Chanakya Mandal Pariwar

Chanakya Mandal Pariwar official logo with Marathi tagline about public service and nation service
Chanakya Mandal Vishwa Vidyapeeth (Proposed)

॥ चाणक्य मंडल विश्व विद्यापीठ ॥

॥ चाणक्य मंडल विश्व विद्यापीठ ॥

॥ एकम् सद् विप्राः बहुधा वदन्ति ॥

भारतीय ज्ञान प्रणालीवर आधारित, जागतिक दर्जाचं विश्व विद्यापीठ

स्वामी विवेकानंद यांची मानव-निर्माणासाठी शिक्षणाची दृष्टी, छत्रपती शिवाजी महाराजांची भारतासाठी कार्य करण्याची दृष्टी आणि चाणक्याचा राष्ट्र निर्माणाचा वारसा या सगळ्यातून प्रेरणा होऊन, आम्हाला भारतीय ज्ञान प्रणाली (Indian Knowledge Systems – IKS) वर आधारित विश्व विद्यापीठ विकसित करण्याची इच्छा आहे.

प्राचीन काळापासूनच भारत विश्वाचे ज्ञान-केंद्र राहिले आहे. भारताने कला, साहित्य, वास्तुकला, इतिहास, नृत्य, नाटक, संगीत, गणित, भौतिक विज्ञान, खगोलशास्त्र यापासून ते अभियांत्रिकीपर्यंत मानवी जीवनाच्या सर्व आयामांमध्ये मौलिक योगदान दिले आहे. 

आता या ज्ञानपरंपरेला आधुनिक, जागतिक दर्जाच्या विश्व विद्यापीठाच्या स्वरूपात नव्याने साकार आणि पुनरुज्जीवित करण्याचा आमचा संकल्प आहे. या विद्यापीठाची रचना राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० मध्ये परिभाषित केलेल्या समग्र, आंतर-विद्याशाखीय आणि विद्यार्थी-केंद्रित दृष्टिकोनावर आधारित आहे.

विश्व विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाची रचना भारतीय ज्ञान प्रणालीचे पुनरुज्जीवन, नव्या दृष्टीकोनातून विश्लेषण आणि संशोधन करण्यासाठी केली जाईल –  ज्यामध्ये वेद, वेदांग, उपनिषद, बौद्ध त्रिपिटक आणि निकाय, जातक साहित्य आणि जैन आगम तसेच आधुनिक भारतीय विचारकांचा समावेश असेल.

प्राचीन ऋषी, मध्ययुगीन संत-कवी आणि महर्षी दयानंद सरस्वती, स्वामी विवेकानंद आणि श्री अरविंदांसारख्या आधुनिक द्रष्ट्यांच्या योगदानांवर विशेष भर दिला जाईल. 

आपली वैदिक प्रार्थना, “आ नो भद्राः क्रतवो यंतु विश्वतः” – संपूर्ण जगातून सर्व चांगले विचार आपल्याकडे येवोत, या विश्वव्यापी दृष्टिकोनाशी सुसंगत राहून, हे विद्यापीठ भारतीय ज्ञानपरंपरा आणि कला तसेच आधुनिक विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित शिक्षण यांचा सृजनशील संगम घडवणार आहे.

विज्ञानाच्या क्षेत्रातील नवीन शोध आणि संकल्पना आज स्वतःच भारताच्या अध्यात्म तत्त्वज्ञानाशी समरस होत आहेत.

विज्ञान आणि भारतीय अध्यात्म विचाराच्या या एकात्मतेच्या मुळाशी आहे, अद्वैत तत्त्वज्ञान – जे अस्तित्वाचं अद्वैत स्वरूप प्रतिपादन करतं – ज्यात जीव आणि ब्रह्म, व्यक्ती आणि विश्वचेतना, हे एकच मानले जातात.

हे तत्त्व केवळ दार्शनिक चिंतन समृद्ध करत नाही, तर वैज्ञानिक घटनांकडे एकात्मिक आणि सर्वांगीण दृष्टिकोनातून पाहण्याची दृष्टी प्रदान करतं.

अध्यात्म विज्ञान, त्याच्या वैश्विक आणि शाश्वत महत्त्वामुळे प्रत्येक विद्यार्थ्याच्या वाटचालीचा एक आवश्यक भाग असेल. हा केवळ एक कठोर सिद्धांत नसून, चिंतन करण्याची, चिकित्सक चौकशी करण्याची आणि आंतरिक जाणीव जागृत करण्याची एक प्रेरणा ठरेल.

अनुभवाधारित संशोधन आणि आंतरिक ज्ञान यांचा समन्वय साधून विद्यार्थ्यांना स्पष्टता, समतोल आणि सकारात्मक उद्देशासह जगाकडे पाहण्यासाठी सक्षम केले जाईल.

हे विश्व विद्यापीठ अत्याधुनिक क्षेत्रं जशी की, कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग, डेटा सायन्स, क्वांटम कंप्यूटिंग, ऑगमेंटेड रियॅलिटी, जेनेटिक्स, बायोटेक्नोलॉजी आणि नॅनोटेक्नोलॉजी यांचा आपल्या शैक्षणिक कार्यक्रमांमध्ये समावेश करेल, ते देखील केवळ तांत्रिक साधनं म्हणून नव्हे, तर सर्वांगीण आणि मूल्याधारित विकासाच्या समग्र संकल्पनेचा घटक म्हणून.

दीर्घकाळापासून इतिहास, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र आणि मानववंशशास्त्रसारखे विषय मुख्यतः वसाहतवादी, मार्क्सवादी इत्यादी (भारतीय दृष्टिकोन वगळता इतर सर्व) दृष्टिकोनातून शिकवले गेले आहेत.

आपल्याला माहीत आहे की, ज्ञानाच्या या सर्व शाखांमध्ये भारताने गहन आणि मौलिक योगदान दिले आहे. हे विद्यापीठ भारताच्या त्या प्राचीन ज्ञानपरंपरेशी पुन्हा नातं जोडण्याचा संकल्प घेऊन उभं राहत आहे.

चाणक्य मंडल विश्व विद्यापीठात, आम्ही वैश्विक भारतीय तत्त्वांवर आधारित सामाजिक शास्त्रांचा पुनर्विचार आणि पुनर्रचना करण्याचे ध्येय ठेवले आहे. हा प्रयत्न केवळ भूतकाळाचे उदात्तीकरण करण्याचा नसून, मुळातच  वैश्विक असलेली भारतीय मूल्ये आणि सत्य प्रतिबिंबित करणारी ज्ञानप्रणाली विकसित करण्याचा आहे. 

भारतीय ज्ञान प्रणाली (IKS) मध्ये पर्यावरण , प्रशासन, अर्थव्यवस्था इत्यादी समकालीन विषयांसंबंधी मूलभूत मूल्ये, रणनीती आणि व्यावहारिक कार्यपद्धती आहेत. हे विश्व विद्यापीठ या ज्ञानशाखांचा पद्धतशीर विकास करेल.

पहिलं पाऊल

आवश्यक सर्व मंजुऱ्या प्राप्त झाल्यानंतर, आम्ही टप्प्याटप्प्याने पदवी आणि पदव्युत्तर पातळीवरील पुढील ज्ञानशाखांपासून सुरुवात करणार आहोत.

हे सर्व अभ्यासक्रम आणि कार्यक्रम मूलतः भारतीय ज्ञान प्रणालीवर (IKS) आधारित असतील.
त्याद्वारे, आधुनिक भारतीय युवा व्यावहारिक, भौतिक, मानसिक आणि बौद्धिक समृद्धी साधून भारत आणि जगाच्या समृद्धीमध्ये प्रभावीपणे योगदान देऊ शकेल.

चाणक्य मंडल परिवार विषयी

श्री. अविनाश धर्माधिकारी सर, आयएएस अधिकारी (१९८६ बॅच), यांनी  १९९६ मध्ये आयएएसचा राजीनामा देऊन चाणक्य मंडल परिवार या  सार्वजनिक धर्मादाय विश्वस्त संस्थेची (Public Charitable Trust) स्थापना केली. या कार्यामध्ये त्यांना श्री. भीष्मराज बाम सर (IPS १९६९), जागतिक ख्यातीचे हृदय शल्य चिकित्सक डॉ. नीतू मांडके आणि इतर प्रख्यात, निःस्वार्थी आणि कुशल व्यक्तींची साथ होती. .

चाणक्य मंडल परिवारची ध्येयवाक्ये : 

१.  वैश्विकतेचे भान आणि कर्तृत्व असलेल्या युवापिढीसाठी… 

२. राष्ट्रीय चारित्र्याचे व्यावसायिक तज्ञ तयार व्हावेत म्हणून…

स्वतःच्या निवडलेल्या कार्यक्षेत्रात उत्तमता आणि प्रतिभा साध्य करून भारत मातेची सेवा करणाऱ्या युवकांना विकसित करणे हे आमचं ध्येय आहे. स्वच्छ आणि कार्यक्षम ‘कार्यकर्ता अधिकारी’ विकसित करणे (असे अधिकारी जे सत्तेचे भुकेले नोकरशहा म्हणून नव्हे, तर भारताचे पूर्णवेळ ‘कार्यकर्ता’ म्हणून विचार आणि काम करतात) आमच्या कार्याचा अत्यंत महत्त्वपूर्ण घटक राहिला आहे.

या विद्यापीठ स्थापनेच्या संकल्पाला आपल्या सर्वांच्या शुभेच्छा, आशीर्वाद आणि सक्रिय सहकार्य लाभो, ही विनंती.

अधिक माहितीसाठी संपर्क :

080-69015445

या विद्यापीठ स्थापनेच्या संकल्पाला आपल्या सर्वांच्या शुभेच्छा, आशीर्वाद आणि सक्रिय सहकार्य लाभो, ही विनंती.

अधिक माहितीसाठी संपर्क :

080-69015445

Main

This will close in 0 seconds