Chanakya Mandal Pariwar

Chanakya Mandal Vishwa Vidyapeeth (Proposed)

आकांक्षांचीपरीक्षा (मे 2024)

प्रशासनाचा उल्लेख नेहमी ‘पोलादी चौकट’(स्टीलफ्रेम) असा होतो. ही वस्तुस्थिती आहे की आधुनिक काळातली भारतीय प्रशासनाची ही ‘पोलादी चौकट’ मुख्यतः आणि मुळात ब्रिटिश राज्यकाळात तयार झाली. त्यावेळी या ‘पोलादी चौकटी’चा मुख्य उद्देश नियंत्रणात्मक (रेग्युलेटरी) होता. देशावर ब्रिटिशांचं राज्य कायम करणं आणि ब्रिटनच्या भल्यासाठी भारताचं शोषण करणं हे त्या ‘पोलादी चौकटी’चे मुख्य हेतू होते. परंतु, भारताला स्वातंत्र्य … Read more

नागरिकत्व सुधारणा कायदा : गरज, विरोध आणि वास्तव (एप्रिल 2024)

अठराव्या लोकसभेसाठीच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा होण्यास काही तास उरलेले असताना केंद्र सरकारने नागरिकत्व सुधारणा कायदा अर्थात सीएए संदर्भातील अधिसूचना काढली आहे. ९ आणि ११ डिसेंबर २०१९ रोजी हे नागरिकत्व सुधारणा विधेयक राज्यसभा आणि लोकसभेमध्ये मांडले गेले आणि मंजूरही झाले होते. २०१४ च्या लोकसभा निवडणुकातील भाजपच्या मूळच्या जाहीरनाम्यामध्ये हा मुद्दा समाविष्ट होता. लोकशाही संकेतांनुसार याचा अर्थ … Read more

अर्थसंकल्प आणि अर्थव्यवस्था (मार्च 2024)

Economics is to social sciences, what Mathematics is to sciences असं मला नेहमी वाटतं. याला वाक्याला दोन अर्थ आहेत. गणित हे इतर सर्व विज्ञानशाखांचं मूळ आहे. म्हणून जितकं चांगलं तुम्हाला गणित कळतं, तितक्या प्रमाणात फिजिक्स, केमिस्ट्री किंवा बायोलॉजीदेखील कळतं. गणिताप्रमाणे अर्थशास्त्र हे इतर समाजशास्त्रांचं मूळ आहे. अर्थशास्त्र जर चांगलं कळत असेल तर इतिहास, राज्यशास्त्र आणि … Read more

राम जन्मभूमी प्राण प्रतिष्ठा (फेब्रुवरी 2024)

राम! राम!! सर्व वयाच्या सर्व मित्र-मैत्रिणींनो – राम! राम!! मला ओळखणारे तुम्ही सगळे क्षणभर विचारात पडले असाल; असे विचारात पडे-पडेपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल, की एरव्ही माझ्या बोलण्याची सुरुवात – सर्वांना सर्वकाळ सर्व शुभेच्छा! पासून होते. पण आजची सुरुवात ‘राम राम’नं होते आहे. सर्वत्र ‘राम’संपूर्ण भारतभर, सर्व भाषांमध्ये, हजारो वर्षांपासून दोन भारतीय सहज एकमेकांना भेटले … Read more

‘सर्वोच्च’ निकालाचा बोध (जानेवारी 2024)

११ डिसेंबर २०२३…. या दिवसाचीही भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद होईल. या दिवशी भारताच्या सर्वोच्च न्यायालयानं जम्मू-काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे आणि जम्मू-काश्मीर भारताशी एकरूप आहे, या मुद्द्यावर ‘संविधानिक (कॉन्स्टिट्यूशनल)’ मान्यतेची मोहोर उमटवली. ऑगस्ट २०१९ चा क्रांतिकारक निर्णय केंद्र सरकारनं लोकसभा आणि राज्यसभेत ५ ऑगस्ट २०१९ ला कलम ३७० मध्ये काही बदल केले होते. ते बदल … Read more

आत्म विनाशाच्या वाटेवर…(डिसेंबर 2023)

एखाद्या संपूर्ण समाजव्यवस्थेलाच, चुकीच्या मुद्द्याच्या आधारे, चुकीच्या मार्गावर नेता येतं का आणि अशी एखादी संपूर्ण समाजव्यवस्थाच चुकीच्या मार्गावर निघाली, तर त्याचे काय परिणाम होतात, हे सर्व समजून घ्यायचं असेल तर सध्याचं, अत्यंत दुःखद उदाहरण म्हणजे पंजाबमधली खालिस्तान चळवळ. नुसते ‘पंजाब’ हे शब्द ऐकू आले तरी, खरं म्हणजे, डोळ्यापुढं उभा राहतो हिरवागार प्रदेश. अत्यंत कष्टाळू शेतकरी … Read more

समान नागरी कायदा (नोव्हेंबर 2023)

स्वातंत्र्याच्या शंभरीकडं वाटचाल करत असताना भारत देशासमोर अनेक गंभीर मुद्दे उभे आहेत. संपूर्ण देशासाठी समान नागरी कायदा लागू करणं हा त्यातलाच एक महत्त्वाचा मुद्दा. या विषयाच्या मुळाशी जात त्याची सखोल आणि अभ्यासपूर्ण माहिती या दीर्घ लेखात मांडली आहे. दीपावलीनिमित्त ‘चाणक्य मंडल परिवार’च्या सर्व विद्यार्थ्यांना, वाचकांना ही शब्दरूपी भेट! गंमत म्हणून, कधी कुणी मला विचारलं, किंवा … Read more

जागतिक कारस्थानाचे धागेदोरे (ऑक्टोबर 2023)

भारत-कॅनडा संबंधात ताणतणाव भारताची चांद्रयान मोहीम संपूर्णतः यशस्वी झाली. त्यानंतर जी२० परिषदेचं यशस्वी समापन झालं. रशिया-युक्रेन युद्धसहित एकूणच जागतिक परिस्थिती, जगाच्या मुख्य शक्तींमध्ये असलेले मतभेद (उदा. अमेरिका आणि चीन इ.) लक्षात घेता जी२० परिषदेच्या यशासमोर अनेक प्रश्नचिन्हं होती. परिषदेच्या शेवटी सर्वानुमते घोषणापत्र जाहीर होईल का, यावरदेखील प्रश्नचिन्ह होतं. मात्र या सर्व अवघड राजनैतिक आव्हानांना सामोरं … Read more

समान नागरी कायदा (सप्टेंबर 2023)

समान नागरी कायदा देशात समान नागरी कायद्याची पुन्हा एकदा, नव्यानं चर्चा होताना दिसते आहे. शाहबानो खटल्यात सर्वोच्च न्यायालयानं निकाल दिला. वयाच्या सत्तरीत असलेल्या शहाबानो यांना तो अनुकूल होता. हा निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाचं खंडपीठ म्हटलं होतं, की आता सरकारनं समान नागरी कायद्याच्या दिशेनं पावलं टाकायला हवीत. त्यानुसार, खरं म्हणजे, तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी त्या … Read more

चांद्रयान ३ (ऑगस्ट 2023)

नमस्ते! आणि अर्थातच, नेहमीप्रमाणे, कायमसाठी, सर्वांना सर्वकाळ सर्व शुभेच्छा! खूप आधीपासून मी माझ्या डायरीत एका भेटीच्या वेळेची काळजीपूर्वक नोंद करून ठेवली होती. शुक्रवार, १४ जुलै, दुपारी दोन वाजून ३५ मिनिटं. ती ठरलेली अपॉइंटमेंट होती – टीव्हीसमोर बसणं. कारण चांद्रयान ३ चं प्रक्षेपण त्यावेळी ठरलं होतं. ते प्रक्षेपण डोळे भरून पाहणं ही माझी ठरलेली अपॉइंटमेंट! ‘चांद्रयान … Read more