचाराविरोधातील राज्यातील यंत्रणा आहे.(ब) सध्या 27 घटक राज्यांमध्ये लोकायुक्त हे पद आहे.(क) पिनाकी चंद्र घोष हे भारताचे पहिले लोकपाल आहेत.

(अ) आर्थिक वर्षाच्या काही कालावधीसाठी अंदाजे खर्चापैकी काही रक्कम आगाऊ देण्याचे अधिकार संसदेस आहेत, त्यास पूरक अनुदान म्हणतात. (ब) यात साधारणपणे दोन महिन्यांसाठी एकूण अंदाजित खर्चाच्या एक-षष्ठांश निधी संमत केला जातो. वरीलपैकी योग्य विधान/विधाने निवडा.

खालीलपैकी कोणत्या समितीला पंचायतराज पूर्नविलोकन समिती म्हणून ओळखले जाते?

खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. (अ) पर्यावरण संरक्षण अधिनियमाची अंमलबजावणी 19 नोव्हेंबर 1986 पासून सुरू झाली. (ब) पर्यावरण संरक्षण अधिनियम, 1986 च्या कलम 5 (A) अन्वये राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाची (NGT) स्थापना 2010 मध्ये करण्यात आली.

पुढीलपैकी योग्य विधान ओळखा.(अ) राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना 31 जानेवारी 1992 मध्ये झाली.(ब) पश्चिम बंगाल हे महिला आयोगाची स्थापना करणारे पहिले राज्य आहे.(क) रेखा शर्मा या राष्ट्रीय महिला आयोगाच्या सध्याच्या अध्यक्ष आहेत.

भारताचे राष्ट्रपती यांच्या संदर्भात पुढीलपैकी योग्य विधान ओळखा.(अ) राष्ट्रपतींच्या निवडणुकी संबंधी सर्व शंका व विभागांची चौकशी सर्वोच्च न्यायालय करते व सर्वोच्च न्यायालयाचा यावरील निर्णय अंतिम असतो.(ब) राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी नामांकन भरणाऱ्या उमेदवारांचे नाव कमीत कमी 100 मतदारांनी प्रस्तावित केले पाहिजे आणि किमान 50 मतदारांनी त्यांच्या नावाचा अनुमोदन दिले पाहिजे.(क) निर्वाचन मंडळ अपूर्ण होते या कारणावरून राष्ट्रपतींच्या निवडणुकीला आव्हान देता येत नाही.

राज्याच्या महाधिवक्त्याबाबत योग्य विधाने निवडा. (अ) महाधिवक्त्याचा कार्यकाल 5 वर्षे किंवा 62 वय इतका आहे. (ब) त्याच्या पदच्युतीबाबत राज्यविधिमंडळाचा ठराव राज्यपालांवर बंधनकारक असतो. (क) ज्यावेळी मंत्रिमंडळ राजीनामा देते किंवा दुसरे सरकार येते तेव्हा महाधिवक्त्याच्या पदास कोणतीही बाधा नसते. (ड) महाधिवक्ता पदावर नियुक्तीसाठी त्या व्यक्तीने न्यायीक पदावर 7 वर्षे काम केलेले असले पाहिजे.

(अ) पंतप्रधानांच्या निवडीसाठी आणि नियुक्तीसाठी राज्यघटनेमध्ये विशिष्ट प्रक्रिया सांगितलेली नाही.(ब) पंतप्रधानपदी नियुक्ती झाल्यानंतर सहा महिन्याच्या कालावधीत गृहांमध्ये विश्वास दर्शक ठराव संमत करून घेणे बंधनकारक असते.वरीलपैकी योग्य विधान/ने ओळखा.

भारतीय राज्यघटनेत एकूण किती प्रकारच्या आणिबाणीचा उल्लेख आढळतो?

भारताच्या महान्यायवादी यासंबंधी पुढीलपैकी अयोग्य विधान ओळखा.

मूलभूत हक्कांच्या संबंधी पुढील विधाने विचारात घ्या व त्यापैकी अयोग्य विधाने ओळखा.(अ) राज्यघटनेच्या भाग 3 मध्ये मूलभूत हक्कांचा समावेश असून अमेरिकेच्या राज्य घटनेपासून मूलभूत हक्कांची प्रेरणा घेतली आहे.(ब) सामाजिक व आर्थिक लोकशाहीच्या आदर्शांना चालना देणे हा मूलभूत हक्कांचा उद्देश आहे.(क) राज्यघटना हा देशाचा मूलभूत कायदा असल्याने या कायद्यान्वये काही हक्कांना संरक्षण व हमी दिली असल्याने त्यांना मूलभूत हक्क असे म्हटले जाते.(ड) मूलभूत हक्क फक्त नागरिकांसाठी असून ते अनिर्बंध नाहीत.

न्यायाधिकरण यांसंबंधी पुढील विधाने विचारात घ्या आणि अचूक पर्याय ओळखा.(अ) प्रशासकीय न्यायाधिकरणे नैसर्गिक तत्त्वांनुसार कार्य करतात.(ब) शासकीय सेवांसंबंधी विवादांवर निर्णय देण्यासाठी सुरुवातीलाच घटनाकारांनी याची तरतूद करून ठेवलेली आहे.

प्रतिपादन (a): सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्राला बाधा न आणता संसद इतर न्यायालयांना सर्व प्रकारचे आदेश व निर्देश देण्याचा अधिकार देऊ शकते मात्र इतर न्यायालयामध्ये उच्च न्यायालयांचा समावेश होत नाही.कारण (b): कलम 226 नुसार असे अधिकार उच्च न्यायालयांना दिलेले आहेत.

(अ) राष्ट्रीय मानवी हक्क आयोग ही बिगर घटनात्मक वैधानिक संस्था आहे.(ब) मानवी हक्कांचे उल्लंघन झाल्यास एक वर्षाच्या आत आयोग अशा घटनेचा तपास करू शकतो.(क) हा आयोग मानवी हक्कांचे उल्लंघन करणाऱ्या अपराधी व्यक्तीला शिक्षा करू शकतो किंवा पीडिताला अर्थ सहाय्य करू शकतो.वरील पैकी योग्य विधाने निवडा.

संसदीय गटासंबंधी पुढीलपैकी योग्य विधान ओळखा.

योग्य विधाने निवडा. (अ) 1965 च्या कायद्याने 1966 ला 'भारतीय वृत्तपत्र परिषद' स्थापन झाली. (ब) ही एक स्वायत्त व वैयक्तिक संस्था आहे. (क) 1979 च्या पुनर्रचनेनुसार परिषदेत एक अध्यक्ष आणि 28 सदस्य अशी रचना झाली. (ड) आणिबाणी दरम्यान सुद्धा ही परिषद कार्यरत होती.

योग्य विधान ओळखा. (अ) भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना 26 नोव्हेंबर 1949 रोजी झाली. (ब) हा आयोग घटनेनुसार एक मुख्य निवडणूक आयुक्त व इतर तीन निवडणूक आयुक्तांनी बनलेला आहे.

पुढीलपैकी योग्य विधान/ने ओळखा.(अ) 26 जानेवारी 1950 रोजी भारत हे सार्वभौम प्रजासत्ताक घोषित झाले व ते ब्रिटिश क्षेत्र राहिले नाही.(ब) पाकिस्तान 1956 पर्यंत ब्रिटिश क्षेत्र होते.

1928 मध्ये पंडित मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या नेहरू समितीमध्ये पुढीलपैकी कोणाचा समावेश नव्हता?(अ) पंडित जवाहरलाल नेहरू (ब) सुभाष चंद्र बोस(क) महात्मा गांधी (ड) शोएब कुरेशी(इ) तेज बहादुर सप्रू (फ) मंगल सिंग(ग) सत्येंद्रनाथ बोस

(अ) जेथे राज्य सूची आणि समवर्ती सूची मध्ये विवाद असेल तेथे राज्यसूची श्रेष्ठ मानली जाईल.(ब) राज्य सूची आणि केंद्र सूची मध्ये जेथे विवाद असेल तर केंद्र सूची श्रेष्ठ मानली जाईल.(क) 1935 प्रमाणे सध्या देखील राज्यघटनेत तीन सूची आहेत मात्र उर्वरित अधिकार केंद्राकडेही कॅनडाची संकल्पना भारताने स्वीकारली आहे.वरीलपैकी अयोग्य विधान/ने ओळखा.

समूह व गटविरोधी लेखन, सणसणाटी लिखाण, बातमीच्या सादरीकरणातील पूर्वग्रहदुषितपणा आणि टिप्पणी करताना बेजबाबदारपणा आणि व्यक्तीगत आरोप या सर्व पार्श्वभूमीवर कोणत्या वर्षी पहिला प्रेस आयोग अस्तित्वात आला?

1951-52 साली पार पडलेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकांबाबत अयोग्य विधान निवडा.

परिशिष्ट 3 मध्ये दिलेल्या शपथ आणि वचन नाम्याच्या प्रारूपामध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश नाही?

पंचायतसमितीच्या सर्वसाधारण सभेचे कामकाज सुरू होण्यासाठी किमान ____________ सदस्य उपस्थित असणे आवश्यक असते.

राष्ट्रीय न्यायिक सेवा प्राधिकरण/नालसा (national legal service authority) संदर्भात पुढील विधानापैकी चुकीचे विधान ओळखा.

खालीलपैकी अचूक नसलेले विधान निवडा.

निंदाव्यंजक प्रस्तावासंबंधी योग्य विधाने ओळखा. (अ) हा प्रस्ताव लोकसभेत मांडण्याची कारणे देणे आवश्यक असते. (ब) हा प्रस्ताव एका मंत्र्याविरुद्ध, मंत्रीगटाविरुद्ध किंवा संपूर्ण मंत्रीमंडळाविरुद्ध मांडता येतो. (क) हा प्रस्ताव लोकसभेत मंजूर झाल्यास मंत्रीमंडळाने राजीनामा देण्याची आवश्यकता असते. (ड) विशिष्ट्ये धोरणे व कृती यासाठी मंत्रीमंडळावर दोषारोप करण्यासाठी हा प्रस्ताव मांडला जातो.

नागरी हक्क संरक्षण आणि 1955 च्या कोणत्या कलमान्वये अस्पृश्यता नष्ट केल्यामुळे प्राप्त होणारे हक्क संबंधित व्यक्तींना उपलब्ध होतील, अशी शाश्वती देणे हे राज्य शासनाचे कर्तव्य असेल?

घटनेच्या कलम 3 मध्ये खालीलपैकी कोणत्या तरतुदींचा समावेश होत नाही. (अ) कोणत्याही राज्याचे क्षेत्र वाढविणे (ब) नवीन राज्यांना समाविष्ट करणे (क) राज्याचे क्षेत्र कमी करणे (ड) राज्याच्या नावात बदल करणे (इ) नवीन राज्ये स्थापन करणे

नर्मदा जल विवाद न्यायाधिकरण हे खालीलपैकी कोणत्या राज्यांशी संबंधित आहे?

नगरसेवक नगरपरिषदेच्या सलग ____________________ सभांना गैरहजर राहिल्यास त्याला पदावरून करण्यात येते.

योग्य विधाने ओळखा. (अ) ग्रामीण ते शहरी संक्रमण क्षेत्रासाठी नगरपंचायतीची स्थापना केली जाते. (ब) नगरपंचायतीमध्ये कमाल 21 सदस्य असतात. (क) नगरपंचायतीमध्ये दोन नामनिर्देशित सदस्य असतात. (ड) एखाद्या क्षेत्रात नगरपंचायत स्थापन करण्यासाठी त्या भागात बिगर कृषी रोजगाराची टक्केवारी किमान 40% असावी लागते.

स्वर्णसिंग समितीने सुचवलेल्या खालीलपैकी कोणत्या कर्तव्यांचा काँग्रेस पक्षाने स्वीकार न केल्यामुळे त्यांचा घटनेत समावेश केला गेला नाही.

(अ) घटनेचा भाग 21 मधील कलम 368 मध्ये घटना दुरुस्ती करण्याचा संसदेचा अधिकार आणि त्याची प्रक्रिया स्पष्ट केली आहे. (ब) घटनादुरुस्ती विधेयक मंत्री किंवा इतर सदस्य सादर करतात व त्यासाठी त्यांना राष्ट्रपतीच्या पूर्व परवानगीची आवश्यकता असते.घटना दुरुस्तीसंबंधी वरील विधाने विचारात घेऊन योग्य विधानाचा पर्याय निवडा.

खालीलपैकी कोणती घटनादुरुस्ती करण्यासाठी संसदेच्या साध्या बहुमताची आवश्यकता असते? (अ) संसदेची गणपूर्ती (ब) परिशिष्ट 5 - अनुसूचित क्षेत्र व अनुसूचित जमातींचे प्रशासन (क) अधिकृत भाषेचा वापर (ड) संसदेमध्ये राज्यांचे प्रतिनिधित्व

घटना समिती विषयी पुढील विधाने विचारात घ्या. (अ) घटना समिती भारतातील लोकांनी प्रौढ मताधिकार त्यानुसार प्रत्यक्ष पद्धतीने निवडलेली नसली तरी घटना समितीत सर्व घटकांना प्रतिनिधित्व होते. (ब) महात्मा गांधी आणि एम. ए. जीना सोडता सर्व महत्त्वाच्या व्यक्ती घटना समितीत होत्या. (क) संस्थानांनी घटना समितीत सहभागी न होण्याचे ठरविल्याने त्या जागा रिक्त राहिल्या.

खालीलपैकी कोण सरपंचास ग्रामसभा बोलवण्याची सूचना देऊ शकतात? (अ) स्थायी समिती (ब) पंचायत समिती (क) मुख्य कार्यकारी अधिकारी (ड) विभागीय आयुक्त

(अ) केंद्र सरकार तसेच राज्य सरकार संचित निधीचे तारण देऊन देशातून किंवा देशाबाहेरून कर्ज घेऊ शकते.(ब) केंद्र सरकार भारताच्या संचित निधीतून कोणत्याही राज्य सरकारला कर्ज देऊ शकते किंवा राज्याने उभारलेल्या कर्जासाठी हमी देऊ शकते. वरील विधानांचा विचार करून त्या पैकी योग्य विधान/ने निवडा.

राज्यपालांच्या संबंधी पुढील विधाने विचारात घ्या व अयोग्य विधान निवडा.

आकाशात चंद्र सूर्य असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही' असे विधान पुढीलपैकी कोणी केले.

नागरी हक्क संरक्षण अधि. 1955 अन्वये जर एखाद्या व्यक्तीला अस्पृश्यतेच्या कारणावरून कोणतेही सफाईगाराचे अथवा प्राण्याचा मृतदेह उचलण्याचे किंवा फाडण्याचे, नाळ तोडण्याचे इत्यादी कोणतेही काम करण्याची सक्ती केल्यास, जो कोणी अवैधपणे सक्तीने श्रम करावयास लावील तो कमीत कमी _________________ ते जास्तीत जास्त _______________________ इतक्या कारावासास व कमीत कमी ____________ ते जास्तीत जास्त _______________ इतक्या द्रव्यदंडास पात्र होईल.

माहिती तंत्रज्ञान अधिनियमांतर्गत ओळख चोरी (Identity theft) साठी शिक्षेची काय तरतुद आहे?

पुढीलपैकी कोणती मार्गदर्शक तत्त्वे समाजवादी तत्त्वे म्हणून संबोधता येतील?(अ) ग्रामपंचायती संघटित करणे (कलम 40)(ब) औद्योगिक व्यवस्थापनामध्ये कामगारांचा सहभाग( कलम43 ए)(क) आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा यांना चालना देणे (कलम 51)(ड) समान न्याय आणि निशुल्क कायदे सहाय्य ( 39 ए)

राज्यघटनेच्या मूलभूत सिद्धांताच्या संकल्पनेची कल्पना खालीलपैकी कोणी पुढे आणली?

निवडणूक आयोगा संबंधित पुढील विधानांचा विचार करा व योग्य विधान निवडा.(अ) कलम 324 नुसार निवडणूक आयोगाला संसद, राज्य विधिमंडळ, भारताचा राष्ट्रपती, उपराष्ट्रपती यांच्या निवडणुकीवर देखरेख मार्गदर्शन आणि नियंत्रण करणे हा अधिकार आहे.(ब) मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त यांची नियुक्ती राष्ट्रपतीकडून केली जाते.(क) निवृत्त निवडणूक आयुक्ताची शासनातर्फे अन्य पदावर नियुक्ती करता येत नाही.

पुढील विधाने विचारात घ्या व त्यापैकी अयोग्य विधान/ने ओळखा.(अ) संसद राज्यांच्या सहमती शिवाय नवीन राज्याची स्थापना, राज्यांची क्षेत्रे सीमा व नावे बदलणे या गोष्टी करू शकत नाही.(ब) अशाप्रकारचे विधेयक मांडताना राष्ट्रपतींच्या पूर्व परवानगीने ते मांडणे गरजेचे असते.

अ' हा शिक्षक 'ब' या ठिकाणी खासगी शिकवणी घेण्यास इच्छुक आहे, परंतु RTE 2009 अधिनियमातील कलम ________________ नुसार 'अ' या व्यक्तीला असे करण्यास सक्त मनाई आहे?

पुढीलपैकी कोणते मूलभूत हक्क राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात निलंबित करता येतात?(अ) गुन्हा बद्दल दोषी ठरवण्या संबंधितील संरक्षण (ब) काही बाबतीमध्ये अटक आणि स्थान बद्धते विरुद्ध संरक्षण(क) जीविताचे आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचे संरक्षण

भारताच्या महालेखापरीक्षकासंबंधी पुढील विधाने विचार विचारात घ्या.(अ) भारताच्या महालेखापरीक्षकांची नियुक्ती राष्ट्रपती आदेशाने होते व राष्ट्रपतींच्या मर्जीने ते पद धारण करतात.(ब) त्यांचा कार्यकाल 6 वर्षे किंवा वयाची 62 वर्षे यापैकी जे अगोदर पूर्ण होईल तोपर्यंत असतो.(क) के. के. वेणू गोपाल हे सध्याचे भारताचे महालेखापरीक्षक आहेत.

अनुसूचित जाती व जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायदा, 1989 च्या कोणत्या कलमाअंतर्गत एकमेव विशेष न्यायालयाची (Exclusive Special Courts) ची तरतूद केलेली आहे?

पुढीलपैकी कोणते खर्च भागवण्यासाठी विनियोजन विधेयक मांडले जाते?

कटक मंडळाविषयी चुकीचे विधान ओळखा. (अ) लोकसंख्येनुसार कटकमंडळाचे चार विभाग पडतात. (ब) कटक मंडळ (कॅन्टोनमेंट बोर्ड) आपली कर्तव्य पार पाडण्यात सक्षम नसेल तर संरक्षण मंत्रालय कटक मंडळ करण्यास करते. (क) कटक मंडळाच्या उपाध्यक्षाची निवड निर्वाचीत सदस्यांमधून 5 वर्षाकरिता करण्यात येते. (ड) उपाध्यक्षाला पदावरून दूर करण्याच्या प्रक्रियेत मात्र निर्वाचित तसेच नामनिर्देशीत सदस्य भाग घेतात.

सामान्य अध्ययन 2 या पेपरमधील विविध कायद्यांमध्ये 'सद्‌भावपूर्वक कारवाईस संरक्षण' अशा अर्थाचे कलम येते. विविध कायद्यात ते कलम कोणते ते ओळखा.'अ' गट (कलम) 'ब' गट (कायदा)(अ) कलम 21 (i) अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम 1989(ब) कलम 22 (ii) माहिती अधिकार कायदा 2005(क) कलम 37 (iii) मातापिता व ज्येष्ठ नागरिक यांचा निर्वाह व कल्याण अधिनियम 2007(ड) कलम 28 (iv) शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 (अ) (ब) (क) (ड)

अशोक मेहता समितीच्या शिफारसी संदर्भात कोणते विधान असत्य आहे? (अ) पंचायतराज मंत्रालय स्थापन करण्यात यावे. (ब) पंचायतींच्या निवडणुकीमध्ये राजकीय पक्षांचा सहभाग नसावा. (क) न्यायपंचायती ग्रामपंचायतीपासून वेगळ्या ठेवाव्यात. (ड) जिल्हास्तरीय आर्थिक नियोजनासाठी जिल्हा नियोजन समितीची स्थापना करण्यात यावी.

योग्य जोड्या जुळवा.(अ) 102 वी घटना दुरुस्ती (i) कर्नाटकसंबंधी विशेष तरतुदी(ब) 103 वी घटनादुरुस्ती (ii) न्यायिक नियुक्ती आयोग(क) 98 वी घटनादुरुस्ती (iii) राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला घटनात्मक दर्जा(ड) 99 वी घटनादुरुस्ती (iv) आर्थिक मागासवर्गीयांसाठी १०% आरक्षण (अ) (ब) (क) (ड)

सार्वजनिक धोरणाच्या अभ्यासवाढीचा/वृद्धीचा दृष्टीकोण खालीलपैकी कोणी मांडला?

ज्येष्ठता अनुक्रमानुसार योग्य क्रम लावा. (अ) माजी पंतप्रधान (ब) भारतरत्न व्यक्ती (क) भारत सरकारचे सचिव (ड) UPSC अध्यक्ष (इ) सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश (ग) महान्यायवादी

महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 च्या संदर्भात न्यायाधिकरण याचा अर्थ कलम ___________ अन्वये गठित करण्यात आलेले महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरण असा होतो.

प्रजा समाजवादी पक्षासंदर्भात योग्य विधाने कोणती?(अ) किसान मजदूर प्रजा पार्टी (KMPP) आणि समाजवादी पक्ष यांचे एकत्रीकरण करून सप्टेंबर 1952 मध्ये प्रजा समाजवादी पक्ष स्थापन झाला.(ब) अशोक मेहता या पक्षाचे सचिव होते.(क) जयप्रकाश (जे. पी.) नारायण या पक्षाचे अध्यक्ष होते.

अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम, 1989 मधील कलम 3(2)(9) अन्वये जर लोकसेवकाने या कलमाखालील कोणताही अपराध केल्यास किती शिक्षा होऊ शकते?

महानगरपालिकेला प्रशासनाचे विशेष ज्ञान व अनुभव असणारे ________ एवढे कमाल सदस्य नामनिर्देशित करता येतात.

73व्या घटना दुरुस्तीनुसार खालीलपैकी कोणत्या तरतुदी अनिवार्य करण्यात आल्या आहेत? (अ) मधल्या व जिल्हा स्तरावरील अध्यक्षासाठीची निवडणुक पद्धत (ब) पंचायतींना आर्थिक अधिकार प्रदान करणे (क) तिन्ही स्तरावरील सदस्यांची निवडणूक पद्धत (ड) इतर मागास वर्गीयांना पंचायतीमध्ये आरक्षण

मनरेगा संबंधित पुढीलपैकी योग्य विधान ओळखा.

पर्यावरण सुधारणे आणि त्याचे रक्षण करणे आणि वने व वन्यजीव यांचे संरक्षण करणे हे मार्गदर्शक तत्व खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीअन्वये समाविष्ट करण्यात आले.?

पुढीलपैकी चुकीचे विधान ओळखा.

सन 2021 मध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका पार पडल्या नाहीत? (अ) पंजाब (ब) राजस्थान (क) आसाम (ड) केरळ (इ) ओदिशा (ई) तामिळनाडू

पुढील राज्यांचा त्यांच्या निर्मिती नुसार क्रम लावा.

नागपूर करारातील तरतुदीसंबंधीपुढील विधाने विचारात घ्या.(अ) नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी करून एक हिवाळी अधिवेशन नागपूर येथे घेण्यात यावे.(ब) मुंबई, मध्य प्रदेश, हैदराबाद येथील मराठी भाषिकांचे एक सलग राज्य करुन मुंबई त्याची राजधानी असावी.(क) उच्च न्यायालय केवळ मुंबई येथे असेल.

(अ) या कायद्याने केंद्रिय व प्रांतिक विषय वेगळे केले. (ब) केंद्रात प्रथमच द्विगृही कायदेमंडळाची निर्मिती करण्यात आली. (क) या कायद्यान्वये प्रथमच प्रांताचे अर्थसंकल्प केंद्रीय अर्थसंकल्पापासून वेगळे करण्यात आले. वरील वैशिष्ट्ये खालीलपैकी कोणत्या कायद्याची आहेत?

1773 च्या रेग्युलेटिंग अॅक्टसंबंधी पुढील विधाने विचारात घ्या.(अ) या कायद्याने भारतातील केंद्रीय प्रशासनाचा पाया घातला.(ब) या कायद्यामुळे बंगालचा गव्हर्नर असलेला लॉर्ड विल्यम बेंटींक हा बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल बनला.(क) या कायद्यानुसार कोलकाता येथे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली.वरीलपैकी योग्य विधान/ने ओळखा.

1946 मध्ये स्थापन झालेल्या अंतरिम सरकारमध्ये खालीलपैकी कोणत्या सदस्यांचा सहभाग नव्हता?(अ) जगजीवन राम(ब) जोगेन्द्रनाथ मंडल(क) राजकुमारी अमृत कौर(ड) डॉ.बाबासाहेब आंबेडकर (इ) डॉ. जॉन मथाई

योग्य विधाने निवडा. (अ) 101व्या घटनादुरुस्तीनंतर संघ सूचीतील विषयांची संख्या राज्य सूचीतील विषयांच्या संख्येपेक्षा जास्त आहे. (ब) 101 व्या घटनादुरुस्तीनंतर राज्य सूचीतील विषयांची संख्या समवर्ती विषयांच्या संख्येपेक्षा कमी झाली आहे. (क) 101व्या घटनादुरुस्तीनंतर समवर्ती सूचीमध्ये सर्वात कमी विषय राहिले.

अचूक जोड्या ओळखा.पक्ष सलंग्न विद्यार्थी संघटना(अ) भारतीय जनता पक्ष - अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP)(ब) भारतीय साम्यवादी पक्ष - प्रगतीशील विद्यार्थी संघ (PSU)(क) भारतीय राष्ट्रीय काँग्रेस - भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी संघ (NSUI)

खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा (स्थापनेबाबत)

लोकस स्टँडी' व 'सुओमोटो' या लॅटिन भाषेतील नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वाचे अर्थ __________

खालीलपैकी अयोग्य विधान निवडा.

'द स्कूल इज डेड' या पुस्तकातून दूर शिक्षणासंबंधी विचार कोणी मांडले?

देशात स्वातंत्र्यापूर्वी एकूण उच्च न्यायालयांची संख्या किती होती?

खालीलपैकी दबाब गटांविषयी अयोग्य जोडी ओळखा.

खालीलपैकी कोणती विधाने अचूक आहेत?(अ) प्राथमिक शाळा उघडणे व चालवणे हे नगरपरिषदेचे अनिवार्य कार्य आहे.(ब) जनगणना करणे हे ऐच्छिक कार्य आहे.(क) सार्वजनिक रुग्णालयांची स्थापना हेदेखील अनिवार्य कार्य आहे.

सर्व शिक्षा अभियानासंदर्भात खालील विधानांचा विचार करा.(अ) या कार्यक्रमाची सुरुवात अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात 2001 साली झाली.(ब) मुली आणि मागास वर्गावर विशेष भर देण्याची तरतूद या कार्यक्रमामध्ये होती.(क) या कार्यक्रमाची अंमलबजावणी राज्य सरकारे करतात.

सरकारी आयोगाबाबतीत योग्य विधाने निवडा. (अ) आयोगाची स्थापना 1983 ला झाली तर अहवाल 1987 सादर केला. (ब) आयोगात अध्याक्षासह तीन सदस्य होते. (क) आयोगाने एकूण 247 शिफारसी केल्या. (ड) आयोग हा केंद्र राज्य संबधांसाठी स्थापन करण्यात आला.

खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत?

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायदा 2009 मधील ______________ मध्ये शालेय व्यवस्थापन समिती (School management Committee) बाबत तरतूद करण्यात आली आहे.

घटना समितीच्या समित्यांबद्दल अयोग्य जोडी ओळखा.

खालीलपैकी कोणती विधाने चुकीची आहेत?(अ) मुंबई महानगर प्रदेशाच्या (MMR) विकासासाठी 26 जानेवारी 1975 रोजी MMRDA ची स्थापना करण्यात आली.(ब) याचे अध्यक्ष नगरविकास मंत्री असतात.(क) MMRDA मध्ये सध्या 1000 पेक्षा जास्त गावे समाविष्ट आहेत.

लोकसभा अध्यक्षाबाबत अयोग्य विधाने निवडा.

लोकसभेत उपसभापतींची बडतर्फीची प्रक्रिया चालू असताना

राष्ट्रीय हरित न्यायाधीकरण (NGT) बाबत खालीलपैकी अयोग्य विधान कोणते?

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण (National Legal Services Authority) अंतर्गत विधी सेवा मोफत मिळवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या व्यक्ती पात्र आहेत?(अ) महिला व बालके (ब) अनुसूचित जाती जमातीतील व्यक्ती(क) वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती(ड) अपंग व्यक्ती

अयोग्य नसलेली विधाने निवडा. (अ) राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना 1992 च्या कायद्याने 1992 मध्ये झाली. (ब) आयोगाच्या पहिल्या अध्यक्षा म्हणून जयंती पटनाईक यांनी काम पाहिले.

केंद्र सरकारने खालीलपैकी अलिकडे घोषित केलेला अल्पसंख्यांक समूह कोणता?

खालीलपैकी अचूक विधाने कोणती?(अ) लोकपाल व लोकायुक्त अधिनियम 2013 नुसार भारताचे पहिले लोकपाल म्हणून पिनाकी चंद्र घोष यांची नियुक्ती झाली आहे.(ब) केंद्रातील लोकपालाप्रमाणे राज्यात लोकायुक्त पद अस्तित्वात आहे.(क) राज्यातील लोकायुक्त व उपलोकायुक्त यांची नेमणूक राष्ट्रपती संबंधित राज्याच्या राज्यपालाशी विचारविनिमय करून करतात.(ड) लोकायुक्त व उपलोकायुक्त पद निर्माण करणारे कर्नाटक हे भारतातील पहिले राज्य आहे.

खालीलपैकी अयोग्य विधाने निवडा. (अ) राज्य विधिमंडळाचे विशेषाधिकार राज्यपालांना लागू होत नाही. (ब) राज्य विधिमंडळातील एखादे विधेयक संविधानातील तरतुदींच्या विरोधात जाणारे असेल तर ते विधेयक संविधानातील तरतुदींच्या विरोधात जाणारे असेल तर ते विधेयक राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवणे राज्यपालांवर बंधनकारक आहे.

राज्य घटनेच्या पुढीलपैकी कोणत्या वैशिष्ट्यांमधून एकात्म राज्यघटनेची वैशिष्ट्ये प्रतीत होतात?(अ) प्रबळ केंद्र शासन(ब) राज्यघटनेचे श्रेष्ठत्व(क) अखिल भारतीय सेवा(ड) एकात्मिक न्यायव्यवस्था

ग्रामपंचायत सदस्य आपला राजीनामा _____________ कडे देतात, उपसरपंच राजीनामा ___________ कडे देतात, तर सरपंच आपला राजीनामा _______________ यांच्याकडे देतात.

पुढीलपैकी कोणती तरतूद 1909 च्या मोर्ले- मिंटो सुधारणेचा भाग नाही?

खालीलपैकी कोणत्या मुलभूत कर्तव्यांचा समावेश घटनेत करावा अशी शिफारस राज्यघटना पुनर्विलोकन आयोगाने केली होती? (अ) निवडणुकांमध्ये मतदान करणे (ब) कर भरणे (क) कामगारांच्या मुलांना शैक्षणिक सुविधा पुरविणे (ड) लोकशाहीत हिरीरीने सहभागी होणे.

खालीलपैकी अयोग्य विधान निवडा.

प्रांतिक (ग्रामीण प्रशासनसंबंधी) कायदे व वर्ष अचूक जोड्या ओळखा.अ गट ब गट(अ) स्थानिक ग्रामीण कायदा - 1920(ब) कोल्हापूर संस्थान पंचायत कायदा - 1926(क) आसाम ग्रामीण स्वयंशासन कायदा - 1929(ड) मुंबई ग्रामपंचायत अधिनियम - 1925

(अ) मुख्यमंत्र्यासहित राज्याच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या ही राज्याच्या विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 12 टक्के पेक्षा जास्त असू नये. (ब) मणिपूर, झारखंड, ओदिशा, छत्तीसगढ राज्यांमध्ये आदिवासी कल्याणमंत्री नियुक्त केला पाहिजे. (क) राज्य विधिमंडळाचा सलग 4 महिने सदस्य नसलेला मंत्री पदावर राहणार नाही. वरीलपैकी योग्य विधाने ओळखा.

खालीलपैकी कोणती जोडी बरोबर नाही? (पद आणि निर्माणकर्ता)

फौजदारी प्रक्रिया संहिता (Criminal Procedure Code,1973) यात काहीही अंतर्भूत असले तरी माता-पिता व ज्येष्ठ नागरिक देखभाल व कल्याण अधिनियम, 2007 अन्वये प्रत्येक अपराध हा ___________ आणि ________________ असेल.

केंद्र शासनाने ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी "आई वडिल, ज्येष्ठ नागरिकांच्या चरितार्थ व कल्याणासाठी अधिनियम, 2007" पारित केला आहे. सदरचा अधिनियम महाराष्ट्र राज्यात ____________ पासून लागू करण्यात आला आहे.

योग्य विधान/विधाने निवडा.(अ) महाराष्ट्रात पंचायतराजच्या अंमलबजावणीसाठी विविध समित्यांची स्थापना करण्यात आली, त्यातील पहिली समिती 1960 मध्ये वसंतराव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली होती.(ब) 19 ऑक्टोबर 1980 साली पुन्हा तत्कालीन ग्रामविकासमंत्री बाबुराव काळे यांच्या अध्यक्षतेखाली देखील समिती स्थापन केली गेली होती.

जमीन महसूल संहिता :महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 मधील कलम (2) नुसार खालील जोड्या योग्य रितीने जुळवा.व्याख्या क्रमांक व्याख्या(अ) 2 (i) भू-मापन अधिकारी(ब) 19 (ii) पार्डी जमीन(क) 26 (iii) दुमाला(ड) 39 (iv) जमीन महसूल (अ) (ब) (क) (ड)

भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, 1988 नुसार लोकसेवकाने गुन्हेगारी स्वरूपाचे वर्तन केल्यास _____________ शिक्षेची तरतूद आहे.

भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 बाबत खालील विधानांपैकी अयोग्य विधान कोणते?

भाषण व अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्यामध्ये पुढीलपैकी कोणत्या घटकांचा समावेश होतो? (अ) प्रेसच स्वातंत्र्य (ब) व्यापारी जाहिरात करण्याचे स्वातंत्र्य (क) शांततेचे स्वातंत्र्य (ड) निदशर्नाचा अधिकार (इ) संपाचा अधिकार (ग) सरकारी कामाचा माहिती मिळविण्याचा अधिकार

भारतीय संविधानाच्या सरनाम्यात शेवटी समावेश करण्यात आलेले शब्द कोणते? (अ) धर्मनिरपेक्षता (ब) सार्वभौम (क) गणराज्य (ड) न्याय (इ) समाजवादी (ग) लोकशाही (फ) एकात्मता

जोड्या जुळवा.पत्रकारितेतील राष्ट्रीय पुरस्कार (2019) पुरस्कारार्थी(अ) क्रीडा पत्रकारिता (i) पी. जी. उन्नीकृष्णन(ब) फोटो पत्रकारिता (ii) सौरभ दुग्गल(क) राजा राममोहन रॉय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार (iii) गुलाब कोठारी(ड) विकासात्मक पत्रकारिता (iv) अनु अब्राहिम (अ) (ब) (क) (ड)

भारताचा महान्यायवादी संबंधी योग्य विधाने ओळखा. (अ) त्यांना भारताच्या राज्यक्षेत्रातील न्यायालयामध्ये सुनावणीचा/ऐकून घेतले जाण्याचा अधिकार आहे. (ब) त्यांना संसद सदस्याप्रमाणे सर्व विशेषाधिकार व संरक्षण प्राप्त होते (क) ते केंद्रिय कॅबिनेटचे सदस्य असतात. (ड) ते संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये, समित्यांमध्ये मतदान करू शकतात.

जनशक्ती, कालांतर, नवदुनिया, न्यु ऐज, प्रजा पक्षम इत्यादी वृत्तपत्रे खालीलपैकी कोणत्या पक्षाशी संबंधित आहेत.

भारतीय राज्यघटनेतील 'एकेरी नागरिकत्व' ही तरतूद आपण कोणत्या देशाकडून घेतली आहे?

(अ) ब्रिटिश भारतातील प्रांताकरिता 296 जागांसाठी प्रत्यक्षरित्या निवडणुका पार पडल्या. (ब) घटना समितीत अप्रत्यक्षरित्या निवडलेले आणि नियुक्त केलेले असे दोन्ही प्रकारचे सदस्य होते.

खालीलपैकी कोणती प्रशासनिक कायद्याची उगमस्थाने (Sources of Administrative Law) कोणती?(अ) विविध कायदे (Statutes)(ब) रुढी/वहिवाट (customs/Usage)(क) राज्यघटना (Constitution)(ड) न्यायाधीशांचे निर्णय (Judicial decision)

पुढीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत?(अ) पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत (1951-52) एकूण 14 राष्ट्रीय पक्ष सहभागी होते.(ब) कम्युनिस्ट पक्ष व समाजवादी पक्ष अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांकावर होते.

माहितीचा अधिकार कायदा करणारे देश (कायदा करण्याच्या वर्षाप्रमाणे) कालानुक्रमे लावा.(अ) नॉर्वे (ब) अमेरिका(क) फ्रान्स (ड) इटली(इ) भारत

अनुसूचित जाती व जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम, 1989 मध्ये __________ प्रकरणे व ____________ कलमांचा समावेश आहे.

अयोग्य विधान निवडा.

लोकप्रशासनाच्या दृष्टीकोनाचे दोन विभागात वर्गीकरण केले जाते पारंपारिक दृष्टिकोन व आधुनिक दृष्टिकोन त्यापैकी खालीलपैकी पारंपारिक दृष्टिकोनात समाविष्ट होणाऱ्या दृष्टिकोन कोणते?(अ) ऐतिहासिक दृष्टिकोन (Historical)(ब) वैधानिक दृष्टिकोन (Legal)(क) व्यवस्था दृष्टिकोन (System)(ड) वातावरणात्मक दृष्टिकोन (Ecological)(इ) शास्रीय दृष्टिकोन (Scintific)(फ) राजकीय दृष्टिकोन (Political)

पर्यावरण संरक्षण अधिनियमातील (1986) तरतुदी, आदेश, नियम यांचे पालन करण्यास कोणीही अपयशी ठरल्यास खालीलपैकी कोणत्या शिक्षेची तरतूद आहे?

(अ) घटनेने मान्यता प्रदान केलेल्या भाषांची यादी परिशिष्ट आठ मध्ये आहे. (ब) केंद्र आणि राज्य यांच्यातील अधिकारांचे राज्य परिशिष्ट सात मध्ये आहे. (क) परिशिष्ट 06 हे घटनेचे आकाराने सर्वात मोठे परिशिष्ट आहे.

अचूक पर्यायाची निवड करा.(अ) जागतिक हरित क्रांतीचे जनक नॉर्मन बोरलॉग यांना 1970 चा 'वर्ल्ड फूड प्राईज' हा पुरस्कार प्राप्त झाला.(ब) त्यांनी नोरीन या बुटक्या जातीचा संकर मेक्सिकन जातीच्या गव्हाबरोबर घडवून आणला होता.

जो कोणी अस्पृश्यतेच्या कारणावरून एखाद्या व्यक्तीस रुग्णालये, दवाखाना, शिक्षणसंस्था, वसतिगृह यात प्रवेश नाकारेल तो किमान ______________ ते कमाल _________________ इतका कारावास आणि किमान _____________ ते कमाल ____________________ इतक्या द्रव्यदंडाच्या शिक्षेस पात्र असेल.

खालीलपैकी कोणकोणते नागरी प्रशासनाचे प्रकार आहेत?(अ) छावणी क्षेत्र मंडळ(ब) टाऊनशिप(क) पोर्ट ट्रस्ट(ड) अधिसूचित क्षेत्रीय समित्या

अयोग्य जोडी ओळखा.

खालीलपैकी कोणती विधाने अचूक आहेत?(अ) महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 च्या आधारावर तलाठ्यांचा कारभार चालतो.(ब) तलाठी हा गावचा महसूल अधिकारी असून वर्ग 4 चा कर्मचारी आहे.(क) तलाठ्याची नेमणूक व बदली करण्याचे अधिकार तहसिलदारास असतात.(ड) तलाठ्याच्या कार्यालयाला चावडी असे म्हणतात.

घटना समितीच्या मुख्य समित्या व त्यांच्या अध्यक्ष यांच्या योग्य जोड्या जुळवा.(अ) प्रांतिक राज्यघटना समिती (i) जवाहरलाल नेहरू(ब) कामकाज प्रक्रिया नियम समिती (ii) डॉक्टर राजेंद्र प्रसाद(क) संस्थाने समिती (iii) के एम मूनशी(ड) सुकानु समिती (iv) सरदार पटेल

पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.

कलम 370 मध्ये पूर्वी असलेला जम्मू काश्मीरचा विशेष राज्य हा दर्जा 2019 मध्ये कमी करण्यात आला आणि अनेक बदल करण्यात आले. यासंबंधी पुढीलपैकी कोणते बदल योग्य आहेत?(अ) जम्मू-काश्मीरला असलेले विशेषाधिकार रद्द(ब) जम्मू कश्मीर ला स्वतंत्र ध्वज नाही(क) भारतातील कोणत्याही नागरिकाला जम्मू-काश्मीरमध्ये स्थावर मालमत्ता खरेदी करता येईल(ड) विधानसभेचा कार्यकाळ सहा वर्ष असेल(इ) सर्व केंद्रीय कायदे जम्मू-काश्मीरला लागू

जमीन महसूल संहितेच्या कोणत्या प्रकरणात 'महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरणाचा उल्लेख येतो?

योग्य असलेली विधाने निवडा. (अ) घटनेने सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचा कालावधी निश्चित केलेला नाही. (ब) वयाची 65 वर्षे पूर्ण होईपर्यंत ते पदावर राहू शकतात. (क) ते आपला राजीनामा राष्ट्रपतींना उद्देशून देऊ शकतात. (ड) लोकसभेच्या शिफारसीनुसार राष्ट्रपती त्यांना पदच्च्युत करू शकतात.

भारतीय महालेखापरिक्षकासंबंधी योग्य विधाने ओळखा. (अ) राज्यघटनेत नमूद केलेल्या प्रक्रियेनुसारच राष्ट्रपती त्याला पदावरून काढू शकतात. (ब) कोणताही मंत्री संसदेमध्ये महालेखापरिक्षकांचे प्रतिनिधित्व करू शकत नाही. (क) पदावरून कार्यमुदत झाल्यानंतर ते भारत सरकारमधील किंवा कोणत्याही राज्यसरकारमधील पदावर काम करू शकत नाहीत.

उत्प्रेषण रिर केव्हा आदेशित करता येत नाही?

जेव्हा राज्यपाल धनविधेयक राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवतात तेव्हा राष्ट्रपती ______ (अ) ते विधेयक पारित करू शकतात (ब) ते विधेयक विधिमंडळाकडे पुनविचारार्थ परत पाठवू शकतात. (क) त्या विधेयकाला संमती देण्यास नकार देऊ शकतात.

कोणत्या कलमाअंतर्गत कलम 39 (b) आणि 39 (c) मधील मागदर्शक तत्त्वांच्या अंमलबजावणीसाठी केलेल्या कायद्यांना हे कलम 14 व 19 चे उल्लंघन करते म्हणून आव्हान दिले जावू शकणार नाही?

खालीलपैकी कोणत्या मार्गदर्शक तत्त्वाचा समावेश 42व्या घटनादुरुस्तीत समावेश करण्यात आला नाही?

अयोग्य विधानांचा पर्याय निवडा.(अ) ग्रामपंचायत स्थापन करण्याचे अधिकार विभागीय आयुक्तांना असतात.(ब) ग्रामपंचायतीच्या प्रभागांची संख्या तहसीलदार ठरवतात तर रचना जिल्हाधिकारी करतात.(क) एका प्रभागातून 4-5 सदस्य निवडून येतात.

खालीलपैकी कोणत्या बाबी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रारंभिक अधिकार क्षेत्रात येत नाहीत. (अ) आंतरराज्यीय जल विवाद (ब) वित्त आयोगाकडे सोपवलेल्या बाबी (क) राज्यघटनापूर्व काळातील तह, करार, कलमे, ठराव, सनद व अशा प्रकारच्या दस्तऐवजांतून उद्‌भवणारे विवाद (ड) दोन किंवा अधिक राज्यातील विवाद

अचूक जोडी कोणती?

कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधि. 2005 च्या कोणत्या कलमामध्ये संरक्षण अधिकाऱ्याची कर्तव्ये देण्यात आली आहेत?

नागरिकांना माहिती पुरवण्याबाबत अपवाद माहितीचा अधिकार अधिनियमाच्या कोणत्या कलमात नमूद करण्यात आले आहेत?

(अ) पंतप्रधानाची नियुक्ती आणि निवड याबाबत राज्यघटनेत सुस्पष्ट तरतूद नाही. (ब) घटनेतील कलम 74 (1) नुसार राष्ट्रपती पंतप्रधानांची नियुक्ती करतात. (क) लोकसभेचाच सदस्य होण्यासाठी आवश्यक असलेली पात्रता हिच पंतप्रधान पदासाठी आवश्यक पात्रता मानली जाते.

कलम 72 मधील राष्ट्रपतींच्या दयेच्या अधिकाराबद्दल योग्य विधाने निवडा. (अ) केंद्रीय मंत्रीमंडळाच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती या अधिकाराचा वापर करतात (ब) राष्ट्रपती नव्याने सर्व पुरावे तपासू शकतात. (क) अर्जदारांना राष्ट्रपतीद्वारे मौखिक सुनावणीचा हक्क आहे. (ड) सर्वोच्च ___________ यासाठी मार्गदर्शिका आखून देऊ शकतात.

माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 मधील कलम 5 मध्ये खालीलपैकी काय नमूद आहे?

माहिती तंत्रज्ञान अधिनियम, 2000 मध्ये कोणत्या कलमांतर्गत अपिलिय न्यायालय (Appullete Tribunal) स्थापन करण्याची तरतुद केलेली आहे?

खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?(अ) 1976 च्या 42 व्या घटनादुरुस्तीने संसदेला प्रशासनिक न्यायाधिकरणे स्थापण्याचा अधिकार मिळाला.(ब) त्यानुसार राज्यघटनेमध्ये 'न्यायासन' या शीर्षकाखाली '14 अ' हा नवा भाग समाविष्ट करण्यात आला.(क) अशा न्यायाधिकरणांची स्थापना करण्याचे अधिकार कलम 323 (अ) नुसार संसदेला देण्यात आले आहेत.

अयोग्य विधानाचा पर्याय निवडा.(अ) घटनेतील भाग 14 मधील कलम 308 ते 314 मध्ये अखिल भारतीय सेवांबाबतच्या घटनात्मक तरतुदी नमूद केलेल्या आहेत.(ब) कलम 309 मध्ये भरती आणि सेवाशर्ती बाबत तरतूदी आहेत.(क) कलम 312 अन्वये नवीन अखिल भारतीय सेवांचा ठराव राज्यसभेने साध्या बहुमताने पारित करणे गरजेचे आहे.(ड) कलम 311 अन्वये नागरी पदांवर नियुक्त व्यक्तींना बडतर्फ करणे, पदावरून दूर करणे अशा तरतुदी समाविष्ट आहेत.

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम, 2009 च्या बाबतीत अयोग्य विधान/ने ओळखा. (अ) केंद्र सरकार, प्राथमिक शिक्षण व बालविकास या क्षेत्रातील अनुभवी व्यक्तींमधून 12 पेक्षा अधिक नसतील इतक्या सदस्यांची राष्ट्रीय सल्लागार परिषद गठित करील. (ब) या कायद्यातील कलम 32 नुसार "बालकांच्या शिक्षणाच्या हक्कांचे सनियंत्रण" राष्ट्रीय 9 राज्य बालहक्क संरक्षण आयोग करेल.

भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, 1988 अंतर्गत अन्वेषण करण्यास प्राधिकृत व्यक्तीसंदर्भात अयोग्य विधान/ने ओळखा. (अ) दिल्ली विशेष पोलीस आस्थापनेच्या बाबतीत - सहाय्यक पोलीस आयुक्त (ब) मुंबई, कलकत्ता, चेन्नई, अहमदाबाद महानगर क्षेत्राच्या बाबतीत पोलीस उपअधिक्षक किंवा समान दर्जाचा पोलीस अधिकारी

महाराष्ट्र जमीन महसूल संहितेनुसार राज्यातील कोणत्याही क्षेत्रामध्ये जमीन धारण करणारी, शासकीय पट्टेदार असलेली, जमीन गहाण ठेवून घेणारी, जमीनीचा मालक असलेली किंवा कुळ म्हणून अधिकार संपादन केलेली कोणतीही व्यक्ती असा अधिकार संपादन केल्याबद्दल, असा अधिकार संपादन केल्याच्या दिनांकापासून _________________ महिन्यांच्या आत तलाठ्यास कळवेल असे कलम 149 मध्ये नमूद आहे.

अधिकार अभिलेख किंवा ज्यास आपण गाव नमुना 7/12 चा उतारा म्हणून ओळखतो तो जमिन महसूल संहितेच्या कोणत्या कलमात नमूद आहे?

अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम 1989 अन्वये तडीपार आदेश मिळालेल्या व्यक्तीने त्या क्षेत्रातून निघून न जाता पुन्हा प्रवेश केल्यास कार्यपद्धती काय असावी हे कोणत्या कलमात नमूद आहे?

संविधानाच्या प्रारंभी भारताचा नागरिक होण्याकरिता कोणती अट आवश्यक नव्हती?

खालीलपैकी कोणती विद्यार्थी संघटना भारतीय कम्युनिस्ट पक्षाशी संबंधित आहे?

खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत?अ गट ब गट(अ) झोन 1 (i) अरुणाचल प्रदेश, गोवा, हरियाणा(ब) झोन 2 (ii) उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड(क) झोन 3 (iii) गुजरात, महाराष्ट्र, मध्यप्रदेश(ड) झोन 4 (iv) मणिपूर, त्रिपुरा, नागालँड (अ) (ब) (क) (ड)

उपविभागीय अधिकाऱ्यासंदर्भात अयोग्य विधान/विधाने निवडा.(अ) उपविभागीय अधिकारी राज्य सरकारच्या नियंत्रणाखाली कार्य करतो परंतु त्याची नियुक्ती केंद्र सरकारमार्फत होते.(ब) महाराष्ट्रात उपविभागीय अधिकारी प्रांताधिकारी/उपजिल्हाधिकारी/सहायक जिल्हाधिकारी या नावाने ओळखला जातो.(क) महसुली कामकाजासंदर्भात तो जिल्हाधिकारी व तहसिलदार यांच्यातील दुवा असतो.

भारतातील उपराष्ट्रपतीसंबंधीची अयोग्य विधाने शोधा. (अ) निवडणूक लढवण्यासाठी वयाची 35 वर्षे पूर्ण असणे गरजेचे आहे. (ब) उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत त्या सर्व सदस्यांचा समावेश असतो जे राष्ट्रपतींच्या महाभियोगात भाग घेतात. (क) घटकराज्यातील कायदेमंडळातील सदस्य उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत भाग घेत नाहीत.

एन. व्ही. एस. पी. (NVSP) चे पूर्ण रूप काय _________________

योग्य विधानांचा पर्याय निवडा.(अ) निवडणुक सुधारणा आणि निवडणूक कायदे यांच्या अभ्यासासाठी 2010 मध्ये तनखा समितीची स्थापना करण्यात आली.(ब) निवडणुकीसाठी राज्यांकडून निधी मिळवण्याची शिफारस 1998 मध्ये स्थापन झालेल्या इंद्रजित गुप्ता समितीने केली होती.

नगराध्यक्ष निवडीच्या पद्धतीत आतापर्यंत झालेल्या बदलांसंबधीची योग्य विधाने ओळखा.(अ) 1965 पासून 1974 पर्यंत निर्वाचित सदस्यांतून अप्रत्यक्षपणे नगराध्यक्षाची निवड होत असे.(ब) यात बदल होऊन 1974 ते 1997 या काळात थेट जनतेतून नगराध्यक्षाची निवड होऊ लागली.(क) सद्यस्थितीत देखील थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडला जातो.

पंचायतराजसंबंधी अशोक मेहता समितीच्या योग्य शिफारशी निवडा.(अ) त्रि-स्तरीय पद्धती ऐवजी द्विस्तरीय पद्धतीची निर्मिती करण्यात यावी.(ब) पंचायतराज संस्थांचा कार्यकाल 4 वर्षे असावा.(क) पंचायतराज संस्थांच्या कामकाजात राजकीय पक्षाचा सहभाग असावा.(ड) जिल्हा नियोजन समितीची स्थापना करण्यात यावी.

खालीलपैकी कोणाला मानवी संबंध सिद्धांताचे प्रनेता (Father of Human Relation Theory) म्हटले जाते?

खालीलपैकी योग्य विधाने ओळखा. (अ) डिजीटल स्वाक्षरी (Digital Signature) म्हणजे कोणत्याही इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डचे ग्राहकाद्वारा (Subscriber) इलेक्ट्रॉनिक पद्धतीने कलम 3 च्या तरतुदींतर्गत प्रमाणीकरण करणे. (ब) इलेक्ट्रॉनिक स्वाक्षरी (Electronic Signature) म्हणजे दुसऱ्या परिशिष्टामध्ये देण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक तंत्राचा वापर करून ग्राहकाद्वारे कोणत्याही इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डचे प्रमाणीकरण करणे. (क) डिजीटल स्वाक्षरीमध्ये इलेक्ट्रॉनिक स्वाक्षरीचाही समावेश होतो.

अनुसूचित जाती व जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम, 1989 अन्वये, संविधानाच्या कलम 244 मध्ये निर्देशित 'अनुसूचित क्षेत्रे' किंवा 'जनजाती क्षेत्र' या क्षेत्रामध्ये एखादी व्यक्ती या कायद्याखालील एखादा गुन्हा करण्याची शक्यता आहे. याबाबत विशेष न्यायालयाची खात्री पटल्यास, त्या व्यक्तीला अशा क्षेत्राच्या बाहेर ____________________ पेक्षा जास्त नसेल इतक्या कालावधीसाठी तडीपार करता येऊ शकेल.

माहिती अधिकार अधिनियम 2005 नुसार कोणते विधान अयोग्य आहे?

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 बाबत खालील विधानांचा विचार करा आणि योग्य पर्याय निवडा.(अ) या कायद्याच्या कलम 2 (c) नुसार बालक या संज्ञेमध्ये 6 ते 14 वर्षे वयोगटातील मुलगा/मुलगी यांचा समावेश होतो.(ब) या कायद्यातील कलम 3 मधील मोफत व सक्तीचे शिक्षण मिळवण्यासाठीची अपंग बालकांसाठीची वयोमर्यादा 6 ते 16 वर्षे अशी असेल.

GATS अंतर्गत सेवांचे वर्गीकरण 12 प्रमुख आंतरराष्ट्रीय व्यापारी क्षेत्रात करण्यात आले असून कोणत्या साली GATS मध्ये शिक्षणाचा समावेश करण्यात आला?

अयोग्य विधानाचा पर्याय निवडा.

भारतीय राज्यघटनेत 52वी घटनादुरुस्ती कोणत्या हेतुने करण्यात आली? (अ) पक्षांतराला आळा घालणे (ब) मतदाराची वयोमर्यादा ठरविणे (क) निर्वाचन प्रक्रियेत बदल करणे (ड) निवडणूक आयोग _______________सदस्यीय करणे. कोणते विधान बरोबर आहेत?

खालील मुद्यांचा विचार करा. (अ) 26 नोव्हेंबर 1949 रोजी संमत झालेल्या राज्यघटनेत सरनामा समाविष्ट नव्हता. (ब) 26 नोव्हेंबर 1949 नंतर भारतीय राज्यघटनेत एकूण 04 परिशिष्टे आणि 04 भाग यांचा समावेश करण्यात आला. (क) राज्यघटनेच्या संमतीचा ठराव हा राजेंद्र प्रसाद यांनी मांडला होता.

खालीलपैकी योग्य विधान कोणते?

भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, 1988 मधील कलम 8 संदर्भात खालीलपैकी अयोग्य विधान/ने ओळखा. (अ) या कलमांतर्गत एखाद्या लोकसेवकास लाच देणे या अपराधासाठी शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. (ब) यात 3 वर्षापर्यंत कारावास किंवा दंड किंवा दोन्ही अशी शिक्षेची तरतूद आहे. (क) एखाद्या व्यक्तींला लाच देण्यास भाग पाडले असेल तर त्या व्यक्तीने 14 दिवसांच्या आत याबद्दल तपास यंत्रणेला सूचित केले पाहिजे.

खालीलपैकी अयोग्य विधान निवडा.

पंजाबी भाषिक जनतेसाठी पंजाब आणि हिंदी भाषेत जनतेसाठी हरियाणा हे राज्य बनवण्याची शिफारस खालीलपैकी कोणत्या आयोगाने केली?

लाल बहादूर शास्री नॅशनल ॲकॅडमी ऑफ ॲडमिनीस्ट्रेशन (LBSNAA) बाबत योग्य विधाने ओळखा.(अ) या संस्थेची स्थापना 1959 साली झाली.(ब) 'राष्ट्रीय प्रशिक्षण संस्था' (NAA) म्हणून स्थापन झालेल्या या संस्थेस ऑक्टोबर 1972 मध्ये 'लाल बहादूर शास्री' यांचे नाव देण्यात आले.(क) 1975 मध्ये या संस्थेच्या नावात नॅशनल हा शब्द जोडण्यात आला.

खालीलपैकी योग्य विधाने ओळखा.(अ) 1687 मध्ये मद्रास येथे पहिली महानगरपालिका स्थापन करण्यात आली.(ब) 1870 मध्ये लॉर्ड मेयो यांनी आर्थिक विकेंद्रीकरणाचा ठराव मांडला.(क) लॉर्ड रिपन यांना स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक मानले जाते.

17 व्या लोकसभा निवडणुकीची योग्य वैशिष्ट्ये कोणती?(अ) या निवडणुकीत एकूण 78 महिला उमेदवार निवडून आल्या.(ब) पूर्ण बहुमताने सलग दुसऱ्यांदा सत्तेवर आलेले नरेंद्र मोदी हे भारताचे तिसरे पंतप्रधान ठरले.(क) 17 व्या लोकसभेत निवडूण येणाऱ्या उमेदवारांपैकी 314 उमेदवार हे पहिल्यांदाच निवडूण आले.

1767 मध्ये ब्रिटिशांनी 'सर्व्हे ऑफ इंडियाची' स्थापना केली, त्याचे प्रथम 'सर्व्हेअर जनरल ऑफ इंडिया' म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली?

'कायद्याचे राज्य' या तत्त्वाचे आद्यप्रवर्तक कोण होते?

केंद्रिय सचिवालयातील कोण सचिवाच्या वतीने काम करतो?

राष्ट्रीय पक्षांना मान्यता मिळण्याच्या निकषाबाबत अयोग्य विधान निवडा.

माहितीचा अधिकार अधिनियम 2005, कलम 8 मध्ये काय नमूद आहे?

विधान : राज्यघटनेने सर्वोच्च न्यायालयाच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र न्यायव्यवस्था स्थापन केली आहे.कारण : न्यायालयीन पुनर्विलोकन द्वारे घटनेचे सर्वश्रेष्ठत्व अबाधित राहता यावे व केंद्र-राज्य आणि राज्य-राज्य यातील विवाद सोडविणे शक्य होते.

योग्य विधाने निवडा. (अ) 1963 मध्ये डॉ. एल. एम. सिंघवी यांनी सर्वप्रथम लोकपाल ही संज्ञा वापरली. (ब) 1968 मध्ये शांतीभूषण यांनी प्रथम लोकपाल विधयके लोकसभेत मांडली. (क) लोकपालाचे कार्य पंतप्रधानापासून ते सरकारी कर्मचाऱ्यापर्यंतच्या पातळीवरील भ्रष्टाचाराच्या तक्रारींचा छडा लावणे हे आहे. (ड) मार्च 2013 रोजी पहिले लोकपाल म्हणून पिनिका चंद्र घोष यांची नियुक्ती करण्यात आली.

पुढील वर्णन कोणत्या वित्तीय समितीचे आहे? 1950 मध्ये तत्कालीन अर्थमंत्री जॉन मथाई यांच्या शिफारशीनुसार या समितीची स्थापना करण्यात आली. या समितीची सदस्य संख्या सुरुवातीला 25 होती. मात्र ती 1956 मध्ये वाढून 30 करण्यात आली. या समितीतील सर्व सदस्य लोकसभेतील असतात आणि सत्तारूढ पक्षाचा सदस्य या समितीचा अध्यक्ष असतो.

सरकारचा प्रमुख या नात्याने तो समानांमधील प्रथम आहे. पण आजच्या परिस्थितीत पंतप्रधानाच्या पदाचे हे वर्णन फारच तोकडे आहे' असे वर्णन पंतप्रधान पदाबाबत कोणी केले?

खालीलपैकी कोणाला स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक म्हणण्यात येते?

जिल्हा परिषद अध्यक्षांच्या 30 दिवसांपेक्षा अधिक ते 90 दिवसांपर्यंतच्या रजेस कोण मंजुरी देतो?

पक्षीय निधीसंदर्भात योग्य विधाने ओळखा.

___________ महानगरपालिका ही राज्यातील सर्वात मोठी महानगरपालिका ठरली आहे.

______________ यांनी _____________ साली ______________ हे मराठीतील पहिले दैनिक प्रकाशित केले.

सचिवालयाची कार्ये पुढीलपैकी कोणती आहेत? (अ) राज्यशासनाचा प्रवक्ता म्हणून काम (ब) मंत्र्याला विधिमंडळीय जबाबदारी पार पाडण्यात मदत करणे. (क) विधेयक तयार करणे.

(अ) राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष व सदस्यांना पदावरून काढण्याचा अधिकार राष्ट्रपतींना असतो. (ब) आयोगाच्या अध्यक्ष व सदस्यांचा कार्यकाल 6 वर्षे किंवा 62 वय इतका आहे. (क) विद्यापीठातील एका दृष्टिहीन प्राध्यपकाची राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्यपदी झालेली नियुक्ती, 1993 साली सर्वोच्च न्यायालयाने अयोग्य ठरविली. वरीलपैकी असत्य विधान/विधाने निवडा.

संघ लोकसेवा आयोगाबाबत सत्य विधाने ओळखा. (अ) संघ लोकसेवा आयोगाची सदस्यसंख्या संसद ठरावानुसार ठरविते. (ब) आयोगाला हंगामी अध्यक्ष नियुक्त करण्यासाठी 17वी घटनादुरुस्ती 1965 नुसार करता येते. (क) पद सोडल्यानंतर संघ लोकसेवा आयोगाचा अध्यक्ष व सदस्य दुसऱ्या कार्यकालासाठी अपात्र असतो.

माहितीचा अधिकार कायदा 2005 मधील तरतुदींप्रमाणे खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे?(अ) कलम 7 (1) अन्वये व्यक्तीच्या जीवित व स्वातंत्र्याशी संबंधित माहिती 48 तासात पुरवली पाहिजे.(ब) कलम 11 (3) अन्वये त्रयस्थ पक्षाच्या संदर्भातील माहिती मागितल्यास कालमर्यादा 40 दिवस इतकी असते.

भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, 1988 संदर्भात खालील विधानांपैकी अयोग्य नसलेली विधाने ओळखा. (अ) कायद्यात कलम 3 अंतर्गत विशेष न्यायाधीश नियुक्तीचे अधिकार देण्यात आले आहेत. (ब) केंद्रशासन व राज्यशासन दोघांना विशेष न्यायाधीशांची नियुक्ती करण्याचा अधिकार आहे. (क) विशेष न्यायाधीश हे भूतपूर्व किंवा विद्यमान सत्र न्यायाधीश किंवा अप्पर सत्र न्यायाधीश किंवा सहाय्यक सत्र न्यायाधीश असावेत.

बालकांचे मोफत व सक्तीचे शिक्षण कायदा, 2009 च्या कलम 27 मधील तरतुदींनुसार कोणत्याही शिक्षकास खालीलपैकी कोणती काम/कामे प्राधिकृत करता येणार नाहीत? (अ) स्थानिक प्राधिकरणाच्या निवडणुकीची कामे (ब) दशवार्षिक जनगणनेची (क) आपत्ती निवारणाची कामे

पुढे दिलेल्या विधानांपैकी सत्य विधाने निवडा. (अ) लेखानुदानाची तरतूद घटनेत केली नाही ती संसदीय संकेतामधून चालत आलेली बाब आहे. (ब) अर्थसंकल्पावरील विभागीय स्थायी समित्यांच्या शिफारसी केवळ लोकसभेतच सादर केल्या जातात.

खालीलपैकी अयोग्य विधान ओळखा. (अ) मुख्यमंत्रीपदाची शपथ इतर मंत्र्यांच्या शपथेप्रमाणेच असते. (ब) देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात कमी कालावधीसाठी मुख्यमंत्री बनलेले व्यक्ती आहेत. (क) मुख्यमंत्री पदावर सर्वाधिक काळ राहणारे वसंतराव नाईक हे आहेत. (महाराष्ट्राच्या)

अचूक विधाने ओळखा.(अ) इ. स. 1772 मध्ये वॉरन हेस्टिग्ंज याने जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन केले.(ब) जिल्हाधिकारी हा बहु-उद्देशीय कार्यधारक असतो, ज्याच्याभोवती जिल्ह्याचे संपूर्ण प्रशासन प्रदक्षिणा घालते असे म्हटले जाते.(क) भारत कायदा आयोगाने (1930) 'नागरिकांच्या दृष्टीने जिल्हाधिकारी म्हणजेच सरकार' असे जिल्हाधिकाऱ्याचे वर्णन केले आहे.

सन 2021 साली पार पडलेल्या राज्य विधानसभा निवडणुका पश्चिम बंगालमध्ये किती टप्प्यात पार पडल्या?

कोणत्या न्यायाधीशांच्या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले की भारताच्या सरन्यायाधीशांशी सल्लामसलत केल्याशिवाय उच्च न्यायालयातील कोणत्याही न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात येऊ नये?

भारतीय संविधान हे भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल असे कोणी म्हटले?

नैसर्गिक न्यायाचे तत्त्वे व त्यांचा अर्थ यासंबंधी योग्य जोडी ओळखा.नैसर्गिक न्यायाचे तत्त्व अर्थ

खालीलपैकी कोणत्या हक्काचा समावेश कलम 21 अंतर्गत येत नाही?

महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेचे पहिले अधिवेशन कुठे आणि कधी सुरू झाले?

कलम 165 (जमीन महसूल संहिता 1966) अन्वये अशी कोणतीही जमीन किंवा पाणी जी राज्य शासनाच्या किंवा एखाद्या स्थानिक प्राधिकरणाच्या मालकीची नसेल अथवा त्यावर त्यांचे नियंत्रण नसेल अशा जमिनीबाबतचे हक्क किंवा त्या संबंधी गावाचे रिवाज ठरविणे व त्यांची नोंद करणे यास 'वाजिब उल अर्ज' म्हणतात, अशा नोंदी करण्याचे अधिकार खालीलपैकी कोणास आहेत?

नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वांमध्ये खालीलपैकी कशाचा अंतर्भाव होत नाही?

'भारत विरुद्ध इंडिया' व स्वातंत्र्याची कक्षा (Degree of Freedom) या संकल्पना खालीलपैकी कोणाच्या आहेत?

कोणत्या घटना दुरुस्तीमध्ये दिल्ली आणि पाँडेचेरी यांच्या विधानसभेच्या सदस्यांचा समावेश राष्ट्रपती निवडणुकीच्या निर्वाचन मंडळात केला?

अशोक मेहता समितीच्या शिफारसीनुसार ____________________ राज्यात द्विस्तरीय पंचायत राजचा प्रयोग करण्यात आला होता.

भारतात खुल्या व नि:पक्ष वातावरणात निवडणुका घेण्यासाठी खालीलपैकी कोणती समस्या कारणीभूत आहे?

सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत खालील विधानांचा विचार करा. (अ) पी. व्ही. नरसिंहराव यांच्या कार्यकाळात सुरू झाले. (ब) जिल्हा पातळीवरून हा कार्यक्रम राबविला जातो. (क) 'पढे भारत बडे भारत' हा एक कार्यक्रम या अभियानाअंतर्गत सुरू करण्यात आला योग्य पर्याय निवडा.

खालीलपैकी कोणती विधाने अयोग्य आहे?(अ) भारतात छावणी क्षेत्र पालिकांना लोकसंख्येच्या आधारावर चार प्रकारात विभागले जाते.(ब) छावणी क्षेत्र पालिकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची नेमणूक त्या-त्या राज्यातील राज्यपालाकडून केली जाते.(क) छावणी क्षेत्र पालिकेत एकूण अठरा सदस्य असतात त्यापैकी आठ सदस्य निर्वाचित असतात.

स्री-शिक्षणासंदर्भात 1988-2000 च्या काळातील राष्ट्रीय धोरणात महिला शिक्षणाची ध्येय कोणती होती? (अ) 6 ते 14 वयोगटातील मुलींची गळती थांबविणे (ब) शिक्षण प्रक्रियेतील लिंगभेद, पूर्वग्रह दूर करणे (क) शैक्षणिक कार्यक्रमात महिलांना सहभागी होण्यास भाग पाडणे (ड) पुरुषांबरोबर महिलांना शिक्षणाची गुणवत्ता स्वरुपाबाबत समान संधी देणे

स्री शिक्षणासंबंधी खालीलपैकी कोणती विधाने अचूक आहेत?(अ) सन 2011 च्या जनगणनेनुसार भारतामध्ये स्री शिक्षणाचे प्रमाण 65.4% आहे.(ब) या आकडेवारीनुसार महाराष्ट्रामध्ये हेच प्रमाण 75.5% एवढे आहे.

सार्वजनिक धोरण निर्मितीमध्ये खालीलपैकी कोणत्या बाबी समाविष्ट होतात?(अ) उद्दिष्टे ठरविणे(ब) कृती आराखडा(क) अंमलबजावणी(ड) मूल्यमापन

सार्वजनिक धोरण निर्मितीबाबत खालील विधानांचा विचार करा व बरोबर विधाने ओळखा.(अ) सार्वजनिक धोरणे ही जनतेच्या अंतिम हिताच्या दृष्टिने आखून त्यांची अंमलबजावणी होते.(ब) सरकारचे प्रत्यक्ष निर्णय घेण्याची प्रक्रिया म्हणजे सार्वजनिक धोरण होय.(क) सार्वजनिक धोरणात कायदा, अध्यादेश, कार्यकारी आदेश यांचा समावेश होतो.

खालील विधानापैकी योग्य विधाने कोणती?(अ) सातारा जिल्ह्यात महाराष्ट्रातील सर्वात जास्त ग्रामपंचायती आहेत.(ब) सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाराष्ट्रातील सर्वात कमी ग्रामपंचायती आहेत.

अयोग्य कथने ओळखा.(अ) सी. राजगोपालाचारी यांनी 1959 साली स्वतंत्र पक्षाची स्थापना केली.(ब) 1974 मध्ये हा पक्ष भारतीय लोकदल पक्षात विलिन झाला.

मंत्रीमंडळाबाबत अयोग्य विधान निवडा.

अयोग्य जोडी ओळखा. नदी लवाद वर्ष

नागरी हक्क संरक्षण अधिनियम, 1955 मधील कलम _____________ नुसार राज्य शासनाला सामुदायिक द्रव्यदंड बसवण्याचा प्रदान करण्यात आला आहे.

1976 च्या 42व्या घटनादुरुस्तीत भारतीय राज्यघटनेत मुलभूत कर्तव्यासंबंधी कोणत्या एकमेव कलमाचा समावेश केला?

फक्त कृषी प्रयोजनासाठी आकारणी करण्यात आलेल्या जमिनीमधून माती, दगड, कंकर, मुरुम किंवा इतर कोणताही असा माल काढून नेणे यावर जिल्हाधिकाऱ्यास किंवा भू-मापन अधिकाऱ्यास नियमन करता येईल, अशी तरतूद म. ज. म. संहितेच्या (1966) कोणत्या कलमामध्ये करण्यात आली आहे?

भारतीय राज्य घटनेच्या कोणत्या कलमांद्वारे/कलमाद्वारे धर्म, वंश, जात किंवा लिंग या कारणांवरून कोणत्याही व्यक्तीस मतदार म्हणून अपात्र ठरविण्यास प्रतिबंध केलेला आहे?

महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 मधील प्रकरण तेरा (13) मध्ये देण्यात आलेला अपिले पुनर्रिक्षण व पुनर्विलोकन (App_______, Revision & Review) या अधिकारांबाबत कोणत्या कलमांदरम्यान भाष्य करण्यात आले आहे?

घटनेच्या कोणत्या कलमानुसार मंत्रीमंडळ हे संयुक्तरित्या लोकसभेस उत्तरदायी असते?

भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार 'केंग' भारताच्या राष्ट्रपतीस व राज्याच्या राज्यपालास लेखांकन अहवाल सादर करतो?

कलम 263 नुसार स्थापन करण्यात येणारी 'आंतरराज्यीय परिषद' सर्वोच्च न्यायालयास कोणत्या कलमानुसार असलेल्या सरकारमधील कायदेविषयक विवादांच्या निराकरणाच्या अधिकारक्षेत्रास पूरक आहे?

जिल्हाधिकाऱ्यांच्या भूमिकेबद्दल अयोग्य विधान निवडा.

केंद्रीय राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने नवीन अखिल भारतीय सेवा स्थापन करण्याबाबत राज्यसभेच्या किती सदस्यांचा पाठिंबा आवश्यक आहे?

कोणत्या राज्य सरकारने सन 1969 साली डॉ. पी. बी, राजमल्लार यांच्या अध्यक्षतेखाली केंद्र-राज्य संबंधांचे परिक्षण करण्यासाठी त्रिसदस्यीय समितीची स्थापना केली?

___________ विद्यार्थ्यांसाठी 1989 मध्ये बाबू जगजीवनराम छात्रावास ही (होस्टेल) योजना सुरू करण्यात आली.

पुढीलपैकी कोणत्या राज्यांमध्ये लोकसभा आणि राज्यसभेमध्ये प्रत्येकी एक जागा निर्धारित करण्यात आली आहे. (अ) मिझोराम (ब) त्रिपुरा (क) मेघालय (ड) सिक्किम (इ) मणिपूर (ग) अरुणाचलप्रदेश (फ) नागालँड

खालीलपैकी कोणत्या प्रसिद्ध व्यक्तींनी मुंबईचे शेरीफ म्हणून काम पाहिले आहे? (अ) एम. एल. डहाणूकर (ब) शांताराम डहाणूकर (क) विजय मर्चंट (ड) बंदू सहानी (इ) सुनिल गावसकर (ग) दिलिप कुमार (फ) सुनिल दत्त

माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 च्या कलम 2 (j) नुसार माहितीचा अधिकार या व्याख्येत खालीलपैकी कशाचा समावेश होतो? (अ) एखादे काम, दस्तऐवज यांची पाहणी (ब) दस्तऐवजांच्या टिपण्या, प्रमाणित प्रती घेणे (क) सामग्रीचे प्रमाणित नमुने घेणे (ड) प्रश्न विचारणे (इ) इलेक्ट्रॉनिक प्रकारातील माहिती मिळवणे

खालील पर्यायांमधून नगरपरिषदेची अनिवार्य कामे ओळखा. (अ) सार्वजनिक ठिकाणी दिवाबत्ती करणे. (ब) गलिच्छ वस्त्यांची सुधारणा करणे. (क) अग्निशामक दल उभारणे. (ड) वस्त्यांना नावे व क्रमांक देणे. (इ) कोंडवड्यांची व्यवस्था करणे.

शिक्षणाचा मुलभूत अधिकार अधिनियम बदल योग्य विधाने निवडा. (अ) ह्या अधिनियमांची अंमलबजावणी 1 एप्रिल 2010 पासून सुरू झाली. (ब) कायद्याअंतर्गत 6 ते 14 वयोगटातील सर्व मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण (क) सर्व खासगी शाळांमध्ये पहिलीच्या प्रवेशासाठी आर्थिकदृष्ट्या वंचित समुदयातील मुलांसाठी 25 टक्के जागा राखीव असतात (ड) कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आर्थिक खर्च केंद्र आणि राज्य सरकार भागीदारीत उचलतील

अल्बर्ट व्हॅन डायसी याने कायद्याचे राज्य संकल्पनेची खालीलपैकी कोणती तत्त्वे सांगितली आहेत?(अ) कायद्यापुढे सर्व व्यक्ती समान(ब) कायद्याने आक्षेपार्ह कृत्य करताच शिक्षा दिली जाईल.(क) स्वातंत्र्य हे न्यायालयीन निर्णयानुसारच संरक्षित केलेले असेल.

योग्य विधाने निवडा.(अ) शिक्षणाच्या विविध स्तरांवर नैतिक व आध्यात्मिक शिक्षण द्यावे असे मूल्यशिक्षणासंबंधी राधाकृष्णन आयोगाचे मत होते.(ब) भावनिक एकात्मतेसाठी मूल्यशिक्षण असावे अशी शिफारस 1961 च्या संपूर्णानंद समितीने केली.(क) देशाचे ऐक्य, अखंडत्व व स्वातंत्र्य टिकवण्याचे नैतिक व आध्यात्मिक शिक्षण हेच साधन ठरेल असे श्रीप्रकाश समितीने स्पष्ट केले.

खालीलपैकी कोणते विषय घटनेच्या समवर्ती सूचित अंतर्भूत आहेत? (अ) शिक्षण (ब) व्यवसाय कर (क) वजन व माप/मानके प्रमाण (ड) वीज (इ) वने

स्वातंत्र्यानंतर जिल्हाधिकाऱ्याच्या कार्यालयाचा दर्जा व अधिकार यात घट झाली, याची कारणे खालीलपैकी कोणती?(अ) मोठ्या शहरांमध्ये कायदा व सुव्यवस्थेच्या प्रशासनामध्ये आयुक्त पद्धतीचा उदय झाला.(ब) लोकांमध्ये राजकीय जाणीवा वाढल्या.(क) स्थानिक प्रशासनात पंचायतराजचा उगम(ड) न्याससंस्था कार्यकारी प्रशासनापासून वेगळी झाली.

योग्य जोड्या ओळखा.शिक्षण संस्था स्थापना वर्ष(अ) कलकत्ता मदरसा - 1781(ब) बॉम्बे एज्युकेशन सोसायटी - 1815(क) संस्कृत कॉलेज (बनारस) - 1791(ड) ग्रँट मेडिकल कॉलेज, मुंबई - 1845

धनविधेयकासंबंधी असणारे अनुच्छेद ओळखा. (अ) 177 (1) (ब) 177 (3) (क) 117 (1) (ड) 117 (3)

शिक्षण क्षेत्राने देशासमोरील आव्हाने पेलण्यासाठी शिक्षक प्रशिक्षणात गुणवत्ता व दर्जा सुधारण्यासाठी कोणते उपाय केले पाहिजेत? (अ) समाजातील अधिक बुद्धिमान युवकांना शैक्षणिक सेवाक्षेत्राकडे आकृष्ट करून घेणे (ब) प्रशिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी कार्यप्रणाली विकसित करणे (क) शिक्षण प्रशिक्षणासाठी सोयीसुविधांची निर्मिती करणे कोणती विधाने बरोबर आहेत?

कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम, 2005 अंतर्गत खालीलपैकी कोणत्या बाबींचा कौटुंबिक हिंसाचाराच्या व्याख्येत समावेश होतो?(अ) पीडित महिलेस शारीरिक/मानसिक हानी पोहोचवणारी कृती(ब) पीडित महिलेकडे हुंड्याची मागणी करणारी कृती(क) पीडित व्यक्तीचा शारीरिक, लैंगिक, मौखिक, भावानिक, आर्थिक छळ

माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 अन्वये खालीलपैकी कोणत्या/कोणकोणत्या कायद्यांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे?(अ) भारतीय दंड संहिता(ब) भारतीय पुरावा कायदा 1872(क) रिझर्व बँक कायदा 1934(ड) बँकर्स बुक पुरावा कायदा 1891

योग्य जोड्या जुळवा.(अ) शंकरी प्रसाद वि. भारतीय संघराज्य (i) नवव्या परिशिष्टास आव्हान(ब) ए. के. गोपालन वि. मद्रास राज्य (ii) मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्त्वांचे श्रेष्ठत्व(क) चंपक मदुराईराजन वि. मद्रास राज्य (iii) व्यक्तिगत स्वातंत्र्य(ड) आय. आर. कोहेल्लो वि.तामिळनाडू राज्य (iv) पहिल्या घटनादुरुस्तीचा आव्हान (अ) (ब) (क) (ड)

जोड्या लावा : (मतदार नोंदणी)'अ' (फॉर्म) 'ब' (व्यक्ती)(अ) फॉर्म 7 (i) सामान्य नागरिक(ब) फॉर्म 18 (ii) शिक्षक मतदारसंघ(क) फॉर्म 19 (iii) पदवीधर मतदारसंघ (ड) फॉर्म 6 (iv) मतदार यादीतील नाव कमी करणे (अ) (ब) (क) (ड)

योग्य जोड्या लावा. अनुच्छेद तरतूद (अ) 212 (i) विधानसभा सभापती व उपसभापती (ब) 210 (ii) राज्य विधिमंडळात वापरण्याची भाषा (क) 199 (iii) न्यायालयांचा राज्यविधिमंडळाच्या कामकाजात हस्तक्षेपास प्रतिबंध (ड) 178 (iv) राज्य विधिमंडळातील धनविधेयकाची व्याख्या (अ) (ब) (क) (ड)

73व्या घटनादुरुस्तीमधील तरतुदी आणि कलम यांची जुळणी करा. (अ) ग्रामपातळीवर ग्रामपंचायतीची स्थापना (i) 243(C) (ब) पंचायतीच्या लेखांचे लेखापरिक्षण (ii) 243(O) (क) निवडणुकीसंबंधीच्या बाबीमध्ये न्यायालयीन हस्तक्षेपास मनाई (iii) 243(B) (ड) तिन्ही स्तरांवर प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे सदस्य (iv) 243(J) (अ) (ब) (क) (ड)

अ गट ब गट (अ) के. व्ही. राव (i) एकात्मतेकडे झुकणारे (ब) के. सी. व्हिचर (ii) निम संघराज्यीय (क) ग्रनविल ऑस्टीन (iii) केंद्रीकरण झालेले संघराज्य (ड) आयवर जेनिंग्ज (iv) सहकारी संघराज्य (अ) (ब) (क) (ड)

सामाजिक-आर्थिक व्यायनिर्देशसंबंधी विविध घटनात्मक तरतुदी व कलम यांच्या योग्य जोड्या लावा.तरतुदी संबंधित कलम(अ) स्री-पुरुष यांना समान कामासाठी समान वेतन (i) 39 (A)(ब) बेकारी, वृद्धत्व, आजारपण व अपंगत्व अशा परिस्थितीत सार्वजनिक सहाय्य मिळवण्याचा हक्क (ii) 43(क) समान न्यायाची हमी व गरिबांना मोफत कायदेविषयक सहाय्य (iii) 39 (d)(ड) कामगारांना काम, निर्वाह वेतन, चांगले जीवनमान इ. कामाची परिस्थिती उपलब्ध करून देणे (iv) 41 (अ) (ब) (क) (ड)

योग्य जोड्या जुळवा (पर्यावरण संरक्षण अधिनियम, 1986 नुसार) कलम व्याख्या (अ) 2 (b) (i) जोखमीचा पदार्थ (Hazardous substance) (ब) 2 (c) (ii) प्रदूषण (Pollution) (क) 2 (e) (iii) प्रदूषक (Pollutant) (ड) 2 (f) (iv) भोगवटादार (Occupier) (अ) (ब) (क) (ड)

योग्य जोड्या जुळवा.कलम विषय(अ) 153 (i) राज्यपाल(ब) 161 (ii) माफी संबंधित राज्यपालाचे अधिकार(क) 164 (iii) मंत्र्याबाबत इतर तरतुदी(ड) 176 (iv) राज्यपालाचे विशेष अभिभाषण (अ) (ब) (क) (ड)

माता-पिता व ज्येष्ठ नागरिक देखभाल व कल्याण अधिनियम 2007, मधील विविध कलमे त्यांतील तरतुदी यांच्या योग्य जोड्या लावा.तरतुदी कलमे(अ) निर्वाह अधिकारी (Maintenance Officer) (i) कलम 15(ब) अपिलीय न्यायाधिकरण (Appellate Tribunal) (ii) कलम 18(क) वृद्धाश्रमांची स्थापना (Old Age Homes) (iii) कलम 19(ड) अपराधांची दखल (Cognizance of Offences) (iv) कलम 25 (अ) (ब) (क) (ड)

कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे राष्ट्रीय अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे दोन आयोगामध्ये विभाजन केले गेले?

पंतप्रधान सहित मंत्रिमंडळातील सदस्यांची संख्या लोकसभेच्या एकूण सदस्यसंख्येच्या 15 टक्क्यांपेक्षा जास्त असणार नाही अशी तरतूद कलम 75 मध्ये केली गेली आहे . ही तरतूद कोणत्या घटनादुरुस्ती अन्वये समाविष्ट करण्यात आली?

कोणत्या घटनादुरुस्तीने लोकसभेतील जागाची संख्या 525 वरून 545 इतकी वाढविण्यात आली.

माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 मधील कलम 66B अन्वये चोरीचे संगणक स्रोत किंवा संदेशवहन साधने अप्रामाणिकपणे प्राप्त केल्याबद्दल किती शिक्षा होऊ शकते?

महाराष्ट्रात वर्धा येथे असलेले एकमेव आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी झाली?

प्रेस इन्फर्मेशन ब्युरो (PIB) ची स्थापना _______________ साली करण्यात आली. मुख्यालय _____________ येथे आहे.

पेसा (PESA) कायद्यांतर्गत येणाऱ्या ग्रामसभेची सभा भरण्यासाठीची गणपूर्ती _____________ एवढी आहे.

मातापिता व ज्येष्ठ नागरिक यांचा कल्याण व निर्वाह अधिनियमातील कलम 9 (2) प्रमाणे न्यायाधिकरण जास्तीत जास्त मासिक निर्वाहभत्ता निश्चित केल्याचे आदेश करेल, तथापि पाल्यांकडून देण्यात येणारी निर्वाहभत्त्याची (Maintenanu) रक्कम रु. __________________/ प्रतिमहा पेक्षा जास्त असणार नाही.

मुंबईच्या शेरीफ पदाची नियुक्ती _______________ कालावधीकरता करण्यात येते.

महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायतीचे नियमन करणारा महाराष्ट्र ग्रामपंचायत कायदा 1958 ___________ या दिनांकापासून लागू करण्यात आला.

खालीलपैकी राजकीय पक्ष व आरक्षित चिन्ह यांची अयोग्य जोडी ओळखा.

खालीलपैकी कोणी भारतामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाची निर्मिती केली?

मातापिता व ज्येष्ठ नागरिक यांचा निर्वाह व कल्याण अधिनियमाच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. (अ) 15 (1) प्रमाणे न्यायाधिकरणाच्या आदेशाविरुद्ध अपिल करण्यासाठी, राज्यशासन अधिसूचनेद्वारे प्रत्येक जिल्ह्यात एक अपिलीय न्यायाधीकरण स्थापन करेल. (ब) सदर अपिलीय न्यायाधिकरणाचे अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी अथवा जिल्हाधिकारी यांच्या पेक्षा कमी दर्जा नसलेल्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करेल. बरोबर विधान/विधाने निवडा

योग्य जोड्या जुळवा.कलम तरतूद(अ) 108 (i) धन विधेयकाबाबत विशेष पद्धती(ब) 109 (ii) धन विधेयकाची व्याख्या(क) 110 (iii) संयुक्त अधिवेशनाचे तरतूद (ड) 112 (iv) वार्षिक वित्तीय विवरणपत्र (अर्थसंकल्प) (अ) (ब) (क) (ड)

राज्यघटनेवरील टिकेबाबत योग्य जोड्या लावा. (अ) के. हनुमंतय्या (i) पश्चिमेचे गुलामी अंधानुकरण (ब) एच. बी. कामत (ii) इंग्लिश घोष विभागाचे संगीत (क) पी. आर. देशमुख (iii) सर्वात अवाढव्य (ड) लोकनाथ मिश्र (iv) प्रौढ मताधिकार असलेला, भारत सरकार कायदा, 1935 (अ) (ब) (क) (ड)

कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण आणि 2005 नुसार योग्य जोड्या जुळवा. कलम व्याख्या (अ) कलम 18 (i) संरक्षणाचा आदेश (Protection orders) (ब) कलम 19 (ii) मुलांचा ताबा आदेश (Custody orders) (क) कलम 21 (iii) नुकसानभरपाईचा आदेश (Compensation orders) (ड) कलम 22 (iv) निवास आदेश (Residence Orders) (अ) (ब) (क) (ड)

महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 मधील कलम 149 नुसार राज्यातील कोणत्याही क्षेत्रामध्ये जमीनधारण करणारी, शासकीय पट्टेदार असलेली, जमिनीचा मालक असलेली किंवा कुळ म्हणून अधिकार संपादन केलेली कोणतीही व्यक्ती असा अधिकार तिने संपादन केल्याबद्दल असा अधिकार संपादन केल्याच्या दिनांकापासून A महिन्यांच्या आत तलाठ्यास B कळवील किंवा माहिती देईल. A व B च्या जागी अनुक्रमे काय येईल? हे दिलेल्या पर्यायामधून निवडा.

भारतातील सर्वात मोठी वृत्तसंख्या असणारी प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया (PTI) ची स्थापना कधी झाली?

असा जनसेवक, जो कोणी SC/ST मध्ये मोडत नाही, त्याने अनुसूचित जाती व जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायदा, 1989 नुसार आपले कर्तव्य पार पाडण्यात जाणून बुजून हयगय केल्यास तो जनसेवक कमीत कमी _________________ व जास्तीत जास्त ____________________ पर्यंत कारावासास पात्र ठरेल.

खालीलपैकी कोणत्या राज्याच्या विधानपरिषदेवर सर्वाधिक सदस्यसंख्या असते?

माध्यमिक शिक्षणाला चालना देणे आणि तिची गुणवत्ता सुधारण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेले 'राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान' कोणत्या वर्षापासून सुरू करण्यात आले?

माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 मधील कलम _______________ अन्वये प्रत्येक नागरिकास माहितीचा अधिकार प्राप्त झाला आहे.

खालील विधाने विचारात घ्या. (अ) जिल्हा परिषदतीच्या पहिल्या सभेच्या दिनांकापासून दोन महिन्याच्या आत स्थायी समिती व विषय समित्या स्थापन करेल. (ब) जिल्हा परिषदेने 3 महिन्यांच्या आत सभा बोलवली नसल्यास विभागीय आयुक्त सभा बोलवतील. (क) जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेची नोटीस 15 दिवस अगोदर देण्यात येते. अयोग्य विधान/ने ओळखा.

__________व्या घटनादुरुस्तीने जिल्हा नियोजन समितीला घटनात्मक दर्जा देण्यात आला.

जनहितार्थ याचिकेचा उद्देश काय आहे? (अ) सामाजिक न्याय प्रस्थापित करणे (ब) सर्वसामान्य जनतेला पाठिंबा देणे (क) व्यक्तीहित जोपासण्याचा प्रयत्न करणे (ड) सामाजिक समता प्रस्थापित करणे. योग्य पर्याय निवडा.

खालील विधाने विचारात घ्या. (अ) ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार विभागीय आयुक्तांना असतो. (ब) 73व्या घटनादुरुस्तीने ग्रामपंचायतीचा अध्यक्ष निवडण्याची पद्धत ठरवण्याचा अधिकार राज्यविधान मंडळाला दिला आहे. (क) मुदतीपूर्वी ग्रामपंचायतीचे विसर्जन झाल्यास 6 महिन्यांच्या आत निवडणुका घेण्याचे घटनात्मक बंधन राज्यावर टाकण्यात आले आहे. वरीलपैकी योग्य विधाने ओळखा.

खालीलपैकी कोणत्या समितीच्या शिफारसींच्या परिणाम स्वरूप 'पॉलिटेक्निक' (तंत्रनिकेतन) नावाच्या नव्या तांत्रिक संस्था उदयास आल्या?

Your score is

The average score is 0%

Open chat
Hello 👋
Can we help you?