सत्यशोधक चळवळीने अनेक प्रचार-माध्यमे उपयोगात आणली. त्यामध्ये सत्यशोधकीय नियतकालिकांचा अग्रक्रमाने समावेश करावा लागतो. याव्दारा धार्मिक/सामाजिक क्षेत्रांत जनजागृतीचे अफाट कार्य केले. समाजनिष्ठ ग्रामीण पत्रकारितेचे हे अपूर्व पर्व सुरू झाले ते दीनबंधु (1877- कृष्णराव भालेकर, नारायण मेघाजी लोखंडे, वासुदेवराव बिर्जे, श्रीमती तानुबाई बिर्जे) व संत्सार (1885- म. फुले) यांच्या पत्रकारितेने.राघवभूषण (1888- गुलाबसिंह कौशल्य), अंबालहरी (1889- कृष्णराव भालेकर), विश्वबंधू (1911- बळवंतराव पिसाळ)अन्य: जागृती (1917- भगवंतराव पाळेकर), जागरूक (1917- वालचंद कोठारी), डेक्कन रयत (1918- अण्णा-साहेब लठ्ठे), विजयी मराठा (1919 - श्रीपतराव शिंदे), सत्यप्रकाश (1919 - नारायण रामचंद्र विभुते), गरिबांचा कैवारी (1920 - बाबूराव यादव), भगवा झेंडा (1920 - दत्ताजीराव कुरणे), तरूण मराठा (1920 - सखाराम पांडुरंग सावंत), राष्ट्रवीर (1921 - शामराव देसाई), प्रबोधन (1921 - के. सी. ठाकरे), संजीवन (1921 - द. भि. रणदिवे), सिंध मराठा (1924 - दत्तात्रय वासुदेव अणावकर), हंटर (1925 - खंडेराव बागल), मजूर (1925 - रामचंद्र लाड), कर्मवीर (1925 - शि. आ. भोसले), नवयुग (1926 - बाबासाहेब बोले), सत्यवादी (1926 - बाळासाहेब पाटील), बाह्मणेतर (1926 - व्यंकटराव गोडे), कैवारी (1928 - दिनकरराव जवळकर)