केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पाची रचनामहसुली अर्थसंकल्प अ) महसुली जमा a) कर उत्पन्न1) उत्पन्नावरील कर2) संपत्ती व भांडवली व्यवहारांवरील कर3) वस्तू व सेवांवरील कर भांडवली अर्थसंकल्पअ) भांडवली जमाa) निव्वळ कर्ज उभारणी (स्थूल कर्ज-कर्ज परतफेड)b) इतर देणी (सरकार वापरीत असलेल्या जनतेच्या अल्प बचती उदा. पेन्शन, प्रॉव्हिडंट जमा, पोस्टातील बचती, NSCc) कर्ज वसुली (राज्य सरकारे, केंद्रशासित प्रदेश, सार्वजनिक उद्योग इ. ना दिलेल्या कर्जाची पुनर्प्राप्ती)d) इतर भांडवली मिळकत, उदा. निर्गुंतवणूकीतून प्राप्त नफाb) करेतर उत्पन्न1) राजकोषीय सेवा : चलनी नोटा व नाण्यांमधून मिळणारा नफा2) व्याज उत्पन्न :- घटकराज्ये व केंद्रशासित प्रदेशांना दिलेल्या कर्जावरील व्याज- रेल्वे व पोस्ट सेवांवरील व्याज- सार्वजनिक, उद्योगांना दिलेल्या कर्जावरील व्याज3) नफा व लाभांश : RBI, सार्व. बँका, LIC, सार्व., उद्योग इ. चा नफा - भांडवली जमा ही जमा नसून एकप्रकारे देणी ठरते.ब) महसुली खर्च भारत सरकारचा सर्वाधिक खर्च - व्याज देयता + अनुदाने1) केंद्र-पुरस्कृत व केंद्रीय योजनांवरील महसुली खर्च, उदा. सामाजिक मालमत्तेच्या (Assets) देखभालीवरील खर्च2) घेतलेल्या कर्जावरील व्याज खर्च/व्याज दिले3) संरक्षणाच्या महसुलीखर्च4) अनुदाने (अन्न, खते, पेट्रोलियम अनुदाने)5) नागरी प्रशासन खर्च : पगार, पेन्शन, कार्यालयीन खर्च इ.6) राज्यसरकारे व केंद्रप्रदेशांना दिलेली अनुदाने ब) भांडवली खर्च1) केंद्र-पुरस्कृत व केंद्रीय योजनेवरील भांडवली खर्च (उदा. कृषी, ग्रामीण विकास, जलसिंचन, पूर नियंत्रण, ऊर्जा, उद्योग)2) राज्ये व केंद्र प्रदेशांच्या योजनांना केंद्राने दिलेल्या मदतीतील भांडवली खर्च3) संरक्षणाचा भांडवली खर्च4) राज्ये, केंद्र. प्रदेश, सार्व. उद्योग इ. ना दिलेली कर्जे5) घेतलेल्या कर्जाची परतफेड