Chanakya Mandal Pariwar

MPSC Course

MPSC Comprehensive Course

MPSC म्हणजे काय? व ती कोणकोणत्या परीक्षा घेते ?

MPSC म्हणजे MAHARASHTRA PUBLIC SERVICE COMMISSION म्हणजेच राज्य लोकसेवा आयोग. ही एक घटनात्मक संस्था असून भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३१५ अन्वये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीतल्या वेगवेगळ्या सेवांसाठी आणि पदांसाठी स्पर्धा परीक्षा घेऊन उमेदवारांची निवड करण्याचं काम ही संस्था करते. MPSC मार्फत राज्य शासनाच्या वेगवेगळ्या विभागामध्ये वेगवेगळ्या पदांसाठी स्पर्धापरीक्षा घेऊन उमेदवारांची निवड केली जाते.

(वर्ष २०२३ पासून आयोग खालील प्रमाणे दोन संयुक्त पूर्व परीक्षा घेणार आहे १.महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट ‘अ’ आणि गट ‘ब’ संयुक्त पूर्व परीक्षा २.महाराष्ट्र अराजपत्रित गट ‘ब’ आणि गट ‘क’ सेवा संयुक्त पूर्व परीक्षा.)

मॉड्यूल पॅटर्न

चाणक्य मंडल परिवार मध्ये सर्व विषय हे मॉड्यूल पॅटर्ननुसार शिकवले जातात.

काय आहे हा मॉड्यूल पॅटर्न..?

मॉड्यूल पॅटर्न म्हणजे सामान्य अध्ययनाचे उपविषय एका मागून एक घेतले जातात. एखादा विषय त्या विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत शिकवला जातो व त्यानंतर दुसरा विषय शिकवला जातो. या विशिष्ट उप विषयाच्या नोट्स देखील त्याच वेळेस दिल्या जातात आणि शिकवल्यानंतर सराव चाचणी देखील घेतली जाते. अशा प्रकारे हा पॅटर्न प्रत्येक उप विषय विद्यार्थ्यांना नीट समजला जाईल याची खात्री करून घेतो.

तुमच्या पदवीचे विषय वगळता इतर सर्व उपविषय तुमच्यासाठी अज्ञात आणि नवीन आहेत. जर तुम्ही हे विषय एकेक करून अविरतपणे शिकलात तरच तुम्ही त्यात प्रभुत्व मिळवू शकाल आणि त्यासाठी हा पॅटर्न अतिशय उपयुक्त ठरतो असा आमचा अनुभव आहे

परंतु, या पॅटर्नमध्ये हे उघड आणि अपरिहार्य आहे की अभ्यासक्रमाच्या शेवटी काही विषय शिकवावे लागतील. कधीकधी काही विद्यार्थ्यांना भीती वाटते की आपण अभ्यासक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात येत आहोत आणि एका विशिष्ट विषयासाठी एकही सत्र आयोजित केलेले नाही. पण यात घाबरण्यासारखे अजिबात काही नाही, कारण प्रत्येक विषय त्याच्या क्रमानुसार शिकवला जाणार आहे. याउलट जे विषय शेवटी शिकवले जातील ते परीक्षेच्या आधी शिकवले जातात आणि तुमच्या मनात ताजे राहतात. विद्यार्थ्यांनी त्यांचे स्वयं-अभ्यासाचे वेळापत्रक वर्गांसोबत जुळवून घेतल्यास त्यांना अधिक फायदा होतो असाही आमचा अनुभव आहे

Course Start:

Location / Event Date
Sadashiv Peth (Pune) 19 Jan 2026
Warje (Pune) 19 Jan 2026
Sion (Mumbai) 28 March 2026
Chhatrapati Sambhajinagar 23 Feb 2026

अभ्यास महोत्सव

दरवर्षी चाणक्य मंडल परिवार UPSC आणि MPSC परीक्षांच्या तयारीसाठी निवासी अभ्यास शिबिरे आयोजित करते. अभ्यास महोत्सवाची वैशिष्टे

    • एकूण तीन दिवसांचा हा महोत्सव असेल.
    • सकाळी ७:३० ते रात्री ८ पर्यंत म्हणजे दिवसभर सत्र होतील.
    • चाणक्य मंडलचे फॅकल्टिज, प्रशासनातील अधिकारी ते प्रतिभावंत व्यक्तींची सत्र या काळात होत असतात. >> संपूर्ण ‘अभ्यास महोत्सवा’ मध्ये शिबिराच्या ठिकाणी सर्व सहभागींच्या भोजनाची व्यवस्था केली जाते.
    • काही सत्रे सर्व विद्यार्थ्यांसाठी एकत्रित केली जातात आणि ती प्रामुख्याने मराठीत घेतली जातात.

             अभ्यास महोत्सवाचे महत्वः

    • सलग तीन दिवसांच्या या मॅरेथॉन अभ्यासामुळे विध्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासातील सातत्य आणि एकाग्रता वाढण्यासाठी मदत होते.
    • यासाठी वेगेळे शुल्क आकारले जात नाही. परंतु, अभ्यास महोत्सवाला उपस्थिती अनिवार्य असते.

MPSC Study Kit

चाणक्य मंडल परिवारच्या MPSC Comprehensive Course ला Admission घेतलेल्या विद्यार्थ्यांना चाणक्य मंडल तर्फे एक Study Kit दिला जातो. या मध्ये MPSC राज्यसेवा परीक्षेसाठी लागणारी काही महत्वाची पुस्तके आणि एक बॅग दिली जाते.

Study Kit मध्ये दिली जाणारी पुस्तके -
  • नवा विजयपथः लेखक-अविनाश धर्माधिकारी सर
  • ७५ सोनेरी पानेः लेखक-अविनाश धर्माधिकारी सर
  • भूगोल व पर्यावरणः लेखक – सवदी
  • Oxford Student Atlas
  • भारतीय राज्यघटना, राजकारण आणि कायदे : लेखक-अभिजित शिंदे सर
  • पंचायतराजः लेखक-मनोज राऊत (Dy. CEO)
  • आधुनिक भारताचा इतिहासः लेखक – डॉ. गाठाळ
  • Lucent’s General Knowledge
Main

This will close in 0 seconds