१० ऑगस्टला चाणक्य मंडल परिवारच्या स्थापनेला २६ वर्ष पूर्ण - Chanakya Mandal Pariwar

 

येत्या १० ऑगस्टला चाणक्य मंडल परिवारच्या स्थापनेला २६ वर्ष पूर्ण होत आहेत. ✨

वर्ष १९९६ मध्ये चाणक्य मंडल परिवारचे संस्थापक श्री. अविनाश धर्माधिकारी सर यांनी चाणक्य मंडल परिवार या न्यासाची स्थापना केली आणि १० ऑगस्ट १९९६ रोजी श्री. किरण बेदी (निवृत्त IPS अधिकारी) यांच्या हस्ते कार्याचा शुभारंभ करून लगेच शैक्षणिक उपक्रमांना सुरुवात केली. येत्या १० ऑगस्टला या सुवर्णक्षणाला २६ वर्ष पूर्ण होत आहेत.
वैश्विकतेचे भान आणि कर्तृत्व असलेली युवापिढी निर्माण करणे आणि राष्ट्रीय चारित्र्याचे व्यावसायिक तज्ज्ञ तयार व्हावेत हे VISION डोळ्यासमोर ठेवून १९९६ साली पेरण्यात आलेले बीज म्हणजे चाणक्य मंडल परिवार. स्पर्धापरीक्षेमध्ये यश मिळवून स्वच्छ आणि कार्यक्षम कार्यकर्ता अधिकारी घडवावेत, हे उद्देश डोळ्यासमोर ठेवून चाणक्य मंडल परिवार मागील २६ वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात आपले कार्य करीत आहे. आणि म्हणूनच, वर्धापन दिनाचे औचित्य साधून चाणक्य मंडल परिवार जाहीर व्याख्यानाचे आयोजन करीत आहे.
विषय: प्रशासन आणि Ethics
वक्ते:
श्री. अविनाश धर्माधिकारी सर
माजी सनदी अधिकारी,
संस्थापक, संचालक – चाणक्य मंडल परिवार
हा कार्यक्रम सर्वांना चाणक्य मंडल परिवारच्या YouTube चॅनेलवर दिनांक १० ऑगस्ट, रोजी संध्या. ६ वाजता, Live पाहता येणार आहे.
सर्वांना चाणक्य मंडल परिवारतर्फे या व्याख्यानाचे सस्नेह निमंत्रण! 🙏✨