Target MPSC In Corona Times - Chanakya Mandal Pariwar
MPSC batch

नमस्कार विद्यार्थीमित्रांनो,

सध्या आपल्या सर्वांना कोरोना या भीषण महामारीच्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. या समस्येला प्रशासन ज्या चिकाटीने व धैर्याने सामोरे जात आहे, हे नक्कीच कौतुकास्पद आहे. आणि या प्रशासनामध्ये येण्यासाठी आपण स्पर्धापरीक्षा हे क्षेत्र निवडले आहे, याबद्दल सर्वांचे अभिनंदन.

मित्रांनो, कोरोनामुळे सामाजिक, आर्थिक, राजकीय या सर्वच क्षेत्रांवर विपरित परिणाम होत आहेत. लॉकडाऊनसारख्या उपाययोजनांमुळे सर्वांनाच घरी बसून राहावे लागत आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत स्पर्धापरीक्षांचे विद्यार्थी म्हणून आपल्यासमोर अनेक प्रश्न उभे आहेत आणि ते स्वाभाविकच आहे. गेले संपुर्ण वर्षभर किंवा त्याहून जास्त काळ अभ्यास करून पूर्वपरीक्षेला सज्ज झालेल्या विद्यार्थ्यांसमोर आता  परीक्षा होणार का ? होणार तर कधी होणार ? मी नक्की काय करू ? कोणत्या विषयाचा/ परीक्षेचा  अभ्यास करू ? किंवा अभ्यासच करू कि नको ? अश्या प्रकारचे प्रश्न पडत असतील. हे सगळे प्रश्न हाताळण्याचा Best possible way काय असू शकतो हे आपण पाहणार आहोत.

यातला सगळ्यात  महत्वाचा  प्रश्न म्हणजे परीक्षा होणार का ? किंवा कधी होणार ? आयोगाने किंवा सरकारने कधी कुठेही असं सांगितलेलं नाही कि परीक्षा रद्द झाली आहे. आयोगाने स्पष्ट सांगितले आहे कि , या काळात परीक्षा घेणे शक्य नसल्यामुळे सर्व परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात येत आहेत. याचा अर्थ परिस्थिती सुधारल्यानंतर सर्व परीक्षा होणार आहेत आणि त्या सर्व परीक्षा probably खूप कमी अंतराने होतील. तेंव्हा, आपण कुठल्याही गैरसमजात न राहता येऊ घातलेल्या राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षा , संयुक्त पूर्व आणि मुख्य आणि तत्सम सर्व परीक्षेसाठी तयार असणे गरजेचे  आहे.  तरीही कोणाला शंका येत असेल तर स्वतःलाच एक प्रश्न विचारा . “Do we have any other option than to study”?  याचं उत्तर जर yes असेल तर तुम्हाला हवं ते करा आणि जर ‘नाही’ असं असेल आणि कॉम्पिटिशन मध्ये टिकायचं असेल तर काही बेसिक गोष्टी कराव्याच लागणार आहेत.

असे म्हणतात की, शांततेच्या काळात जास्त घाम गाळला तर युद्धाच्या काळात कमी रक्त सांडावं लागतं. खरंच,गेले वर्षभर नीट अभ्यास करून पूर्वपरीक्षेसाठी सज्ज झालेल्या किंवा या आधीही पूर्वपरीक्षेस सामोरे गेलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा शांततेचा काळ आहे. मग या काळाचा MPSC  युद्धाच्या तयारीसाठी उपयोग कसा करून घेता येईल ?

बऱ्याच विद्यार्थ्यांची अशी शंका आहे की, फक्त पूर्वपरीक्षेचाच अभ्यास परत करायचा का? तसेच तेच-तेच अभ्यास साहित्य वाचताना तोच फोकस अथवा रस राहत नाही. मग अशा वेळेस काय करावं? मित्रांनो, इथं लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे पूर्वपरीक्षेसाठी असणारे core subjects पुढे जाऊन आपल्याला mains च्या अनुषंगाने अधिक सविस्तर करावे लागणारच आहेत. त्यामुळे हा शांततेचा काळ आपण मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी वापरल्यास आपण win-win situation मध्ये असणार आहोत. आपण मुख्य परीक्षेचा अभ्यास केल्यास आपला पूर्वपरीक्षेतील GS  च्या २०० गुणांच्या पेपरचाही अभ्यास होणार आहे. तसेच नवीन काहीतरी वाचत असल्याने हा अभ्यास आपण तितकाच एन्जॉय करणार आहोत.

राज्यसेवा मुख्य आणि संयुक्त मुख्य परीक्षा यांची जोड घालून असे कुठले विषय आपण आत्त्ता अभ्यासासाठी निवडू शकतो ज्याचा आपल्याला पूर्व परीक्षेमध्येही फायदा होईल हे आपण क्रमाने बघूया . मी खाली एक यादी करून देत आहे ज्यात असे विषय आहेत जे तुम्ही केले नसतील तर  करून ठेवा जेणेकरून मुख्य परीक्षेचा भार हलका होईल आणि  पूर्वपरीक्षेतही मदत होईल.

 

GS 1:

a-महाराष्ट्राचा इतिहास – गाठाळ किंवा कठारे (कोणतेही एक)

b- पोस्ट इंडिपेन्डेन्स (प्रधानमंत्री सीरिज  भाग १ आणि नुकताच आलेला भाग २)

c – महाराष्ट्राचा भूगोल (दीपस्तंभ प्रकाशन)

 

GS 2:

a- निवडणूक प्रक्रिया-सुधारणा, आजपर्यंतच्या सगळ्या सार्वत्रिक निवडणुका आणि त्यांचे महत्व, सर्व पॉलिटिकल पार्टीज, त्यांचा इतिहास, निवडणुकीतील कामगिरी इ. (Wikipedia)

b – पंचायतराज (मनोज राऊत सरांचा संपूर्ण नि:शुल्क विडिओ कोर्स: चाणक्य मंडल YouTube चॅनेल वर मोफत उपलब्ध आहे)

c – कायदे हा भाग (कलमं लक्षात ठेवणे)

d- संविधान सिरीज (Rajya Sabha TV)

 

GS 3:

a – HRD आणि HR (I.P. सर book) फोकस ऑन HRD

 

GS 4:

a – Science-Tech मधला syllabus बघून विकिपीडिया वरून नोट्स काढून ठेवा (Specifically- Energy, Nuclear and Disaster management)

 

मराठी : मो रा वाळिंबे सरांचं पुस्तक (याचा फायदा राज्यसेवा तसेच combine च्या mains मधेही होणार आहे)

 

English: व्याकरण सुधारण्यावर भर द्या. (Pal and Suri  किंवा बाळासाहेब शिंदे कोणतंही एक Book)

 

बेसिक इंग्लिश सुधारण्यासाठी : दररोज किमान अर्धा तास  इंग्लिश न्युज  पेपर चे “फास्ट अँड लाऊड रीडिंग” करणे (books, article काहीही वाचू शकता). वाचताना अवघड वाटलेले शब्द पाठ करा.

 

CSAT:  वाचन वेग वाढवा यासाठी प्रयत्न करा. कोणतीही गोष्ट वाचल्यानंतर किमान ५-१० मिनटं  त्यावर चिंतन करा म्हणजे आकलन वाढेल. यातून comprehension च्या ५० प्रश्नांची तयारी आपोआप होईल. (what else do we need ?)

 

टीप : आजपर्यंत तुम्ही केलेला अभ्यास आणि Priorities लक्षात घेऊन वरील विषय आणि टॉपिक निवडा.

 

सोबतच मी एक लिंक देत आहे. त्यात सामान्य अध्ययन (GS) चे 17 टेस्ट पेपर आहेत. त्यातले 12 हे विषयनिहाय (प्रत्येक विषयाचे 2 पेपर) आणि  आयोगाच्या धर्तीवर 5 Full length  टेस्ट पेपर आहेत. त्यातच Answer Key पण दिलेली आहे. प्रत्येक दिवसाआड एक असे हे पेपर सोडवा आणि self-analysis करा.

Link:  https://forms.gle/cDFro7ddpd33RRyJ8

 

काही गोष्टी कायम लक्षात असुद्या. :

1-आपल्याला आज ना उद्या अभ्यास करावाच लागणार आहे. तुम्ही जेवढी चालढकल कराल तेवढं तुमचं यश पुढे जाणार आहे.

2- आपण दिवसात किमान ५-६ तास अभ्यास करत आहोत ना याची काळजी घ्या.

3- वेब सिरीज, movies, गेम खेळणे हे करताना अभ्यास राहून जातोय असे होऊ देऊ नका.

4- सध्या सोशल मीडिया वर MPSC   अभ्यासाच्या नावाखाली निरुपयोगी माहिती प्रचंड प्रमाणावर येत आहे. त्यात तुमचा वेळ वाया जाऊ देऊ नका.

5- आपल्या Syllabus शी संबंधित काही असेल तरच ऐका, वाचा.

अशा प्रकारे घरी राहून आपल्या अभ्यास जोमात सुरू ठेवा. लक्षात ठेवा, आज तुम्ही अभ्यास नाही केलात तरी तुमचा प्रतिस्पर्धी त्याच जोमाने अभ्यास करतोय. या स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी आणि स्वतःला विजयासाठी तयार ठेवण्यासाठी या lockdown मध्ये तुम्हीच स्वत: तुमचा विजयपथ तयार करा. 

  • कसलीही अडचण ,शंका असेल तर Feel free to share with us on
  • Visit us on: https://lms.chanakyamandal.org/

Chanakya Mandal Pariwar is looking forward to your Success and Happiness.

All the best Wishes, always!

  • अभिजीत शिंदे (Selected as Officer MHA, तसेच चाणक्य मंडलचे सुविख्यात फॅकल्टी)

(Lockdown च्या काळात काय करावे यासाठीचा अभिजीत शिंदे सरांचा हा विडियो पाहा:

https://youtu.be/d2chA6o-osY?list=PLknzzS8Os0tfNqJmWswP6w457HqLeGU47