• समलैंगिकता हा गुन्हा नाही. प्रत्येक व्यक्तीने लैंगिक अग्रक्रम निश्चित करणे हे नैसर्गिक आहे. लैंगिकतेच्या आधारावर एखाद्याबरोबर दुजाभाव करणे म्हणजे त्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणे.• देशात सर्वांना समान अधिकार असायला हवेत, देशात सर्वांना सन्मानाने जगता आले पाहिजे. समलैंगिकांनाही समान अधिकार आहेत, त्यामुळे दोन सज्ञान व्यक्तींनी ठेवलेले संबंध ही खासगी बाब आहे, त्यामुळे तो गुन्हा ठरत नाही, असा ऐतिहासिक निर्णय सुप्रीम कोर्टाने (2018) दिला आहे. जुन्या विचारसरणीला बाजूला सारायला हवे. समाजाने पूर्वग्रह दूषित विचारधारेपासून स्वत:ला मुक्त करायला हवे. • सदान, इराण, सौदी अरब, येमेन, सोमालिया, नायजेरिया या देशांमध्ये समलैंगिक संबंध ठेवणाऱ्यांना मृत्युदंडाची शिक्षा दिली जाते.• अमेरिका, इंग्लंड, रशिया, ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, कॅनडा, स्पेन, दक्षिण आफ्रिका, नॉर्वे, स्वीडन, आइसलँड, पोर्तुगल, अर्जेंटीना, डेन्मार्क, उरुग्वे, न्युझिलंड, फ्रान्स, ब्राझील, इंग्लंड, स्कॉटलँड, फिनलैंड, आयरलँड, ग्रीनलँड, कोलंबिया, जर्मनी, माल्टा या देशांमध्ये समलैंगिक संबंधांना कायदेशीर मान्यता आहे.