चाणक्य मंडल परिवार च्या विद्यार्थ्यांना केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पुन्हा एकदा दणदणीत यश.
संपूर्ण भारतात पहिली आलेली ईशिता किशोरे तसेच महाराष्ट्रात पहिली आलेली कश्मिरा सांखे हिने चाणक्य मंडल मधून वेळोवेळी मार्गदर्शन घेतले आहे.या परीक्षेत एकूण 933 पैकी 279 विद्यार्थी यांनी चाणक्य मध्ये विविध स्तरावर मार्गदर्शन घेतलेले आहे. संपूर्ण भारतात पहिल्या आलेल्या 10 मध्ये 4, पहिल्या 25 मध्ये 9, पहिल्या 100 मधील 32 विद्यार्थ्यांनी चाणक्य मंडल मध्ये मार्गदर्शन घेतले आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मा. अविनाश धर्माधिकारी सर यांनी विशेष अभिनंदन केले आहे आणि भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

