bg_image

Polity & Governance

1 / 999

भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका ही _________ आहे.
अ) राज्यघटनेचे हृदय ब) राज्यघटनेचा आत्मा
क) राज्यघटनेचे डोके ड) यापैकी नाही
योग्य पर्याय निवडा.

2 / 999

योग्य जोड्या जुळवा.
व्यक्ती प्रास्ता विकेबद्दल मते
अ) नानी पालखीवाला i) सर्वोत्तम मसुदा
ब) एम. व्ही. पायली ii) घटनेचे ओळखपत्र
क) एम. हिदायतुल्ला iii) कल्याणकारी राज्याची तत्त्वे
ड) जे. बी. कृपलानी iv) घटनेचा आत्मा
पर्यायी उत्तरे :
अ ब क ड

3 / 999

"भारताचे सार्वभौमत्व, एकता आणि एकात्मता" या शब्दांचा उल्लेख खालीलपैकी कशामध्ये करण्यात आला
आहे?

4 / 999

"भारतीय घटनेचा सरनामा हे आमचा विचार व आमची स्वप्ने काय आहेत हे दाखवते." असे सरनाम्याचे
वर्णन कोणी केले?

5 / 999

प्रस्तावनेतील शब्दांचा विचार करा आणि हे शब्द प्रस्तावनेत ज्या योग्य क्रमानुसार येतात तो पर्याय निवडा.

6 / 999

भारतीय कौन्सिल कायदा, 1861 बाबत खालील विधानांचा विचार करा.
अ) 1861 च्या भारतीय कौन्सिल ॲक्टमुळे कायदे करण्याच्या प्रक्रियेत भारतीय सहभागी हो् ऊन प्रातिनिधीक
संस्थांचा प्रारंभ झाला.
ब) लॉर्ड कॅनिंगने इ.स. 1862 मध्ये त्याच्या कौन्सिलमध्ये बनारसचा राजा, पतियाळाचे महाराज व सर
दिनकर राव या तीन भारतीयांना नामनिर्देशित केले होते.
योग्य विधान / ने ओळखा.

7 / 999

1919 च्या भारत कायद्याबाबत खालील विधानांचा विचार करा.
अ) 1919 चा भारत सरकार कयादा मोर्ले-मिंटो कायदा म्हणूनही ओळखला जातो.
ब) या कायद्यान्वये मुस्लिम, शीख, भारतीय ख्रिश्चन, अँग्लो इंडियन आणि युरोपीयन यांच्यासाठी स्वतंत्र
मतदार संघाची तरतूद करण्यात आली.
क) 1919 च्या कायद्याने मालमत्ता कर किंवा शिक्षण या आधारावर मर्यादित लोकांना मताधिकार देण्यात
आला.
ड) लॉर्ड मिंटो याला 'सांप्रदायिक मतदारसंघाचे जनक' म्हणूनही ओळखतात.
चुकीचे/ची विधान/ने ओळखा.

8 / 999

सायमन कमिशनने खालीलपैकी कोणत्या शिफारसी केल्या होत्या?
अ) प्रांतिक स्वायत्तता ब) मतदारांची संख्या वाढवावी.
क) कायदेमंडळात प्रतिनिधींची संख्या वाढवावी. ड) केंद्रात द्विदल शासन पद्धतीचा स्वीकार करावा.

9 / 999

ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीची भारतातील व्यापारविषयक मक्तेदारी कोणत्या कायद्यान्वये संपुष्टात आली?

10 / 999

खालीलपैकी कोणत्या कायद्याला केंद्रीय लोकसेवा आयोगाचा उगमस्रोत मानले जाते?

11 / 999

खालीलपैकी कोणत्या कायद्यानुसार कलकत्ता येथे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली तसेच
भारतात केंद्रीय प्रशासन व्यवस्थेची पायाभरणी झाली?

12 / 999

1919 चा इंडियन कौन्सिल अॅक्ट म्हणजे -----.
अ) मॉर्ले-मिंटो सुधारणा कायदा
ब) महिलांना मताधिकार देणारा कायदा.
क) प्रांतात द्विशासन पद्धती लागू करणारा कायदा.
ड) भारतात जबाबदार राज्य पद्धतीविषयी पायाभरणी करणारा कायदा.

13 / 999

खालीलपैकी कोणते भारत सरकार अधिनियम, 1935 चे वैशिष्ट्य नाही?

14 / 999

जोड्या जुळवा
'I' 'II'
अ) भारत सरकार कायदा, १९०९ i) ब्रिटिश भारताचे कें द्ीकरण पूण्त
ब) चार्टर ॲक्ट, १८५३ ii) कायदे विषयक व कार्यकारी कायदे यांच्यात विभागणी
क) भारत सरकार कायदा, १८५८ iii) स्वतंत्र निर्वाचन आयोगाची तरतूद
ड) चार्टर ॲक्ट, १८३३ iv) भारतमंत्री पद निर्माण केले
पर्यायी उत्तरे :
अ ब क ड

15 / 999

खालीलपैकी कोणत्या कायद्याने ब्रिटिश भारतात दुहेरी शासनपद्धतीची सुरुवात झाली?
1) रेग्युुलेटिंग ॲक्ट 1773 2) पिट् स् ॲक्ट - 1784
3) चार्टर ॲक्ट - 1813 4) भारत शासनाचा कायदा 1858
22. खालीलपैकी कोणत्या कायद्याने ब्रिटिश भारतात दुहेरी शासनपद्धतीची सुरुवात झाली?
1) रेग्युुलेटिंग ॲक्ट 1773 2) पिट् स् ॲक्ट - 1784
3) चार्टर ॲक्ट - 1813 4) भारत शासनाचा कायदा 1858
22. खालीलपैकी कोणत्या कायद्याने ब्रिटिश भारतात दुहेरी शासनपद्धतीची सुरुवात झाली?

16 / 999

पुढीलपैकी कोणत्या तरतुदी या भारत सरकार कायदा, 1935 मध्ये नमूद केलेल्या आहेत?
अ) प्रांतांमध्ये द्विगृही कायदेमंडळ
ब) प्रांतातील द्विदल शासनपद्धती रद्द
क) भारतमंत्र्यांची इंडिया कौन्सिल रद्द
ड) भारतमंत्र्यांचा पगार ब्रिटिश तिजोरीतून देण्यास सुरुवात
पर्यायी उत्तरे

17 / 999

खालील विधाने वाचून योग्य त्या पर्यायाची निवड करा :
1) 1919 च्या अधिनियमाद्वारे आठ प्रमुख प्रांतात द्विदल शासन पद्धती लागू करण्यात आली.
ii) 1919 च्या अधिनियमाद्वारे ओरिसा आणि सिंध या प्रांतांची निर्मिती करण्यात आली.
iii) 1919 च्या अधिनियमाद्वारे केंद्रीय आणि प्रांतीय विषयांचे सविस्तर वर्गीकरण करण्यात आले.
iv) भारतात संघराज्य लागू करण्याच्या दृष्टीने 1919 चा अधिनियम निराशाजनक दृष्ट्या अपयशी ठरला.
पर्यायी उत्तरे :

18 / 999

भारतीय स्वातंत्र्य कायदा - 1947 मुळे संविधान सभेच्या स्थानामध्ये झालेल्या बदलाबाबतची खालील
विधाने विचारात घ्या.
अ) संविधान सभा पूर्ण सार्वभौम संस्था बनली.
ब) संविधान सभा ही स्वतंत्र भारताची पहिली संसद बनली.
क) जेव्हा संविधान सभा विधीमंडळ संस्था म्हणून भरत असे, तेव्हा तिच्या अध्यक्षस्थानी डॉ. राजेंद्रप्रसाद
असत.
ड) संविधान सभेची सदस्यसंख्या 389 च्या तुलनेने 299 पर्यंत कमी झाली.
पर्यायी उत्तरेः

19 / 999

खालीलपैकी कोणती जोडी योग्य नाही?

20 / 999

भारताच्या फाळणीनंतर घटनासमितीच्या संख्येबाबतच्या विधानांचा विचार करा.
अ) समितीची सदस्यसंख्या 299 पर्यंत खाली आली.
ब) संस्थानांच्या प्रतिनिधींची संख्या 70 पर्यंत कमी झाली.
क) प्रांतांच्या व मुख्य आयुक्तांच्या प्रांतांच्या प्रतिनिधींची संख्या 229 इतकी कमी झाली.
वरीलपैकी कोणती विधान/ने बरोबर आहेत?

21 / 999

राज्यघटना तयार करण्याव्यतिरिक्त घटना समितीने पार पाडलेल्या अन्य कार्याबाबत खालील विधाने
विचारात घ्या.
अ) मे 1949 मध्ये भारताच्या राष्ट्रकुलाच्या सदस्यत्वास मान्यता दिली.
ब) 22 जुलै 1947 रोजी राष्ट्र ध्वज स्वीकारला.
क) 24 जानेवारी 1950 रोजी राष्ट्र गीताचा स्वीकार केला.
ड) 26 जानेवारी 1950 रोजी डॉ. राजेंद्र प्रसाद यांची भारताचे पहिले राष्ट्र पती म्हणून निवड केली.
पर्यायी उत्तरे

22 / 999

भारतीय संविधान सभेतील मूलभूत हक्कांच्या उपसमितीचे अध्यक्ष कोण होते?

23 / 999

खालील विधाने विचारात घ्या.
अ) भारतीय संविधान समितीची पहिली बैठक 9 ते 23 डिसेंबर 1946 रोजी नवी दिल्ली येथे पार पडली.
ब) सरदार हुकूम सिंग, के. टी. शाह , महावीर त्यागी हे भारतीय घटना समितीतील बिगर काँग्रेस पक्षाचे
सदस्य होते.
क) संविधान सभेच्या पहिल्या बैठकीस मुस्लिम लीगचे सर्व सदस्य हजर होते.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त?

24 / 999

अयोग्य विधान/ने ओळखा.
अ) घटना समिती फक्त एका मुख्य भारतीय समुदायाचे प्रतिनिधीत्व करते - विन्स्टन चर्चिल
ब) घटना समिती म्हणजे हिंदूंची समिती - लॉर्ड सायमन
पर्यायी उत्तरे

25 / 999

खालील विधाने विचारात घ्या.
अ) माऊंटबॅटन घोषणेपूर्वी उदयपूर, बिकानेर, भोपाळ, रेवा, जयपूर, पटीयाला ही संस्थाने भारतीय
संघामध्ये सामील झाली होती.
ब) घटना समिती ही पूर्णपणे प्रमाणशीर प्रतिनिधीत्व पद्धतीने एकल संक्रमणीय मतदान पद्धतीने तनवडून
आली होती.
क) घटना समितीसाठी दोन उपाध्यक्षांची निवड करण्यात आली होती.
योग्य विधान/ने ओळखा.

26 / 999

खालील विधानांचा विचार करा.
अ) डॉ. राजेंद्र प्रसाद हे नियम समितीचे अध्यक्ष होते.
ब) मौलाना अबुल कलाम आझाद हे या समितीचे सदस्य होते.
पर्यायी उत्तरे ः

27 / 999

घटना समितीतील महिला सदस्य आणि त्या निवडून आलेल्या प्रांतांची योग्य जोडी लावा.
I II
अ) दुर्गाबाई देशमुख i) संयुक्त प्रांत
ब) राजकुमारी अमृत कौर ii) त्रावणकोर
क) ॲनी मॅस्करण iii) मद्रास
ड) हंसाबेन मेहता iv) मुंबई
पर्यायी उत्तरे :
अ ब क ड

28 / 999

भारतीय राज्यघटना मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वे यांच्या संतुलनाच्या भक्कम पायावर उभी आहे', असे
सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या खटल्यामध्ये म्हटले आहे?

29 / 999

खालील विधाने लक्षात घ्या.
अ) कॅबिनेट मिशन योजनेप्रमाणे नोव्हेंबर 1946 मध्ये घटना समितीची स्थापना करण्यात आली.
ब) या योजनेनुसार 11 ब्रिटिश प्रांतातून 292 सदस्य प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीने एकल संक्रमणीय
मतदान तत्त्वावर निवडून येणार होती.
क) दिल्ली, कुर्ग,अजमेर- मारवाड आणि वायव्य सरहद्द प्रांत या चार मुख्य आयुक्तांच्या प्रांतातून प्रत्येकी एक
सदस्य निवडून येणार होता.
ड) संस्थानिकांनी सहभागी न होण्याचे ठरवल्याने कॅबिनेट मिशन योजनेनुसार ठरवून दिलेल्या त्यांच्या 93
जागा रिकाम्या राहिल्या.
वरील विधानांपैकी अचूक विधान/ने ओळखा.

30 / 999

भारतीय संघराज्याचे वर्णन आणि लेखक यासंबंधी खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा.

31 / 999

खालील विधाने लक्षात घ्या.
अ) 29 ऑगस्ट 1947 रोजी भारतीय संविधान सभेने मसुदा समितीची स्थापना केली.
ब) अध्यक्ष म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि इतर सात सदस्य या समितीत होते.
क) सईद मोहम्मद सादुल्ला हे मसुदा समितीचे उपाध्यक्ष होते.
ड) मसुदा समितीचे एक सदस्य अल्लादी कृष्णस्वामी अय्यर यांनीच राज्यघटनेच्या कलम 370 चा मसुदा
तयार केला होता.
वरील विधानांपैकी अचूक विधान ओळखा.

32 / 999

भारतीय राज्यघटनेसंबंधित खालीलपैकी अचूक विधान/ ने कोणती ?
अ) राज्यघटनेतील तात्विक भाग हा अमेरिकेच्या व आयर्लंडच्या राज्यघटनांतून प्रेरित आहे.
ब) राज्यघटनेतील राजकीय भाग मुख्यत: ब्रिटनच्या राज्यघटनेवर आधारित आहे.
पर्यायी उत्तरे:

33 / 999

विधान अ : संसदीय पद्धतीमध्ये प्रशासनावरील कायदेमंडळाचे नियंत्रण अध्यक्षीय पद्धतीपेक्षा भिन्न असते.
कारण ब : प्रशासनावर कायदेमंडळाचे नियंत्रण हे लोकसत्ताक शासनाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.

34 / 999

खालील वाक्यांचा विचार करून योग्य विधान /ने ओळखा.
अ) सोव्हियत रशियाची राज्यघटना ही जगातील सर्व लोकशाही देशांपैकी नागरिकांच्या कर्तव्यांची सूची
देणारी एकमेव घटना असावी.
ब) मूळ घटनेत घटनाकारांनी राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे या स्वरूपात राज्यांची कर्तव्ये समाविष्ट केली.
क) साम्यवादी देशांत मूलभूत हक्क व मूलभूत कर्तव्ये यांना समान महत्त्व दिले आहे.
पर्यायी उत्तरे:

35 / 999

योग्य जोड्या लावा.
भारतीय राज्यघटनेचे वैशिष्ट्य स्रोत
अ) राज्यसभेच्या सदस्यांची निवडणूक i) आयर्लंड
ब) सर्वोच्च न्यायालयाचे सल्लागारी अधिकारक्षेत्र ii) अमेरिका
क) राष्ट्र पतीच्या निवडणुकीची पद्धत iii) दक्षिण आफ्रिका
ड) स्वतंत्र न्यायव्यवस्था iv) कॅनडा
पर्यायी उत्तरे :
अ ब क ड

36 / 999

भारतीय राज्यघटनेच्या परिशिष्ट तीन मध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश होतो?
अ) राष्ट्र पती ब) सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश
क) भारताचा नियंत्रक व महालेखा परीक्षक ड) महान्यायवादी
पर्यायी उत्तरे:

37 / 999

धर्मनिरपेक्षतेबाबत खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
अ) धर्मनिरपेक्षता राज्यघटनेच्या मूलभूत संरचनेचा भाग आहे.
ब) भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. म्हणजेच असे राष्ट्र जे सर्व धर्मांच्या प्रति तटस्थपणा व निष्पक्षतेचा भाग
ठेवते.
क) धर्माच्या आधारावर मतदारांना आवाहन करणे धर्मनिरपेक्ष लोकशाहीच्या विरुद्ध आहे.
ड) भारतासारख्या बहुधर्मी समाजासाठी धर्मनिरपेक्ष या शब्दाची नकारात्मक व्याख्या लागू पडत नाही.
पर्यायी उत्तरे:

38 / 999

खालीलपैकी अयोग्य विधान ओळखा.
अ) 21 वी घटनादुरुस्ती अधिनियम 1967 अन्वये सिंधी या भाषेचा परिशिष्ट आठ मध्ये समावेश करण्यात आला.
ब) 92 वी घटनादुरुस्ती 2003 अन्वये बोर्ड नोकरी मैथिली व संथाली या भाषांचा समावेश आठव्या
परिशिष्टात करण्यात आला.
क) 94 वी घटनादुरुस्ती अधिनियम 2011 अन्वये ओरिया भाषेच्या नावात बदल करून ओडिया असे
करण्यात आले.
पर्यायी उत्तरे:

39 / 999

भारतीय राज्यघटनेचे खालीलपैकी संघराज्यीय वैशिष्ट्य कोणती?
अ) लिखित राज्यघटना ब) राज्यघटनेचे श्रेष्ठत्व
क) ताठर राज्यघटना ड) स्वतंत्र न्यायव्यवस्था
इ) लवचिक राज्यघटना
पर्यायी उत्तरे:

40 / 999

खालीलपैकी कोणते विधान चूक आहे?
अ) शासन आणि जन अधिकारी हे नियमित कायदेशीर प्रक्रियेपासून मुक्त आहेत.
ब) कायद्याचे राज्य हे तत्व भारतीय संविधानात अंतर्भूत आहे.
क) भारतीय राज्यघटनेमध्ये कायद्याने स्थापित केलेली प्रक्रिया (कलम 21) अशी शब्दरचना आहे.
पर्यायी उत्तरे:

41 / 999

खालील विधानांचा विचार करा.
अ) मूलभूत हक्क हे निरंकुश आहेत.
ब) घटना दुरुस्ती कायद्याने संसद मूलभूत हक्क कमी करू शकते अथवा रद्द ही करू शकते.
क) कार्यकारी विभाग व कायदेमंडळाचे मनमानी कायदे यांच्यावर मर्यादा घालण्याचे काम मूलभूत हक्क
करतात.
वरीलपैकी अयोग्य नसलेली विधाने ओळखा.
पर्यायी उत्तरे:

42 / 999

योग्य विधाने ओळखा.
अ) घटना समितीचे सचिव म्हणून जुगल किशोर खन्ना यांनी काम पाहिले.
ब) घटना समितीची पहिली बैठक लॉर्ड वेव्हेल यांनी आमंत्रित केली होती.
क) पंडित नेहरूंच्या ठरावात बंधुता हा शब्द नव्हता.
पर्यायी उत्तरे:

43 / 999

1784 च्या पिट्स् कायद्याबाबत अयोग्य विधाने निवडा.
अ) या कायद्याद्वारे कंपनीची व्यापारी व राजकीय कार्ये यांमध्ये भेद करण्यात आला.
ब) बोर्ड ऑफ कंट्रोलच्या सदस्यांचे पगार भारतीय तिजोरीतून महसूल देण्याची तरतूद करण्यात आली.
क) युद्ध टाळण्यासाठी अहस्तक्षेपाचे धोरण अवलंबण्यात आले.

44 / 999

खालील विधानांपैकी अचूक विधाने ओळखा.
अ) एकेरी नागरिकत्व पद्धत भारताने कॅनडाकडून घेतलेली आहे.
ब) जम्मू काश्मीर वगळता भारतामध्ये कोणत्याही राज्यात दुहेरी नागरिकत्व नाही.
क) 1955 च्या नागरिकत्व कायद्यामध्ये आतापर्यंत 9 वेळा दुरुस्ती करण्यात आली आहे.

45 / 999

जोड्या लावा.
अ) अनुच्छेद 9 i) स्वेच्छेने परदेशाचे नागरिकत्व स्वीकारणाऱ्या व्यक्ती
ब) अनुच्छेद 8 ii) पाकिस्तानातून भारतात स्थलांतरित नागरिक
क) अनुच्छेद 6 iii) भारतीय वंशाच्या व्यक्ती
ड) अनुच्छेद 7 iv) पाकिस्तानात स्थलांतरित नागरिक
अ ब क ड

46 / 999

भारतीय नागरिकत्व कायदा, 1955 नुसार खालीलपैकी कोणत्या पर्यायी मार्गांनी एखादी व्यक्ती भारताचा
नागरिक बनू शकते?
अ) वारसा हक्काने ब) प्रदेश विलिनीकरणाने
क) स्वीकृतीने ड) राष्ट् रीयीकरणाद्वारे
इ) नोंदणीद्वारे फ) जन्म भारतात घेतल्याने

47 / 999

योग्य कथन/कथने ओळखा.
अ) नागरिक राज्यामध्ये सर्व नागरी अधिकारांचा उपभोग घेतात.
ब) नागरिक राज्यामध्ये सर्व राजकीय अधिकारांचा उपभोग घेतात.
क) परकीय व्यक्ती राज्यामध्ये सर्व नागरी अधिकारांचा उपभोग घेतात.
ड) परकीय व्यक्ती राज्यामध्ये सर्व राजकीय अधिकारांचा उपभोग घेतात.
पर्यायी उत्तरे :

48 / 999

खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
अ) भारतामध्ये राष्ट्रपतीपदासाठी केवळ जन्मसिद्ध नागरिकच पात्र असतो. नागरीकरणाद्वारे (Naturalisaiton)
नागरिकत्व प्राप्त केलेली व्यक्ती पात्र नसते.
ब) अमेरिकेमध्ये अध्यक्षपदासाठी केवळ जन्मसिद्ध नागरिकच पात्र असतो, नागरीकरणाद्वारे नागरिकत्व
प्राप्त झालेली व्यक्ती पात्र नसते.
क) जेव्हा एखादी व्यक्ती भारतीय नागरिकत्वाचा त्याग करते, तेव्हा त्या व्यक्तीच्या प्रत्येक अज्ञान बालकाचे
भारतीय नागरिकत्व देखील नष्ट होते.
पर्यायी उत्तरे :

49 / 999

योग्य विधान/ने ओळखा.
अ) प्रजासत्ताक म्हणजे राजकीय सार्वभौमत्व जनतेकडे असणे.
ब) मागासवर्गीय व महिला यांच्या परिस्थितीत सुधारणा करणे हे राजकीय न्यायात समाविष्ट आहे.

50 / 999

योग्य जोड्या लावा.
अ) सर्वोच्च न्यायालयाचे सल्लागार अधिकार क्षेत्र (कलम 143) i) अमेरिकन घटना
ब) फर्स्ट पास्ट द पोस्ट सिस्टिम ii) ब्रिटिश घटना
क) न्यायव्यवस्था iii) भारत शासन कायदा 1935
iv) कॅनडाची घटना
अ ब क

51 / 999

योग्य विधान/ने निवडा.
अ) 'आम्हाला वीणा व सतारचे संगीत हवे होते, परंतु हे इंग्लिश संगीत आहे', अशी टीका राज्यघटनेवर
के. हनुमंतय्या यांनी केली.
ब) 'सक्षम व बुद्धिमान वकीलांना भरपूर काम मिळेल', अशी टीका राज्यघटनेवर एच. के माहेश्वरी यांनी
केली.

52 / 999

खालीलपैकी अचूक विधान/ने ओळखा.
अ) अंदमान आणि निकोबार या कें द्रशासित प्रदेशाची निर्मिती 1956 मध्ये करण्यात आली.
ब) दमण आणि दीव या कें द्रशासित प्रदेशाची निर्मिती 1961 मध्ये करण्यात आली.
क) पुदुच्चेरी या कें द्रशासित प्रदेशाची निर्मिती 1962 मध्ये करण्यात आली.
पर्यायी उत्तरे :

53 / 999

पुढीलपैकी अयोग्य विधान/ने ओळखा.
अ) दिल्ली, चंदीगड व पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशांची स्थापना राजकीय व प्रशासकीय कारणांसाठी
करण्यात आली होती.
ब) दादरा व नगर हवेली, लक्षद्वीप व अंदमान आणि निकोबार या कें दशासित प्रदेशांची स्थापना सांस्कृति क
कारणांसाठी करण्यात आली होती.
पर्यायी उत्तरे :

54 / 999

खालीलपैकी अयोग्य नसलेले विधान/ने ओळखा.
अ) कें द्रशासित प्रदेशाचे प्रशासन राष्ट्रपतींकडून नियुक्त केलेल्या प्रशासकाद्वारे चालवले जाते.
ब) प्रशासक हा राष्ट्रपतींचा प्रतिनिधी असतो. व तो राज्याच्या राज्यपालाप्रमाणे कार्य करतो.
क) अंदमान आणि निकोबार, पुदुच्चेरी आणि चंदीगड येथे नायब राज्यपाल आहेत.
पर्यायी उत्तरे :

55 / 999

पुढीलपैकी योग्य नसलेली विधान/विधाने ओळखा.
अ) कें द्रशासित प्रदेशांसाठी संसद राज्यसूचीमधील कोणत्याही विषयावर कायदे करू शकते.
ब) पुदुच्चेरी विधानसभा राज्यसूची व समवर्ती सूचीमधील कोणत्याही विषयावर कायदे करू शकते.
क) पुदुच्चेरीसाठी राष्ट्रपती केव्हाही नियम करून कायदे करू शकतात.
पर्यायी उत्तरे :

56 / 999

पुढील विधानांचा विचार करून योग्य पर्याय निवडा.
अ) कें द्रशासित प्रदेशासाठी राष्ट्रपती उच्च न्यायालयाची स्थापना करू शकतात.
ब) स्वतःचे उच्च न्यायालय असलेला दिल्ली हा एकमेव कें द्रशासित प्रदेश आहे.
क) अंदमान आणि निकोबार हा कें द्रशासित प्रदेश कलकता उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रामध्ये येतो.
पर्यायी उत्तरे :

57 / 999

खालीलपैकी योग्य विधाने ओळखा.
अ) 69 वी घटनादुरुस्ती, 1993 नुसार दिल्ली या कें द्रशासित प्रदेशाला विशेष दर्जा देण्यात आला.
ब) दिल्लीच्या विधानसभेच्या सदस्यांची संख्या 70 इतकी ठरवण्यात आली आहे.
क) दिल्ली विधानसभेतील सदस्य संख्येच्या दहा टक्के सदस्यच मंत्रिमंडळात नियुक्त केले जाऊ शकतात.
पर्यायी उत्तरे :

58 / 999

पुढीलपैकी अयोग्य नसलेली विधाने ओळखा.
अ) दिल्ली विधानसभेचे अधिवेशन चालू नसताना नायब राज्यपालाला वटहुकूम काढण्याचा अधिकार आहे.
ब) दिल्ली विधानसभा विसर्जित झाली असेल तर नायब राज्यपाल वटहुकूम काढू शकत नाहीत.
क) दिल्ली विधानसभा निलंबित केलेली असेल तर नायब राज्यपाल वटहुकूम काढू शकतात.
पर्यायी उत्तरे :

59 / 999

राष्ट्रपती खालील केंद्रशासित प्रदेशातील शांतता, प्रगती आणि सुशासन यासाठी नियम करू शकतात ---.
अ) अंदमान आणि निकोबार ब) लक्षद्वीप
क) दादरा आणि नगर हवेली ड) दमण आणि दीव
इ) चंदीगड
पर्यायी उत्तरे :

60 / 999

खालीलपैकी कोणत्या केंद्रशासित प्रदेशांना राज्यसभेमध्ये प्रतिनिधित्व देण्यात आले आहे?
अ) दिल्ली ब) पुदुचेरी
क) जम्मू काश्मीर ड) चंदीगड
पर्यायी उत्तरे :

61 / 999

राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार दिल्ली या कें द्रशासित प्रदेशाला विशेष दर्जा देण्यात आला आहे?

62 / 999

खालील विधाने विचारात घ्या.
अ) घटनादुरुस्ती कायदा भारतीय संविधानाच्या कलम 13 अंतर्गत 'कायद्या'च्या व्याख्येत येत नाही.
ब) भारतीय संविधान हे जगातील एकमेव संविधान आहे ज्यात नागरिकांच्या मूलभूत अधिकारांच्या
निलंबनाशी संबंधित तरतुदींचा विशेष उल्लेख आहे.
क) मुलभूत अधिकार हे भारतातील फक्त राजकीय लोकशाहीला चालना देण्यासाठी आहेत.
योग्य विधान/ने निवडा.

63 / 999

खालील विधानांपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर नाहीत?
अ) घटनादुरुस्ती विधेयक हे एक महत्त्वाचे विधेयक असल्यामुळे असे विधेयक फक्त मंत्र्यांकडूनच मांडले
जाते.
ब) राष्ट्रपती, घटनादुरुस्ती विधेयक संसदेकडे कुठल्याही परीस्थितीत पुनर्विचारासाठी परत पाठवू शकत
नाही.
क) घटनादुरुस्ती विधेयकाला राज्यांनी दोन महिन्यांच्या आत संमती देणे बंधनकारक आहे.
पर्यायी उत्तरे :

64 / 999

97 व्या घटना दुरुस्तीबाबत खालील विधाने विचारात घ्या आणि चुकीचे विधान ओळखा.

65 / 999

भारतीय राज्यघटनेच्या घटनादुरुस्ती पध्दतीसंबंधी चुकीचे विधान ओळखा.

66 / 999

खालील विधाने विचारात घ्या आणि योग्य विधान/ने निवडा.
अ) घटनादुरुस्ती विधेयक संसदेच्या कोणत्याही सभागृहात मांडले जाऊ शकते.
ब) साध्या बहुमताने पारित करण्यात आलेले विधेयक हे घटनादुरुस्ती विधेयक म्हणून गणले जात नाही.
क) घटनादुरुस्ती विधेयका संदर्भात दोन्ही सभागृहांमध्ये मतभेद असल्यास सभागृहांची संयुक्त बैठक
बोलवण्याची तरतूद संविधानात नाही.
पर्यायी उत्तरे :

67 / 999

44वी घटनादुरुस्ती कायदा 1978 द्वारे राष्ट् रीय आणीबाणीच्या संदर्भात खालीलपैकी कोणती तरतूद केलेली
नाही?

68 / 999

पुढीलपैकी कोणत्या तरतुदींचा समावेश सातवी घटना दुरुस्ती कायदा 1956 अन्वये करण्यात आलेला आहे?
अ) उच्च न्यायालयांचे अधिकार क्षेत्र कें द्रशासित प्रदेशापर्यंत वाढवले.
ब) दोन किंवा अधिक राज्यांसाठी एकाच व्यक्तीची राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्याची तरतूद.
क) उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांना सर्वोच्च न्यायालयाचे तदर्थ न्यायाधीश (ad-hoc judge) म्हणून
काम करण्यास परवानगी देण्यात आली.
पर्यायी उत्तरे :

69 / 999

42 व्या घटनादुरुस्तीने केलेल्या तरतुदिंपैकी कोणत्या तरतुदिंमध्ये पुन्हा सुधारणा करण्यात आल्या किंवा
घटनेतून रद्द करण्यात आल्या?
अ) मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक असेल.
ब) राज्यघटनेच्या सरनाम्यात समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता हे तीन नवीन शब्द समाविष्ट
करण्यात आले.
क) लोकसभा आणि राज्य विधानसभांचा कार्यकाळ 6 वर्षांपर्यंत वाढवला.
पर्यायी उत्तरे :

70 / 999

खालील विधाने विचारात घ्या आणि योग्य पर्यायी उत्तरे : निवडा.
अ) 12 वी घटनादुरुस्ती कायदा, 1962 द्वारे पुद्दुचेरीचा भारतीय संघराज्यात समावेश करण्यात आला.
ब) 57 वी घटनादुरुस्ती कायदा 1987 नुसार राज्यघटनेचे हिंदी भाषेमध्ये अधिकृत मजकूर म्हणून भाषांतर
करण्याची तरतूद केली.
पर्यायी उत्तरे :

71 / 999

खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्ती कायद्याने मतदानाचे वय 21 वर्षावरून 18 वर्षे केले?

72 / 999

भारत-पाकिस्तान करार (1958) अंतर्गत बेरुबारी युनियनचे पाकिस्तानला (तत्कालीन पूर्व-पाकिस्तान)
देण्यात आला, या तरतुदीस कोणत्या घटनादुरुस्तीने संमती देण्यात आली?

73 / 999

पुढीलपैकी कोणत्या तरतुदींविषयीची दुरुस्ती संसदेच्या साध्या बहुमताने पारित केली जाऊ शकते?
अ) संसद आणि राज्य विधिमंडळाच्या निवडणुका
ब) सहावे परिशिष्ट
क) संसदेतील किमान गणसंख्या
ड) जीएसटी कौन्सिल
पर्यायी उत्तरे :

74 / 999

खालीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहे/ त?
अ) भारतीय संघराज्याच्या घटकराज्यांचा भूप्रदेश (सीमा) संसद साध्या बहुमताने बदलू शकते.
ब) संसदेला राज्याच्या भूप्रदेशाची पुनर्विभागणी करण्याअगोदर राज्य विधिमंडळाची संमती घेणे आवश्यक असते.
क) कोणत्याही राज्याच्या भूप्रदेशाची पुनर्विभागणी संबंधीचे विधेयक संसदेमध्ये सादर करण्यासाठी
राष्ट्रपतीची शिफारस आवश्यक असते.
ड) राज्याच्या नावामध्ये बदल करण्यासंबंधी विधेयकाची शिफारस करण्याअगोदर राष्ट्रपतीकडे राज्याचा
अभिप्राय प्राप्त झाला पाहिजे.
पर्यायी उत्तरे :

75 / 999

खालील विधाने विचारात घ्या.
अ) भारतीय संघराज्य हे राज्यांमधील कराराचा परिणाम आहे.
ब) 'नाशवंत घटकांचा अविनाशी संघ' (Indestructible Union of Destructible Units) असे भारतीय
संघराज्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने निरीक्षण नोंदवले आहे.
क) 'अविनाशी राज्यांनी बनलेला एक अविनाशी संघ' (Indestructible Union composed of Indestructible
States) असे अमेरिकन संघराज्याबाबत त्यांच्या सर्वोच्च न्यायालयाने वर्णन केले आहे.
वरीलपैकी कोणते विधान/ विधाने ने बरोबर आहे/ आहेत?

76 / 999

सध्या भारतात ---- राज्य व ----- संघराज्य प्रदेश अस्तित्वात आहेत.

77 / 999

खालील विधाने विचारात घ्या.
अ) भारत आंतरराष्ट् रीय कायद्याने मान्य केलेल्या पद्धतीने परकीय क्षेत्र मिळवू शकतो.
ब) राज्यघटनेचे कलम 2 भारतीय संघाच्या अस्तित्वात असलेल्या राज्यांच्या स्थापनेसंबंधी किंवा त्यातील
बदलांसंबंधी पुष्टी देते.
क) राज्यघटनेचे कलम 3 हे भारतीय संघाचा भाग नसलेल्या नवीन राज्यांच्या प्रवेशासंबंधी किंवा
स्थापनेसंबंधी आहे.
वरीलपैकी कोणते विधान/ विधाने ने बरोबर आहे/ आहेत?

78 / 999

शंभरावी घटनादुरुस्ती अधिनियम, 2015 अन्वये खालील विधानांचा विचार करा.
अ) हे घटनादुरुस्ती अधिनियम भारत व बांगलादेश या दोन देशांमधील भूसीमा कराराशी संबंधित आहे.
ब) या घटनादुरुस्तीमुळे आसाम, पश्चिम बंगाल, मेघालय व त्रिपुरा या राज्यांच्या प्रादेशिक क्षेत्रात बदल
करण्यात आला.
वरीलपैकी कोणते विधान/ विधाने ने अयोग्य आहे/ आहेत?

79 / 999

जेव्हीपी समिती संबंधी खालीलपैकी अचूक विधाने ओळखा.
अ) जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली डिसेंबर 1948 मध्ये या समितीची स्थापना करण्यात आली.
ब) वल्लभभाई पटेल व पट्टाभी सीतारामय्या हे या समितीचे सदस्य होते.
क) या समितीने भाषा हा राज्यांच्या पुनर्रचनेचा घटक मान्य केला होता.
पर्यायी उत्तरे :

80 / 999

राज्य पुनर्रचना आयोगासंबंधी खालील विधाने विचारात घ्या.
अ) डिसेंबर, 1953 मध्ये फाजल आली यांच्या अध्यक्षतेखाली राज्य पुनर्रचना आयोग नियुक्त करण्यात
आला.
ब) या समितीने सप्टेंबर 1955 मध्ये आपला अहवाल सादर केला.
क) 'एक भाषा-एक राज्य' हा सिद्धांत आयोगाने नाकारला.
ड) या आयोगाने 14 राज्य व 6 संघराज्य प्रदेश निर्माण करण्याची शिफारस केली.
वरीलपैकी कोणते विधान/ विधाने ने अयोग्य नाही/ नाहीत?
पर्यायी उत्तरे :

81 / 999

नागपूर करारासंबंधी खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे.

82 / 999

योग्य जोड्या लावा.
राज्य निर्मि ती
अ) नागालॅंड i) 1987
ब) हरियाणा ii) 1963
क) मिझोराम iii) 1966
ड) मणिपूर iv) 1972
पर्यायी उत्तरे :
अ ब क ड

83 / 999

खाली दिलेल्या राज्यांचा त्यांच्या निर्मितीनुसार योग्य क्रम लावा.
अ) त्रिपुरा ब) सिक्किम
क) हिमाचल प्रदेश ड) अरुणाचल प्रदेश
पर्यायी उत्तरे :

84 / 999

संघराज्यात नवीन प्रदेशांच्या प्रवेशाबाबत कोणत्या घटनादुरुस्त्या संबंधित आहेत?
अ) दहावी घटनादुरुस्ती, 1961 ब) बारावी घटनादुरुस्ती, 1962
क) चौदावी घटनादुरुस्ती, 1962 ड) सोळावी घटनादुरुस्ती, 1963
पर्यायी उत्तरे :

85 / 999

खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्ती अन्वये, संसदेला प्रदान केलेल्या अधिकारांमध्ये कोणत्याही राज्याचा
किंवा संघराज्य प्रदेशाचा एखादा भाग अन्य कोणत्याही राज्याला किंवा संघराज्य प्रदेशाला जोडून नवीन
राज्य किंवा संघराज्य प्रदेश बनविण्याच्या अधिकाराचा समावेश असल्याचे स्पष्ट करण्यात आले?

86 / 999

भारताच्या संघराज्यात्मक पद्धतीबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही?

87 / 999

खालील विधाने विचारात घ्या.
अ) एस. के. धर आयोगाने भाषा हा राज्यांच्या पुनर्रचनेचा आधार अमान्य केला होता.
ब) जे. व्ही. पी. समितीने भाषा हा राज्यांच्या पुनर्रचनेचा घटक मान्य केला होता.
पर्यायी उत्तरे :

88 / 999

जे.व्ही.पी. समितीमधील खालीलपैकी कोणत्या सदस्यांचे मुंबईबाबत एकमत होते?

89 / 999

खालील विधाने विचारात घ्या.
अ) सर्वोच्च न्यायालयाने असे निरीक्षण नोंदविले आहे की, 'विनाशी घटकांचा अविनाशी संघ' असल्याने
भारताने स्वतःसाठी एक ढिली संघराज्यात्मक रचना स्वीकारली आहे
ब) अमेरिकन संघराज्याचे वर्णन त्यांच्या सर्वोच्च न्यायालयाचे 'अविनाशी राज्यांचा अविनाशी संघ' अशा
शब्दांत वर्णन केले आहे.
पर्यायी उत्तरे :

90 / 999

खाली नमूद केलेली राज्ये निर्माण केल्याचा किंवा पूर्ण राज्याचा दर्जा दिल्याचा योग्य कालानुक्रम काय आहे?
अ) नागालँड ब) आंध्रप्रदेश
क) हरियाणा ड) महाराष्ट्र
योग्य पर्याय निवडा.

91 / 999

विधान (A) : राज्यघटना हा देशाचा सर्वोच्च कायदा आहे.
कारण (R) : जर घटनादुरुस्तीची प्रक्रिया ताठर असेल तरच राज्य घटनेने केलेले सत्ता विभाजन आणि
राज्यघटनेचे सर्वश्रेष्ठत्व राखले जाईल.
पर्यायी उत्तरे :

92 / 999

खालीलपैकी कोणत्या बाबींमध्ये राज्यघटनेत दुरुस्ती करणे किमान निम्म्यापेक्षा कमी नसलेल्या विधानसभेच्या
मान्यतेने शक्य होते?
अ) राष्ट्रपतींची निवडणूक
ब) घटक राज्यांचे संसदेतील प्रतिनिधीत्व
क) संविधानाच्या 7 व्या परिशिष्टातील सूची ड) राज्याची विधान परिषद रद्द करणे.
पर्यायी उत्तरे ः

93 / 999

प्रतिपादन (A) : केशवानंद भारती वि. केरळ राज्य या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने असे जाहीर केले की
घटनेच्या मूलभूत संरचनेत दुरुस्ती करता येणार नाही.
कारण (R) : सर्वोच्च न्यायालयाने, संसदीय सार्वभौमत्व आणि न्यायालयीन पुनर्विलोकन यामध्ये संतुलन आणले.

94 / 999

मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्त्वे यांच्या संबंधात खालीलपैकी कोणते विधान/ने योग्य नाही/त?
अ) मूलभूत हक्क न्यायविचारणीय आहेत तर मार्गदर्शक तत्त्वे ही न्यायविचारणीय नाहीत.
ब) जर या दोहोंमध्ये संघर्ष निर्माण झाला तर साधारणपणे मूलभूत हक्कांना मार्गदर्शक तत्त्वांपेक्षा जास्त
प्राधान्य दिले जाते.
क) राज्यघटनेच्या अनुच्छेद 31-C अन्वये काही मार्गदर्शक तत्त्वांना मूलभूत हक्कांपेक्षा जास्त प्राधान्य दिले आहे.
पर्यायी उत्तरे :

95 / 999

भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 32 अन्वये खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या आदेशाची तरतूद सुस्पष्टपणे केलेली नाही?

96 / 999

अ) 'अल्पसंख्याक' या शब्दाची भारतीय राज्यघटनेत व्याख्या दिली नाही.
ब) धार्मिक अल्पसंख्याक तसेच भाषिक अल्पसंख्याक दोघांनाही राज्यघटना अनुच्छेद 29 अन्वये संरक्षण
लाभले आहे.
क) भाषा जतन करणे यामध्ये भाषेच्या संरक्षणासाठी आंदोलन करणे याचाही समावेश होतो.
ड) भाषेचे जतन केले जाईल असे आश्वासन देणे हे लोक प्रतिनिधी कायदा, 1951 अनुसार भ्रष्ट आचरण
ठरत नाही.
वरीलपैकी कोणते विधान/ने योग्य आहेत?

97 / 999

खालील विधाने लक्षात घ्या.
अ) राज्यघटनेच्या कलम 33 नुसार सशस्त्र दले, निमलष्करी दले, पोलिस दले, गुप्तचर यंत्रणा आणि
तद्नुष ंगिक दलांच्या सदस्यांना प्राप्त असलेल्या मूलभूत हक्कांवर निर्बंध लादण्याचे किंवा त्यांचा संक्षेप
करण्याचा अधिकार संसदला आहे.
ब) राज्यघटनेच्या कलम 33 नुसार कायदे करण्याचा अधिकार संसदे बरोबरच राज्यविधीमंडळांनाही आहे.
क) राज्यघटनेच्या कलम 33 नुसार केलेला कोणताही कायदा मूलभूत हक्कांच्या विर्पयास्त आहे या कारणावरून
त्यास कोणत्याही न्यायालयात आव्हान देता येणार नाही.
वरीलपैकी कोणते विधान/विधाने योग्य आहेत?

98 / 999

खालीलपैकी कोणते आदेश हे फक्त न्यायिक आणि अर्धन्यायिक अधिसत्तेविरोधात काढता येतात?

99 / 999

खालील विधाने वाचून अचूक पर्याय निवडा.
अ) मूलभूत हक्कांविषयी आदेश काढण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे अधिकारक्षेत्र उच्च न्यायालयाच्या अधिकार
क्षेत्रापेक्षा संकुचित आहे.
ब) बंदी प्रत्यक्षीकरण प्राधिकार सर्वोच्च न्यायालय केवळ शासनाला उद्देशून काढू शकते तर उच्च न्यायालय
असा आदेश व्यक्तीला उद्देशूनही काढू शकते.
पर्यायी उत्तरे :

100 / 999

विधान अ : भारताच्या राज्यघटनेत 'अल्पसंख्याक' शब्दाची व्याख्या नाही.
कारण ब : अल्पसंख्याक आयोग ही बिगर घटनात्मक संस्था आहे.

101 / 999

कोणत्याही नागरिकाला राज्याने चालविलेल्या किंवा राज्याच्या निधीतून साहाय्य मिळणाऱ्या कोणत्याही
शैक्षणिक संस्थेत केवळ धर्म, वंश, जात किंवा भाषा या कारणावरून प्रवेश नाकारला जाणार नाही'. असे
राज्यघटनेच्या कोणत्या कलमात म्हटले आहे?

102 / 999

खालील विधाने विचारात घ्या व योग्य विधान/ने निवडा?
अ) राज्यघटनेतील कलम 30 मध्ये असलेले संरक्षण केवळ अल्पसंख्याकापुरते मर्यादित आहे.
ब) राज्यघटनेतील कलम 30 अन्वये अल्पसंख्यांकांना दिलेला हक्क हा केवळ बहुसंख्याकाबरोबर समानता
सुनिश्चित करण्यासाठी असून त्यापेक्षा अधिक नाही.

103 / 999

अ) कलम 32 द्वारा रिट् स् म्हणजेच आदेश देण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा अधिकार हा फक्त 'मूलभूत हक्कांचे
उल्लंघन' या घटका संबंधितच मर्यादित आहे .
ब) रिट् स् हे भारतीय घटनेत अमेरिकन कायद्यातून घेतलेले आहे.
क) बंदी प्रत्यक्षीकरण, परमादेश, प्रतिषेध, उत्प्रेक्षण, अधिकारपृच्छा आणि सार्वमत हे रिट् स् चे प्रकार आहेत.
वरील विधानांपैकी अयोग्य विधान/ने ओळखा.

104 / 999

खालील विधाने विचारात घ्या व योग्य विधान/ने निवडा?
अ) पहिल्या घटनादुरुस्ती कायद्याने कलम 31A चा समावेश करण्यात आला.
ब) 24 घटनादुरुस्ती कायद्याने कलम 31C चा समावेश करण्यात आला.
क) कलम 39 B व कलम 39 C या मार्गदर्शक तत्वामधील कलमांची अंमलबजावणी करण्यासाठी कलम
31C चा समावेश राज्यघटनेत करण्यात आला.

105 / 999

खालील विधाने विचारात घ्या व योग्य विधान/ने असलेला पर्याय निवडा.
अ) कलम 35 अनुसार घोषित केलेला लष्करी कायदा हा कलम 352 अनुसार घोषित केलेल्या राष्ट् रीय
आणीबाणी पेक्षा भिन्न आहे.
ब) लष्करी कायदा घोषित केल्याने बंदी प्रत्यक्षीकरणाचा अधिकार आपोआप निलंबित होत नाही.

106 / 999

भारतीय संविधानाच्या अनुच्छेद --- मध्ये अटक व नजर कैदेच्या विरोधातील संरक्षणाच्या तरतुदी दिलेल्या
आहेत.

107 / 999

खालील विधाने विचारात घ्या.
अ) अनुच्छेद 25 ने सदसद् विवेक बुद्धीने वागण्याचा व धर्माचे पालन, आचरण व प्रसार करण्याच्या
स्वातंत्र्याच्या हक्काची हमी दिली आहे.
ब) अनुच्छेद 25 मध्ये केवळ धार्मिक विश्वास (तत्त्वे) यांचाच समावेश होतो असे नाही तर धार्मिक रीती
(विधी) यांचाही समावेश होतो.
क) आपल्या धर्माचा प्रचार करण्याच्या हक्कामध्ये दुसऱ्या व्यक्तिचे आपल्या धर्मात धर्मांतर करण्याच्या
हक्काचा समावेश होतो.
ड) धार्मिक स्वातंत्र्याचे हक्क केवळ नागरिकांना उपलब्ध आहेत.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?

108 / 999

प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेविषयी खालील विधानांचा विचार करा.
अ) केवळ भारतीय नागरिकांना प्रतिबंधात्मक स्थानबद्धता कायद्याखाली अटक झाल्यास कलम 22 अंतर्गत
संरक्षण प्राप्त होते.
ब) या कायद्याखाली अटक केलेल्या व्यक्तीस सल्लागार मंडळाच्या मताशिवाय जास्तीत जास्त तीन महिने
स्थानबद्धतेत ठेवता येते.
पर्यायी उत्तरे:

109 / 999

खालीलपैकी अचूक विधान/ने कोणते/ती?
अ) राज्यघटनेतील कलम 23 मधील तरतुदीनुसार, मानवी वाहतूक आणि भिक्षेगिरी किंवा यासारखे
कोणतीही सक्तीची मजुरी हे मूलभूत हक्कांचे उल्लंघन आहे व शिक्षेस पात्र असेल.
ब) हा अधिकार नागरिक तसेच नागरिक नसलेले अशा दोहोंना केवळ राज्यसंस्थेच्या कृतीविरुद्ध संरक्षण प्रदान करतो.
पर्यायी उत्तरे:

110 / 999

घटना कलम- 24 अन्वये खालीलपैकी कोणते/ती विधान/ने अचूक आहे/त?
अ) या अन्वये 14 वर्षांखालील मुलांना कारखाने, खाणी किंवा बांधकाम अशा धोकादायक कामांवर प्रतिबंध
करण्यात आले आहे.
ब) या कलमानुसार 14 वर्षांखालील मुलांना कोणतेही प्रकारच्या उद्योगात व प्रक्रियात कामावर ठेवण्यास
पूर्णतः बंदी घातली आहे.
क) तसेच 14 ते 18 वयोगटातील मुलांना धोकादायक उद्योगात व प्रक्रियात कामावर ठेवण्यास प्रतिबंध केला आहे.

111 / 999

खालीलपैकी कोणत्या कलमान्वये व्यक्तीचे राज्य तसेच खाजगी व्यक्तींपासूनही संरक्षण होते?
अ) कलम- 17 ब) कलम- 21
क) कलम- 23 ड) कलम- 29

112 / 999

योग्य जोड्या जुळवा.
कायदे वर्ष
अ) NASA i) 1971
ब) TADA ii) 1980
क) POTA iii) 1985
ड) MISA iv) 2002
पर्यायी उत्तरे:
अ ब क ड

113 / 999

भारतीय राज्य घटनेतील तरतुदीनुसार धार्मिक मूलभूत हक्काचे अनुषंगाने खालीलपैकी कोणत्या तरतुदी
घटनादत्त आहेत?
अ) धार्मिक मूलभूत हक्क केवळ भारतीय नागरिक उपभोगू शकतो.
ब) धार्मिक आचरणाशी संबंधित आर्थिक, वित्तीय राजकीय कृत्ये राज्य यंत्रणा कायद्याद्वारे नियंत्रित करू
शकेल.
क) सार्वजनिक स्वरुपाच्या हिंदू धार्मिक संस्था सर्व भारतीय नागरीकांना खुले करुन देण्याचा कायदा राज्य
यंत्रणेला करता येईल.
ड) कृपाण धारण करणे ही शीख धर्म पाळण्याची बाब समजण्यात येईल.

114 / 999

कलम 23 मधील मानवी व्यापार या संकल्पनेचा अर्थ स्पष्ट करणाऱ्या खालील विधानांचा विचार करा.
अ) पुरुष, महिला व बालके यांचा वस्तूप्रमाणे क्रय- विक्रय
ब) वेश्या व्यवसायासह महिला व बालके यांचा अनैतिक व्यापार
क) देवदासी
ड) गुलामगिरी
पर्यायी उत्तरे:

115 / 999

खालील विधाने विचारात घ्या.
अ) पूर्णतः राज्य चालवीत असलेल्या शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण देण्यास पूर्णपणे बंदी आहे.
ब) देणगी किंवा विश्वस्त संस्थेने स्थापन केलेल्या शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षणास परवानगी आहे.
क) शासनाकडून अनुदान मिळणाऱ्या शैक्षणिक संस्थांमध्ये स्वेच्छेने धार्मिक शिक्षणास परवानगी देण्यात
आली आहे.
वरीलपैकी कोणती विधाने अचूक नाही/ नाहीत?

116 / 999

कलम 23 मधील 'बिगारी' या संज्ञेमध्ये पुढील बाबींचा समावेश होतो-
अ) सक्तीचे श्रम
ब) शारीरिक क्षमतेपलिकडे काम करण्याची सक्ती करणे
क) अनैच्छिक दास्यत्व
ड) विशिष्ट मालकासाठी काम करणे आणि त्याच्या परवानगीशिवाय अन्यत्र नोकरी न स्वीकारणे,
बरोबर विधानांची निवड करा

117 / 999

खालीलपैकी कोणती जोडी बरोबर जुळते.

118 / 999

खालील विधाने विचारात घ्या.
अ) भारतीय राज्यघटना अनुच्छेद 21 नुसार कोणतेही व्यक्तीचे जीवित किंवा व्यक्तिगत स्वातंत्र्य 'कायद्याच्या
योग्य प्रक्रियेशिवाय' हिरावून घेतले जाणार नाही.
ब) भारतीय राज्यघटना अनुच्छेद 20 (2) नुसार कोणत्याही व्यक्तिवर एकाच गुन्ह्यासाठी एकापेक्षा अधिकवेळा
खटला चालविला जाणार नाही आणि एकापेक्षा अधिकवेळा शिक्षा दिली जाणार नाही..
क) भारतीय राज्यघटना अनुच्छेद 14 नुसार भारतीय प्रदेशात राज्य कोणत्याही व्यक्तिस कायद्यापुढे समानता
अथवा कायद्याचे समान संरक्षण नाकारणार नाही. वरीलपैकी कोणती तरतूद बरोबर नाही. पर्यायी उत्तरे :

119 / 999

भारतीय राज्यघटनेतील ________ सार्वजनिक स्वरूपात फाशी देण्याविरुद्ध अधिकार प्रदान करते.

120 / 999

खालील विधाने लक्षात घ्या.
अ) मूलभूत हक्कांमधील भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर भारताची सार्वभौमता, एकात्मता आणि
सार्वजनिक सुव्यवस्था हे वाजवी निर्बंध 16 व्या घटनादुरुस्तीद्वारे समाविष्ट करण्यात आले.
ब) राज्यघटनेच्या अनुच्छेद 19 (g) नुसार देशातील कोणतीही व्यक्ती त्याला हवा तो व्यवसाय किंवा व्यापार करू शकते.
क) परंतु राज्यसंस्था कायद्याद्वारे किंवा कार्यकारी ठरावाद्वारे काही क्षेत्रांमधील व्यवसाय स्वतःसाठी राखीव ठेवू शकते.
वरील विधानांपैकी अचूक विधान ओळखा.

121 / 999

राज्यघटनेच्या अनुच्छेद 19 अंतर्गत मिळणारे अधिकार खालीलपैकी कोणा कोणास प्राप्त आहेत.
अ) भारतीय नागरिक ब) कंपनीचे भागधारक
क) कंपनी आणि निगम यांसारखे वैधानिक व्यक्ती ड) परकीय नागरिक
इ) भारतात रहिवास असणारी कोणतीही व्यक्ती

122 / 999

अनुच्छेद-21 च्या विस्ताराचे सर्वात उल्लेखनीय वैशिष्ट्य हे आहे की, अनुच्छेद 21 वरील न्यायिक सक्रियतेच्या
या जादूच्या छडीने घटनेच्या भाग IV मध्ये समाविष्ट असलेल्या गैरन्यायिक मार्गदर्शक तत्त्वांपैकी अनेकांना
आता मूलभूत अधिकाराच्या स्वरूपात लागू करण्यायोग्य पुनर्जिवीत केले आहे. या संदर्भातील खटले आणि
त्यात दिलेल्या निवाड्याबाबत जोड्या लावा.
अ) सुभाष कुमार वि. बिहार (1991) i) डोंगराळ भागातील नागरिकांना रस्त्याच्या
वापराचा अधिकार
ब) रामशरण औत्यानुप्रासी वि. भारत सरकार (1989) ii) प्रदूषण मुक्त हवा आणि पाण्याचा अधिकार
क) हिमाचल प्रदेश वि. उमेद राम शर्मा (1986) iii) शिक्षणाचा अधिकार
ड) मोहिनी जैन वि. कर्नाटक (1992) iv) अन्न, कपडा, योग्य पर्यावरणाचा अधिकार
अ ब क ड

123 / 999

खालील विधाने लक्षात घ्या.
अ) घटनेतील कलम 17 अन्वये अस्पृश्यतेची प्रथा नष्ट करण्यात आली.
ब) या कलमामधील अधिकार खाजगी व्यक्तीविरुद्ध सुद्धा उपलब्ध आहे .
क) या अधिकाराची अंमलबजावणी करण्याकरता 1976 मध्ये संसदेने अस्पृश्यता (अपराध) कायदा पारित केला.
योग्य विधाने ओळखा.

124 / 999

जीवित आणि व्यक्ती स्वातंत्र्याच्या (अनुच्छेद-21) अधिकाराच्या व्याप्तीमध्ये ----- यांचा समावेश होतो.
अ) चांगल्या पर्यावरणाचा अधिकार ब) कामाचा अधिकार
क) खासगी - एकांततेचा अधिकार ड) लाभांशाचा (Bonus) अधिकार
इ) चांगल्या आरोग्याचा अधिकार
पर्यायी उत्तरे :

125 / 999

1996 सालचा बालाजी राघवन खटला राज्यघटनेतील कोणत्या अनुच्छेदाशी संबंधित आहे?

126 / 999

अ) राज्यघटनेच्या अनुच्छेद 19 अन्वये व्यक्तीला संचार स्वातंत्र्य आहे.
ब) अनुच्छेद 19 अन्वये केवळ देशामध्येच संचाराचे स्वातंत्र्य आहे.
क) अनुच्छेद 21 अन्वये देशाबाहेर जाण्याचे आणि बाहेरून पुन्हा देशात येण्याचे स्वातंत्र्य प्राप्त झालेले आहे.
वरील विधानांपैकी अचूक नसलेले विधान ओळखा.

127 / 999

राज्यघटनेच्या अनुच्छेद 20 बद्दल दिलेल्या खालील विधानांपैकी अचूक विधान ओळखा.
अ) दिवाणी खटल्यामध्ये एखाद्या व्यक्तीला स्वतःविरुद्ध साक्ष देण्यास भाग पाडता येऊ शकते.
ब) राज्यघटनेच्या अनुच्छेद 20 (3) अन्वये प्राप्त संरक्षण केवळ फौजदारी प्रक्रियेबाबत आहे.
क) एखाद्या व्यक्तीला अंगठ्याचे ठसे, नमुना सही, रक्ताचा नमुना, शरीर तपासणी यांची सक्ती करता येते.

128 / 999

पुढील विधाने विचारात घ्या.
अ) मूलभूत हक्क फक्त नागरिकांसाठीच असतात.
ब) मूलभूत हक्क अपरिवर्तनीय असतात.
क) राष्ट् रीय आणीबाणीच्या वेळी सर्व मूलभूत हक्क निलंबित होतात.
चुकीचे/ची विधान / ने निवडा.

129 / 999

97 व्या घटना दुरुस्तीबाबत खालील विधाने विचारात घ्या आणि चुकीचे विधान ओळखा.

130 / 999

खालील विधानांचा विचार करा.
अ) राज्यघटनेच्या भाग तीनमधील कलम 13 मध्ये राज्य या संज्ञेची व्याख्या स्पष्ट करण्यात आलेली आहे.
ब) 'राज्य' या संज्ञेत जीवन विमा निगम, भारतीय पोलाद प्राधिकरण यांचा देखील समावेश होतो.
क) राज्यघटनेनुसार राज्याच्या वतीने कार्य करणारी खासगी संस्था किंवा संघटना यांचा सुद्धा राज्य या
संज्ञेत समावेश होतो.

131 / 999

खालीलपैकी कोणते विधान अयोग्य नाही?

132 / 999

समानतेच्या तत्त्वातील 'कायद्यापुढे समानता' या तत्त्वामधून पुढीलपैकी कोणत्या बाबी स्पष्ट होतात ते
ओळखा.
अ) कोणत्याही व्यक्तीसाठी विशेष अधिकार नाहीत.
ब) सर्वसाधारण न्यायालय लागू करीत असलेले सामान्य कायदे सर्व व्यक्तींना समान असतील.
क) श्रीमंत किंवा गरीब उच्च किंवा निम्न अधिकारी किंवा सामान्य व्यक्ती कायद्यापेक्षा श्रेष्ठ नाहीत.

133 / 999

कलम 13 मधील कायदा या संज्ञेत खालीलपैकी कोणती/त्या बाबी समाविष्ट होत नाही/त?
अ) संसद किंवा राज्य विधिमंडळांनी बनविलेले कायमस्वरूपी कायदे.
ब) राष्ट्रपती किंवा राज्यपालांनी काढलेले अध्यादेश.
क) रूढी किंवा परंपरा असे वैधानिक स्वरूपाचे नसलेले कायद्याचे स्रोत.
ड) घटनादुरुस्ती कायदे.

134 / 999

कायद्यापुढे समानता ही ब्रिटिश परंपरेतून स्वीकारलेली संकल्पना नकारात्मक आहे तर कायद्याचे समान
संरक्षण अमेरिकेच्या राज्यघटनेतून स्वीकारलेली संकल्पना सकारात्मक आहे.

135 / 999

समतेच्या तत्त्वासंबंधी अपवादांमध्ये कोणती/त्या बाब/बाबी समाविष्ट होत नाही/त?
अ) राष्ट्रपती आणि राज्यपाल यांना कलम 361 नुसार संरक्षण देण्यात आले असल्यामुळे त्यांच्या पदाचे
अधिकार आणि कर्तव्य पार पाडण्यासंबंधी ते कोणत्याही न्यायालयाला उत्तरदायी नाहीत.
ब) राष्ट्रपती किंवा राज्यपाल यांच्याविरुद्ध त्यांच्या कार्याकाळात कोणतीही फौजदारी किंवा दिवाणी प्रक्रिया
सुरू ठेवता येत नाही.
क) संसदेमध्ये किंवा संसद समितीमध्ये कोणत्याही बाबतीत केलेल्या मतदानासंदर्भात किंवा वक्तव्याबाबत
कोणत्याही न्यायालयात संसद सदस्या विरुद्ध खटला दाखल करता येत नाही.

136 / 999

खालील विधान/ ने योग्य की अयोग्य ठरवा.
अ) परदेशी सार्वभौम शासक, परदेशी नागरिक यांना फौजदारी व नागरिक खटलांपासून संरक्षण असते.
ब) परदेशी वकिलांना संयुक्त राष्ट् रे व त्यांच्या संस्था प्रमाणे संरक्षण नसते.

137 / 999

राज्य विधिमंडळामध्ये किंवा विधिमंडळाच्या समितीमध्ये कोणत्याही बाबतीत केलेल्या वक्तव्याबाबत किंवा
केलेल्या मतदानाबाबत राज्य विधिमंडळाच्या सदस्यविरुद्ध कोणत्याही न्यायालयात दावा दाखल करता येत नाही हे कोणत्या कलमात स्पष्ट करण्यात आलेले आहे?

138 / 999

खालीलपैकी योग्य विधाने ओळखा.
अ) कलम 15 मधील तरतुदीनुसार केवळ धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्म ठिकाण या कारणांमुळे राज्य
कोणत्याही नागरिकाविरुद्ध भेदभाव करू शकत नाही.
ब) परंतु राज्य महिला आणि बालकांसाठी विशेष तरतुदी करू शकते.
क) राज्य सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीय नागरिकांसाठी किंवा अनुसूचित जाती व अनुसूचित
जमाती यांच्या विकासासाठी विशेष तरतुदी करू शकते.

139 / 999

खालील विधाने लक्षात घ्या.
अ) कलम 12 मध्ये घटनेच्या तिसऱ्या भागात राज्याची व्याख्या करण्यात आलेली आहे.
ब) सर्व स्थानिक प्राधिकरणे म्हणजेच नगरपालिका, पंचायत, जिल्हा मंडळ, विश्वस्त इत्यादींचा राज्याच्या
व्याख्येत समावेश होतो.
क) इतर सर्व प्राधिकरणे म्हणजेच एलआयसी, ओएनजीसी, सेल ही राज्याच्या व्याख्येत समाविष्ट होतात.
वरीलपैकी कोणते विधान/ विधाने अचूक आहेत?

140 / 999

मूलभूत अधिकारांशी विसंगत किंवा भंग करणारे कायदे कोणत्या कलमांतर्गत रद्दबादल घोषित केले
जातात?

141 / 999

प्रसिद्ध मंडल खटल्यामध्ये (1992) सर्वोच्च न्यायालयाने मागासवर्गीयांसाठी नोकऱ्यांमध्ये आरक्षणाची तरतूद
असलेल्या अनुच्छेद 16 (4) च्या व्याप्तीचे सर्वंकष परीक्षण केले. सर्वोच्च न्यायालयाने याबाबतीत खालीलपैकी
कोणते निर्णय दिले आहेत?
अ) न्यायालयाने उच्च जातीच्या गरीब घटकांसाठी केलेले 10% आरक्षण रद्द केले.
ब) इतर मागासवर्गीयांसाठी केलेले सत्तावीस टक्के आरक्षण घटनात्मकदृष्ट्या काही अटींसह वैध ठरवले.
क) इतर मागासवर्गीयांपैकी उन्नत गटात असलेल्या प्रगत घटकांना आरक्षणाच्या लाभातून वगळले जावे.
वरीलपैकी कोणते विधान/ विधाने बरोबर आहेत?

142 / 999

खालीलपैकी कोणत्या खंडात जगातील सर्वात अधिक धर्मनिरपेक्ष राज्ये आहेत?

143 / 999

योग्य कथने ओळखा.
अ) अनुच्छेद 33 संसदेला सशस्त्र दल, निमलष्करी दल, पोलिस दलातील सदस्यांचे मूलभूत अधिकार
प्रतिबंधित किंवा रद्द करण्याचा अधिकार देते.
ब) अनुच्छेद 33 चे उद्दिष्ट कर्तव्यांचे योग्य पालन सुनिश्चित करणे आणि सैन्यामध्ये शिस्त राखणे हे आहे.
क) अनुच्छेद 33 अन्वये कायदे करण्याचा अधिकार राज्य विधान मंडळालाही बहाल करण्यात आला आहे.

144 / 999

मिनर्व्हा मिल्स प्रकरणाच्या परिणामी ----- असल्यास कलम 31-C द्वारे कायदा संरक्षित केला जाईल.

145 / 999

योग्य विधाने ओळखा.
अ) कलम 30 नुसार केवळ धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्याकांना संरक्षण प्राप्त आहे.
ब) शिक्षणाचा अधिकार कायदा 2009 मधून मदरसे, वैदिक पाठशाळा यांना वगळण्यात आले आहे.
क) कलम 30 नुसार स्थापन झालेल्या संस्थांना प्रशासन स्वमर्जीने करण्याचा अधिकार असला तरी करार
कायदे, कामगार कायदे इ. साधारण कायदे लागू होतात.

146 / 999

योग्य विधाने ओळखा.
अ) न्यायिक पुर्नविलोकन हा शब्दप्रयोग भारतीय राज्यघटनेत कोठेही वापरला नाही.
ब) मूलभूत हक्कांचे उल्लंघन करणारे केवळ कायदेच नव्हे तर कायद्याची शक्ती प्राप्त असणाऱ्या रुढी यांना
देखील न्यायालयात आव्हान देता येते.
क) केशवानंद भारती खटल्यानुसार संसदेला मूलभूत हक्कांमध्ये दुरुस्ती करता येत नाही.
ड) मूलभूत हक्क हे वैयक्तिक स्वातंत्र्य व सामाजिक नियंत्रण यामध्ये संतुलन निर्माण करतात.

147 / 999

खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?

148 / 999

योग्य कथने ओळखा.
अ) भारतीय संविधानाचे अनुच्छेद 17 अस्पृश्यता निर्मूलनाशी संबंधित आहे.
ब) अस्पृश्यता गुन्हे अधिनियम जून 1955 पासून अंमलात आला.
क) 1976 मध्ये अस्पृश्यता (गुन्हे) अधिनियमाचे नांव नागरी हक्क सुरक्षा कायदा असे बदलविण्यात आले.

149 / 999

खालीलपैकी कोणती मार्गदर्शक तत्त्वे आहेत ?
अ) राष्ट् रीय महत्त्वाची स्मारके, स्थाने व वस्तू यांचे संरक्षण करणे.
ब) भारताचे सार्वभौमत्व, एकता व एकात्मता यांचे संरक्षण करणे.
क) कुटीर उद्योगांना प्रोत्साहन देणे.
ड) आपल्या संमिश्र संस्कृ तीचे व समृद्ध वारसाचे मोल जाणून त्यांचे जतन करणे.

150 / 999

खालीलपैकी कोणते मार्गदर्शक तत्त्वांचे ध्येय नाही ?

151 / 999

खालीलपैकी कोणते विधान/ने अयोग्य नाही/त?
अ) 86 वी घटनादुरुस्ती शिक्षणाशी संबंधित आहे.
ब) 97 वी घटनादुरुस्ती सहकारी संस्थांच्या संदर्भात आहे.

152 / 999

खालीलपैकी अयोग्य विधान/ने ओळखा.
अ) कलम 48 हे न्यायपालिकेस कार्यकारी मंडळापासून वेगळे करण्याबद्दल आहे.
ब) कलम 51 हे आंतरराष्ट् रीय शांतता व सुरक्षा यांच्या संदर्भात आहे.

153 / 999

खालीलपैकी कोणते मार्गदर्शक तत्त्व 42 व्या घटनादुरुस्तीने समाविष्ट करण्यात आलेले नाही?

154 / 999

खालीलपैकी योग्य जोड्या ओळखा.
अ) कलम 40 - ग्रामपंचायतीचे संघटन
ब) कलम 44 - समान नागरी कायदा
क) कलम 49 - कृषी व पशुसंवर्धन

155 / 999

मार्गदर्शक तत्त्वांमधील खालीलपैकी कोणते कलम 97 व्या घटनादुरुस्तीने समाविष्ट करण्यात आले ?

156 / 999

खालीलपैकी योग्य जोड्या ओळखा.
अ) 39 (अ) - समान न्याय व मोफत कायदेशीर सहाय्य
ब) 43 (अ) - उद्योगधंदे व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग
क) 38 (2) - उत्पन्नाची विषमता किमान पातळीवर आणणे

157 / 999

खालीलपैकी कोणती विधान/ने अयोग्य नाहीत?
अ) मार्गदर्शक तत्वे घटनेच्या भाग 4(A) मध्ये समाविष्ट आहेत.
ब) कलम 36 ते 51 मार्गदर्शक तत्वांशी संबंधित आहेत.

158 / 999

खालीलपैकी कोणते मार्गदर्शक तत्त्व 42 व्या घटनादुरुस्तीने समाविष्ट करण्यात आले आहे ?

159 / 999

खालीलपैकी अयोग्य विधान/ने ओळखा.
अ) मार्गदर्शक तत्वे न्यायप्रविष्ट नाहीत.
ब) मार्गदर्शक तत्वे न्यायालयांना कायद्याची घटनात्मक तपासण्यास मदत करतात.

160 / 999

खालीलपैकी योग्य विधान/ ने ओळखा.
अ) घटनाकारांनी राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे आयर्लंडच्या घटनेतून घेतली आहेत.
ब) आयर्लंडच्या घटनेने ही तत्त्वे स्पेनच्या घटनेतून घेतली आहेत.

161 / 999

पुढील विधाने विचारात घ्या.
अ) 37 व्या घटनादुरुस्तीने राष्ट् रीय आणीबाणीच्या घोषणेस न्यायालयीन पुनर्विलोकन कक्षेबाहेर ठेवण्यात
आले.
ब) संसदेच्या एक दशांश सदस्यांनी आणीबाणी रद्द करण्याविषयी लेखी प्रस्ताव राष्ट्रपतींना दिल्यास 14
दि वसांच्या आत लाेकसभेची विशेष बैठक बोलाविण्यात येते.
क) "आणीबाणीच्या तरतूदी म्हणजे घटनेचा श्वास होय" - असे वर्णन अल्लादी कृष्णस्वामी अय्यर यांनी
केले आहे.
ड) कलम 356 अंतर्गत लागू करण्यात येणाऱ्या आणीबाणीस घटनात्मक आणीबाणी असे म्हणतात.
योग्य विधाने ओळखा.

162 / 999

खालील विधाने लक्षात घ्या.
अ) राष्ट्रपती राजवट किंवा आर्थिक आणीबाणीच्या काळात मूलभूत हक्कांवर बंधने घातली जाऊ शकतात.
ब) मूलभूत हक्क हे राजकीय लोकशाहीच्या कल्पनेला प्रोत्साहित करतात.
पर्यायी उत्तरे :

163 / 999

राष्ट्रपती राजवटीविषयी खालीलपैकी अयोग्य विधान/ने कोणते/ती ?
अ) कलम 355 नुसार घटनेतील तरतुदीप्रमाणे राज्यातील सरकार काम करीत आहे, हे सुनिश्चित करणे
कें द्र सरकारचे कर्तव्य आहे.
ब) कलम 356 नुसार केवळ राज्यपालाच्या अहवालानुसारच राष्ट्रपती राजवट लागू करता येते.
क) घोषणेपासून दोन महिन्यांच्या आत लोकसभेने त्याला साध्या बहुमताने मान्यता दिली पाहिजे.
पर्यायी उत्तरे :

164 / 999

राष्ट्रीय आणीबाणीबद्दल खालील विधाने विचारात घ्या आणि योग्य विधान/ने निवडा.
अ) राष्ट् रीय आणीबाणीच्या घोषणेला संसदेच्या दोन्ही सभागृहांनी ती जारी केल्याच्या तारखेपासून 2
महिन्यांच्या आत मंजूर करणे आवश्यक आहे.
ब) हा ठराव दोन्ही सभागृहांनी विशेष बहुमताने मंजूर करणे आवश्यक आहे.
क) राष्ट् रीय आणीबाणी संसदेच्या मान्यतेने दर 6 महिन्यांनी अनिश्चित काळासाठी वाढवली जाऊ शकते.

165 / 999

खालील विधाने विचारात घ्या आणि योग्य पर्याय निवडा.
अ) जेव्हा युद्ध, बाह्य आक्रमण आणि सशस्त्र बंड यांमुळे राष्ट् रीय आणीबाणी घोषित केली जाते तेव्हा कलम
19 आपोआप निलंबित होते.
ब) कलम 359 हा कलम 20 आणि 21 द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांशिवाय इतर मूलभूत अधिकारांच्या
निलंबनाशी संबंधित आहे.

166 / 999

आर्थिक आणीबाणीबद्दल योग्य विधाने ओळखा.
अ) राष्ट्रपती आर्थिक आणीबाणीची घोषणा करू शकतात, जर त्यांचे समाधान झाले की अशी परिस्थिती
उद्भवली आहे ज्यामुळे भारताची आर्थिक स्थिरता किंवा पत किंवा त्याच्या भूभागाचा कोणताही भाग
धोक्यात आला आहे.
ब) संसदेच्या दोन्ही सभागृहांनी अशी घोषणा जारी केल्यापासून तिला दोन महिन्यांच्या आत मंजूर करणे
आवश्यक आहे.
क) संसदेच्या संमतीची वारंवार आवश्यकता नाही.
ड) राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांचे वेतन आणि भत्ते कमी करू शकतात.

167 / 999

पुढील विधाने विचारात घ्या.
अ) 1950 पासून 100 पेक्षा जास्त वेळा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे.
ब) राष्ट्रपती राजवट रद्द करण्यासाठी संसदेच्या मान्यतेची अावश्यकता नसते.
वरीलपैकी अयोग्य विधान/ने ओळखा.

168 / 999

पुढील विधाने विचारात घ्या.
अ) मूलभूत हक्क फक्त नागरिकांसाठीच असतात.
ब) मूलभूत हक्क अपरिवर्तनीय असतात.
क) राष्ट् रीय आणीबाणीच्या वेळी सर्व मूलभूत हक्क निलंबीत होतात.
चुकीचे विधान/ने निवडा.

169 / 999

भारतीय राज्यघटनेचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य वायमर राज्यघटनेतून (जर्मनी) घेतले गेले आहे?

170 / 999

खालीलपैकी कोणते कलम केंद्र सरकारला बाह्य आक्रमण आणि अंतर्गत बंडांपासून कोणत्याही राज्याचे संरक्षण करण्यासाठी पूर्वाश्रमीची कारवाई करण्याचा अधिकार देतो?

171 / 999

विधान (अ): संसदीय पद्धतीमध्ये प्रशासनावरील कायदेमंडळाचे नियंत्रण अध्यक्षीय पद्धतीपेक्षा भिन्न असते.
कारण (ब): प्रशासनावर कायदेमंडळाचे नियंत्रण हे लोकसत्ताक शासनाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.

172 / 999

भारतीय राज्यघटनेची खालीलपैकी एकात्मिक वैशिष्ट्ये कोणती?
अ) अखिल भारतीय सेवा ब) लवचिक राज्यघटना
क) आणिबाणीच्या तरतुदी ड) राज्यपालाची नियुक्ती
इ) ताठर राज्यघटना
पर्यायी उत्तरे:

173 / 999

राज्यघटनेचे स्वरूप संघराज्य असून हे घटनेचे मूलभूत वैशिष्ट्य आहे', असे सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या
खटल्यात अधोरेखित केले आहे?

174 / 999

संसदीय शासन पद्धतीचा प्रमुख लाभ ___________ हा आहे.

175 / 999

खालील विधाने विचारात घ्या.
अ) भारतीय संविधानाने ब्रिटीश संसदीय प्रारूपाचे अनुकरण केले आहे.
ब) भारतात संविधान सर्वश्रे ष्ठ आहे, संसद नव्हे.
क) भारतातील न्यायालयांना संसदेने पारित केलेल्या कायद्याची संविधानिकता तपासण्याची सत्ता प्राप्त नाही.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

176 / 999

भारतीय संघराज्य कॅनडाच्या संघराज्याशी पुढील घटकांबाबत साधर्म्य साधते-
अ) 'संघ' या संज्ञेचा वापर ब) कें द्रीकरणाकडे कल
क) स्थापनेची पद्धत ड) एकेरी नागरिकत्व

177 / 999

पुढील विधाने विचारात घ्या.
अ) साम्यवादी राष्ट् रांनी मूलभूत हक्क व मूलभूत कर्तव्ये यांना समान महत्त्व दिले आहे.
ब) कर्तव्यांचे पालन करण्यास नकार देणे अथवा त्यास अनुसरून वर्तणुक नसल्यास योग्य ती कायदेशीर
शिक्षा देण्याची तरतूद संसदेने करावी, स्वर्णसिंग समितीची ही शिफारस तत्कालिन सरकारने नाकारली
असली तरी काही मूलभूत कर्तव्यांच्या अंमलबजावणीसाठी कायदेशीर तरतूदी असल्याचे निरिक्षण वर्मा
समितीने (1999) नोंदविले आहे.
क) एखाद्या कायद्याची घटनात्मक वैधता तपासण्यासाठी सर्वोच्च न्यायालय मूलभूत कर्तव्यांचा आधार घेऊ
शकते.
ड) जपानची राज्यघटना ही नागरिकांच्या कर्तव्यांची सूची देणारी लोकशाही देशातील एकमेव घटना आहे.

178 / 999

भारताच्या संदर्भात खालीलपैकी कोणता मुलभूत हक्क आणि मूलभूत कर्तव्ये यांच्यातील योग्य संबंध आहे?