Chanakya Mandal Pariwar

Chanakya Mandal Vishwa Vidyapeeth (Proposed)

अत्यंत सावध पवित्रा हवा

बांगलादेश निवडणूकबांगलादेशातल्या निवडणुकांचं पूर्वनियोजित कर्मकांड अपेक्षेप्रमाणं पार पडलं. १२ फेब्रुवारीला मतदान, १३ फेब्रुवारीपर्यंत मतमोजणी होऊन बीएनपी – बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टी – दोन तृतीयांशपेक्षा जास्त बहुमत घेऊन आता सरकार बनवेल. बांगलादेशच्या राजकीय चित्रामधली दुसरी राजकीय संघटना, जमात ए इस्लामी, जिची राजकीय विचारधारा कट्टर, धर्मांध आणि हिंसक इस्लामिक विचारधारा आहे.जानेवारी २०२४ मध्ये बांगलादेशात झालेल्या निवडणुकीत ‘अवामी लीग’च्या … Read more

एमपीएससी परीक्षापद्धतीतील बदल

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेच्या पॅटर्नमध्ये बदलाचा निर्णय जाहीर होऊन तीन वर्षांचा कालावधी उलटला आहे. जून २०२२ मध्ये आयोगानं ही रचना जवळजवळ पूर्णपणे यूपीएससी नागरी सेवा परीक्षेच्या धर्तीवर करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय जाहीर करण्यापूर्वी तीन सदस्यांची समिती नियुक्त करण्यात आली होती. त्या समितीनं समाजातले विविध जाणकार, स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे युवक अशा … Read more

शपथविधी देखणा, खरी आव्हानं आता सुरू… ( जानेवारी 2025 )

विधानसभा निवडणूक निकालांनंतर दोन आठवड्यांनी महाराष्ट्रातील नव्या सरकारचा शपथविधी अखेर पार पडला. शपथविधीचा सोहळा देखणा होता. त्याचं व्यवस्थापन खूपच बारकाव्यानं करण्यात आलं आणि अत्यंत नीटस होतं. घटनात्मक द़ृष्ट्या प्रत्यक्ष शपथविधी  असतो त्या निकषांनुरुप अत्यंत सुटसुटीत स्वरुपात हा कार्यक्रम पार पडला. पण त्याच्याआधी सुमारे दीड तास एक अतिशय प्रतिभाशाली सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. तेसुद्धा महाराष्ट्राचं … Read more

महाराष्ट्राचा कौल: भारतासाठी ( डिसेंबर 2024 )

शनिवार, २३ नोव्हेंबरची माध्यान्ह उलटून चालली आहे.संपूर्ण देशाचं आणि काही प्रमाणात जगाचं लक्ष असलेल्या महाराष्ट्र विधानसभेचे निकाल बाहेर येत आहेत. संध्याकाळपर्यंत विविध आकडे वरखाली होत राहतील. तरीही, महाराष्ट्राच्या मतदारांनी महायुतीला निर्विवाद कौल दिला आहे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही.माझ्या मते, हा भारताच्या राष्ट्रवादी विचाराच्या मतदारांचा फार मोठा विजय आहे. प्रथमतः हा लोकशाहीचा विजय आहे. हा … Read more

शुभ दीपावली………पण धोकादायक वळणावर… ( नोव्हेंबर 2024 )

सर्वांना ही दीपावली, येणारं नवीन वर्ष आणि सर्व आयुष्यात, सुख, समाधान, यश, आनंद लाभो, या शुभेच्छा! – अशी माझी ‘शुभ दीपावली’ची शुभेच्छा! या शुभेच्छा व्यक्त करतानाची माझी भावना आहे, की एका अत्यंत धोकादायक कालखंडातली ही दीपावली आहे. एका अत्यंत धोकादायक कालखंडाच्या सावलीत ‘शुभ दीपावली’ या शुभेच्छा, ही प्रार्थना मी व्यक्त करतो आहे. आपल्या भारतीय संकल्पनांमध्ये कमालीचा सखोल अर्थ आणि त्यामुळं त्यात विलक्षण सौंदर्य भरलेलं आहे. मी … Read more

विकसित भारतासाठी विकसित महाराष्ट्र (ऑक्टोबर 2024)

लवकरच महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. त्यामुळे अर्थातच लोकशाहीच्या स्वभावाला अनुसरून सर्व विषयांमध्ये फक्त राजकारण एके राजकारण येतं आहे. काही प्रमाणात ते साहजिक आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. मात्र अशावेळी महाराष्ट्राकडं पाहताना, खरोखर अंत:करण पिळवटून टाकणारा प्रश्न मनाला पडतो – या महाराष्ट्राला झालंय तरी काय? …महाराष्ट्राला झालंय तरी काय! महाराष्ट्राचं भारतातलं स्थान हे, भारत आणि … Read more

बांगलादेश : भारत आणि जगासाठी धोक्याचा इशारा ( सेप्टेंबर 2024)

दिवसभराचे तास संपवून घरी येत असताना बातम्या तपासत होतो. तेव्हा सगळ्यात मोठी, गंभीर, धक्कादायक आणि महत्त्वाचं म्हणजे धोकादायक बातमी डोळ्यापुढं आली. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना वाजेद बांगलादेशमधून निसटल्या. हेलिकॉप्टरमध्ये बसून भारतात आल्या. गाझियाबादमधल्या ‘हिंदॉन’ नावाच्या तळावर त्या उतरल्या. सत्ता ताब्यात घेतल्याचं बांगलादेशच्या सैन्यानं जाहीर केलं. परिस्थिती आता सुरळीत असून नागरिकांनी लष्करावर विश्वास ठेवावा असं आवाहन … Read more

नोकरी नाही, लोकसेवा (ऑगस्ट 2024)

नोकरी नाही, लोकसेवा रणरणत्या उन्हाळ्यात कोरडंठक्क पडलेलं रान असतं. एका ठिणगीचा अवकाश, की ते सारं रान पेटून उठतं. असं काहीसं पूजा खेडकर प्रकरणाबाबत होत आहे… पूजा खेडकर २०२३ च्या तुकडीची, महाराष्ट्र केडरची आयएएस अधिकारी. पहिली दोन वर्षं आयएएस अधिकार्‍याच्या प्रशिक्षणाचा कालावधी असतो. त्यापैकी दोन भागांत वाटलेलं साधारण १२ महिन्यांचं प्रशिक्षण मसुरीच्या लाल बहाद्दूर शास्त्री नॅशनल अ‍ॅकॅडमी ऑफ अ‍ॅडमिनिस्ट्रेशन इथं होतं. या दोन … Read more

अंतहीन पतनाचा पाठपुरावा (जुलै 2024)

सर्व वयाच्या सर्व मित्र-मैत्रिणींनो,नमस्ते! नेहमीसाठीच, शाश्वतदेखील.सर्वांना सर्वकाळ सर्व शुभेच्छादेखील शाश्वत आहेत.तुमचा-माझा आजचा संवाद नेहमीपेक्षा वेगळ्या प्रकारचा आहे. काही दिवसांपूर्वी पुण्याच्या कल्याणीनगर परिसरात मध्यरात्रीनंतर अठरा वर्षांपेक्षा कमी वयाचा मुलगा दारूच्या गुत्त्यावर (ज्याला ‘पब’ हा स्टायलिश शब्द आहे!) दारू प्यायला. त्या ‘पब’नं दारू देताना त्याला कायद्यानुसार त्याचं वय विचारलं नाही. ‘पब’ला धंदा हवाय. त्या पोराकडं आपल्या बिल्डर … Read more

अभ्यासाला लागा! (जून 2024)

राज्य लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा मुख्य परीक्षेत वर्णनात्मक पॅटर्न २०२५ पासूनच लागू केला जाईल अशी माहिती आयोगाने दिली आहे. काही विद्यार्थ्यांनी आयोगाकडं माहितीच्या अधिकाराअंतर्गत याविषयी विचारणा केली होती. एमपीएससीच्या या उत्तरामुळं समाजमाध्यमांत असलेल्या परीक्षा पॅटर्नसंबंधित संभ्रमाला पूर्णविराम मिळाला.  २४ जून २०२२ रोजी राज्य लोकसेवा आयोगानं सर्वप्रथम हा ऐतिहासिक निर्णय जाहीर केला. हा निर्णय जाहीर करण्यापूर्वी तीन सदस्यांची समिती नियुक्त … Read more