Avinash Dharmadhikari Sir’s GS Special UPSC-MPSC Course

अविनाश धर्माधिकारी सरांचा UPSC-MPSC स्पर्धापरीक्षांसाठी

‘स्पेशल कोर्स’

शिक्षण क्षेत्रात अशी एक संकल्पना आहे, की त्या क्षेत्रातले, त्या विषयातले अनुभवी, तज्ज्ञ मार्गदर्शकांचा ‘स्पेशल कोर्स’ घेतला जातो.

ज्या विद्यार्थ्यांना त्या तज्ज्ञ व्यक्तीचे मार्गदर्शन हवे आहे, ते या ‘स्पेशल कोर्स’ ला नाव नोंदवतात.

वेळापत्रकाच्या भाषेत असा कोर्स फार ‘हेवी’ – व्यस्ततेचा नसतो, पण तज्ज्ञ मार्गदर्शकांनी आपला सर्व अनुभव त्या कोर्समध्ये ओतलेला असतो.

2018-19 या शैक्षणिक वर्षात अविनाश धर्माधिकारी सरांचे असे दोन कोर्सेस आयोजित करत आहोत.

याचा आम्हाला – म्हणजे चाणक्य मंडल परिवाराला अर्थातच आनंद वाटतो.

विद्यार्थी, पालकांसहित सर्वांनाच असा आनंद वाटेल, आनंद मिळेल अशी आशा आहे.

स्पेशल कोर्स – 1

UPSC/MPSC इंग्लिश माध्यम

जुलै 2018 ते मार्च 2019 या कालावधीत

दर शनिवारी संध्याकाळी 5 ते 7 या वेळात,

एकूण 40 व्याख्यानांचा

MPSC/UPSC दोन्हींसाठी उपयुक्त

UPSC पूर्वपरीक्षा जूनमधे होते. मे महिन्यात उजळणी आणि टेस्ट सीरीज असते, म्हणून हा कोर्स एप्रिल अखेरीस पूर्ण होईल.

शुल्क – 8500/-+ GST (18%)

कोर्स सुरू – 14 जुलै 2018

स्पेशल कोर्स – 2

MPSC/UPSC मराठी माध्यम

जुलै 2018 ते एप्रिल 2019 या कालावधीत

दर रविवारी 09.30 ते 11.30 या वेळात

एकूण 35 व्याख्यानांचा MPSC/UPSC दोन्हींसाठी उपयुक्त

MPSC पूर्वपरीक्षा सर्वसाधारणपणे एप्रिलमधे होऊ शकते – म्हणून हा कोर्स मार्च अखेरीस पूर्ण होईल.

शुल्क – 7500/- + GST (18%)

कोर्स सुरू – 15 जुलै 2018

For Registration -: http://chanakyamandal.info/applicantLogin.htm

 

ठळक वैशिष्ट्ये :

– पूर्व आणि मुख्य परीक्षा, मुलाखत तंत्र, अभ्यास कौशल्यासहित मुख्य फोकस GS वर.

– स्वतः धर्माधिकारी सरांचे मार्गदर्शन

– अभ्यास साहित्यात ‘नवा विजयपथ’, कोर्सच्या कालावधीत चाणक्य मंडल परिवारचे ‘स्पर्धापरीक्षा तयारी’ मासिक आणि ‘स्वतंत्र नागरिक’ हे साप्ताहिक आणि धर्माधिकारी सरांच्या सर्व जाहीर व्याख्यानमालांचा ‘ऑडिओ’ पेन ड्राईव्ह.

– विज्ञान विषयातली प्रत्येकी 3 (इंग्लिश आणि मराठी) व्याख्याने – या विषयातले जागतिक तज्ज्ञ डॉ. भूषण केळकर यांची.

– भूगोल घटकाचीही प्रत्येकी 3 (इंग्लिश आणि मराठी) व्याख्याने – भूगोल विषय घेऊन UPSC मधे यश मिळवलेल्या, चाणक्य मंडल परिवारच्या फॅकल्टी असलेल्या ‘कार्यकर्ता अधिकऱ्यांची’.

चाणक्य मंडल परिवारचा अनुक्रमे UPSC किंवा MPSC चा पूर्ण ‘कॉम्प्रिहेन्सिव्ह’ कोर्स करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्या कोर्सच्या शुल्कातच अनुक्रमे इंग्लिश किंवा मराठीतला ‘स्पेशल कोर्स’ मिळेल.

याचा अर्थ 2018-19 मधे चाणक्य मंडल परिवारचा UPSC किंवा MPSC ‘कॉम्प्रिहेन्सिव्ह’ कोर्स करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येक आठवड्याला धर्माधिकारी सरांची 2 सत्रे मिळतील – 1 स्पेशल कोर्समधले व्याख्यान आणि 2 – नियमित शंका, प्रश्नोत्तरांचे ‘इंटरॅक्टिव्ह’ सत्र.

आणि सर्वात मुख्य म्हणजे,

सर्वांना सर्वकाळ सर्व शुभेच्छा आहेतच