Chanakya Mandal IAS Academy, the best IAS Guidance Center in Pune

Why Upasana and Prarthana?

All lectures at Chanakya begin with the Upasana (उपासना) and end with our Prarthana (प्रार्थना)

Modern science has shown the efficacy of prayer and meditation: which forms the core of education at Chanakya Mandal Pariwar. Chanakya Mandal Pariwar start with meditation – ‘Upasana’ and end with Prayer. Two together represent India’s universal message which transcends all boundaries of class, caste, religion, language, sex…. even nation.

आता आधुनिक शास्त्रानेही प्रार्थना आणि उपासनेचे महत्त्व सांगायला सुरुवात केली आहे. चाणक्य मंडल परिवारमधील शिक्षणाचा तर तो आत्मा आहे. चाणक्य मंडल परिवारमध्ये प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात उपासनेने होते आणि शेवट प्रार्थनेने होतो. या दोन्हींत मिळून भारताने विश्वाला दिलेला संदेश सामावलेला आहे, जो सर्व जाती, वर्ग, धर्म, भाषा, लिंग … यांच्या पार आहे.

UPSC Coaching Institute in Pune

Dharmadhikari Sir with his eyes closed for Upasana

Upasana (उपासना)

चाणक्य मंडल परिवारची उपासना

काही काळ डोळे मिटून पूर्ण मौन आणि तंबोरा वादन. नंतर…

हरिः ॐ, ॐ, ॐ

ॐ  सह नाववतु सह नौ भुनक्तु सहवीर्यं करवावहै

तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै

ॐ शांति: शांति: शांति:

ॐ, ॐ, ॐ

गुरुब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवोमहेश्वर:

गुरु: साक्षात्परब्रह्म तस्मै श्रीर्गुरवेनम:

ॐ, ॐ, ॐ

सर्वेऽत्र सुखिन: सन्तु सर्वेसन्तु निरामया:

सर्वेभद्राणि पश्यन्तु मा कश्चिद्दु:खमाप्नुयात्

ॐ  तत् सद्, ॐ तत् सद्, ॐ  तत् सद्

ॐ  शांति: शांति: शांति:

The Meaning OM – is the symbol and primal intonation that represents ‘one’-ness of the Universe, the existence.
Shloka 1 – We all shall be one. Everything from meals to conquest shall be done by us together. Unitedly and brilliantly shall we study? We shall not despise one another. Om, Peace, Peace, Peace.

पहिला श्लोक:  आम्ही सर्व एक असू. आहारापासून ते पराक्रमापर्यंत सर्व बाबी आम्ही एकत्रितपणे करू. तेजस्वीपणाने अध्ययन करू. आम्ही एकमेकांचा द्वेष करणार नाही.

Shloka 2 – Guru is the Brahma(the creator), Guru is the Vishnu (the sustainer), Guru is the Shankar (the destroyer). Guru is the manifestation of the Supreme being.

दुसरा श्लोक: गुरु हा ब्रह्मदेव आहे (निर्माता), गुरु हा विष्णू आहे (पालनकर्ता), गुरु हा भगवान शंकर (संहारक) आहे. गुरु म्हणजेच साक्षात्  परब्रह्म आहे. अशा या गुरुला माझा नमस्कार असो.

Shloka 3 – Let everyone on this earth be happy. Let everyone enjoy good health. Let everyone see and experience the goodness. Let no one be in pain. Om, Peace Peace Peace.

तिसरा श्लोक : या भूतलावरचे सर्वच जण सुखी होवोत, सर्वजण निरोगी राहोत, सगळ्यांचे कल्याण होवो, इथे कुणीही दु:खी राहू नये.

Prarthana (प्रार्थना)

*This prayer is a modification of an original poem that ‘happened’ to A.B.Dharmadhikari Sir when he was selected in the IAS. He wrote to himself about the kind of officer – the ‘Karyakarta Adhikari’ that he wanted to be. Now in its modified form, it is our prayer at Chanakya Mandal Pariwar.

प्रार्थना

नव्या वैभवाचीच स्वप्ने सजावी

मनी हास्य लेऊन मुक्ती•जगावी

हवी फक्त उन्मुक्त निर्माणशक्ती || १ ||

 

नवी ध्येयआसक्त प्रल्हाद भक्ती

अहंता गळावी अभंगास म्हणता

तपस्येत तल्लीन आतून होता || २ ||

 

प्रतिभेस मस्तीत आकार यावे

उरी उत्तमाचेच ओंकार गावे

जरी एक अश्रू पुसायास आला

तरी जन्म काहीच कामास आला

जरी अश्रु विस्फोट होऊनि सजला

तरी मुक्त ज्वालामुखी जन्म झाला || ३ ||

The Meaning (प्रार्थनेचा अर्थ)

श्री. अविनाश धर्माधिकारी ज्यावेळी IAS साठी निवडले गेले त्यावेळी त्यांनी स्वत:साठी लिहिलेले एक काव्य आहे. आपण कशा प्रकारचे अधिकारी व्हायचे, थोडक्यात ‘कार्यकर्ता अधिकारी’’असे  स्वत:लाच सांगणारी ती कविता आहे. त्या मूळ कवितेचेच थोडे बदललेले रूप म्हणजे चाणक्य मंडल परिवारची ही प्रार्थना आहे.

Stanza 1 – Let’s celebrate the dreams of new richness (in all forms – the material, psychological, intellectual – and of course spiritual). Let’s live liberation with smiles in our minds. May we possess free-spirited creativity. And an ever fresher faith and devotion(like Prahlad). * The last 2 lines are to be sung as a dhrupad of our prayer.

पहिले कडवे: ऐहिक, मानसिक, बौद्धिक आणि अर्थातच आध्यात्मिक सुद्धा… नव्या वैभवाची स्वप्ने आपण साकार करूया. जगापासून फटकून राहणारी वाकड्या तोंडाची नव्हे, तर मनात हास्य ल्यालेली तृप्त अशी मुक्ती जगूया. सर्व साखळ्या गळून पडलेली प्रतिभासंपन्न अशी उत्फुल्ल नवनिर्मिती आपल्या हातून घडावी. भक्त प्रल्हादाची जी अटळ निश्चयशक्ती होती, ती आपल्यात यावी, म्हणजे आपण आपले ध्येय गाठू शकू.

Stanza 2 – May we conquer our ego, as we sing the songs of devotion, as we are devoted to our hard work. May our creativity come from within, find spontaneous form and our hearts sing (the omkar) the songs of excellence. And with all this

दुसरे कडवे: आपापल्या आयुष्यात जे काही बनण्याचा आपला निश्चय झाला आहे, त्या साधनेतले आपण सर्वजण साधक आहोत. मग ही साधना करताना आपला अहंकार सहजगत्या गळून पडावा. ज्ञानतपस्या करताना आपण नम्र होऊन त्यात तल्लीन होऊन जाऊया. ‘मी जे काही करीन ते उत्तम आणि प्रतिभासंपन्न करीन’ असेच स्वत:ला सांगत (ॐ कार गात) आपण ही साधना करूया. ‘मस्ती’चे’अर्थ दोन्ही: तल्लीन होत आणि तारुण्यसुलभ सर्व प्रकारची धमाल करत… तरीही या सर्वांतून विधायक नवनिर्मितीची आस बाळगणे.

Stanza 3  – If we can wipe even a single tear from a single weeping eye, only then does life have true meaning. (But wiping a tear is not enough). If we awaken the explosive lava hidden in those tears, then free, a liberated volcano of creative energy shall burst.

तिसरे कडवे : दु:खितांचा एक अश्रू जरी आपण पुसू शकलो तरी जीवन धन्य झाले असे जरूर मानूया. पण केवळ अश्रू पुसणे पुरेसे नाही. (ते पुन्हा वाहतील आणि पुसायला कुणीतरी दुसरा येण्याची वाटही पाहायला शिकतील.) दु:खामागच्या कारणाशी संघर्ष करण्याची शक्ती जर आपण त्यांच्यात निर्माण करू शकलो (माणसांचे सबलीकरण), म्हणजेच तो विस्फोट जर आपण घडवून आणू शकलो तर त्या विस्फोटक अश्रूंतूनच उद्याच्या निर्मितीक्षम ऊर्जेच्या ज्वालामुखीचा उद्रेक होईल. असा उद्रेक व्हावा यासाठी आपण आज त्यांचे अश्रू पुसायचे आहेत.

UPSC MPSC Session

Students with their eyes closed for Prarthana