Chanakya Mandal Pariwar

आत्म विनाशाच्या वाटेवर…(डिसेंबर 2023)

एखाद्या संपूर्ण समाजव्यवस्थेलाच, चुकीच्या मुद्द्याच्या आधारे, चुकीच्या मार्गावर नेता येतं का आणि अशी एखादी संपूर्ण समाजव्यवस्थाच चुकीच्या मार्गावर निघाली, तर त्याचे काय परिणाम होतात, हे सर्व समजून घ्यायचं असेल तर सध्याचं, अत्यंत दुःखद उदाहरण म्हणजे पंजाबमधली खालिस्तान चळवळ. नुसते ‘पंजाब’ हे शब्द ऐकू आले तरी, खरं म्हणजे, डोळ्यापुढं उभा राहतो हिरवागार प्रदेश. अत्यंत कष्टाळू शेतकरी … Read more

‘सर्वोच्च’ निकालाचा बोध (जानेवारी 2024)

११ डिसेंबर २०२३…. या दिवसाचीही भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद होईल. या दिवशी भारताच्या सर्वोच्च न्यायालयानं जम्मू-काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे आणि जम्मू-काश्मीर भारताशी एकरूप आहे, या मुद्द्यावर ‘संविधानिक (कॉन्स्टिट्यूशनल)’ मान्यतेची मोहोर उमटवली. ऑगस्ट २०१९ चा क्रांतिकारक निर्णय केंद्र सरकारनं लोकसभा आणि राज्यसभेत ५ ऑगस्ट २०१९ ला कलम ३७० मध्ये काही बदल केले होते. ते बदल … Read more

राम जन्मभूमी प्राण प्रतिष्ठा (फेब्रुवरी 2024)

राम! राम!! सर्व वयाच्या सर्व मित्र-मैत्रिणींनो – राम! राम!! मला ओळखणारे तुम्ही सगळे क्षणभर विचारात पडले असाल; असे विचारात पडे-पडेपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल, की एरव्ही माझ्या बोलण्याची सुरुवात – सर्वांना सर्वकाळ सर्व शुभेच्छा! पासून होते. पण आजची सुरुवात ‘राम राम’नं होते आहे. सर्वत्र ‘राम’संपूर्ण भारतभर, सर्व भाषांमध्ये, हजारो वर्षांपासून दोन भारतीय सहज एकमेकांना भेटले … Read more

अर्थसंकल्प आणि अर्थव्यवस्था (मार्च 2024)

Economics is to social sciences, what Mathematics is to sciences असं मला नेहमी वाटतं. याला वाक्याला दोन अर्थ आहेत. गणित हे इतर सर्व विज्ञानशाखांचं मूळ आहे. म्हणून जितकं चांगलं तुम्हाला गणित कळतं, तितक्या प्रमाणात फिजिक्स, केमिस्ट्री किंवा बायोलॉजीदेखील कळतं. गणिताप्रमाणे अर्थशास्त्र हे इतर समाजशास्त्रांचं मूळ आहे. अर्थशास्त्र जर चांगलं कळत असेल तर इतिहास, राज्यशास्त्र आणि … Read more

नागरिकत्व सुधारणा कायदा : गरज, विरोध आणि वास्तव (एप्रिल 2024)

अठराव्या लोकसभेसाठीच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा होण्यास काही तास उरलेले असताना केंद्र सरकारने नागरिकत्व सुधारणा कायदा अर्थात सीएए संदर्भातील अधिसूचना काढली आहे. ९ आणि ११ डिसेंबर २०१९ रोजी हे नागरिकत्व सुधारणा विधेयक राज्यसभा आणि लोकसभेमध्ये मांडले गेले आणि मंजूरही झाले होते. २०१४ च्या लोकसभा निवडणुकातील भाजपच्या मूळच्या जाहीरनाम्यामध्ये हा मुद्दा समाविष्ट होता. लोकशाही संकेतांनुसार याचा अर्थ … Read more

आकांक्षांचीपरीक्षा (मे 2024)

प्रशासनाचा उल्लेख नेहमी ‘पोलादी चौकट’(स्टीलफ्रेम) असा होतो. ही वस्तुस्थिती आहे की आधुनिक काळातली भारतीय प्रशासनाची ही ‘पोलादी चौकट’ मुख्यतः आणि मुळात ब्रिटिश राज्यकाळात तयार झाली. त्यावेळी या ‘पोलादी चौकटी’चा मुख्य उद्देश नियंत्रणात्मक (रेग्युलेटरी) होता. देशावर ब्रिटिशांचं राज्य कायम करणं आणि ब्रिटनच्या भल्यासाठी भारताचं शोषण करणं हे त्या ‘पोलादी चौकटी’चे मुख्य हेतू होते. परंतु, भारताला स्वातंत्र्य … Read more

अभ्यासाला लागा! (जून 2024)

राज्य लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा मुख्य परीक्षेत वर्णनात्मक पॅटर्न २०२५ पासूनच लागू केला जाईल अशी माहिती आयोगाने दिली आहे. काही विद्यार्थ्यांनी आयोगाकडं माहितीच्या अधिकाराअंतर्गत याविषयी विचारणा केली होती. एमपीएससीच्या या उत्तरामुळं समाजमाध्यमांत असलेल्या परीक्षा पॅटर्नसंबंधित संभ्रमाला पूर्णविराम मिळाला.  २४ जून २०२२ रोजी राज्य लोकसेवा आयोगानं सर्वप्रथम हा ऐतिहासिक निर्णय जाहीर केला. हा निर्णय जाहीर करण्यापूर्वी तीन सदस्यांची समिती नियुक्त … Read more

अंतहीन पतनाचा पाठपुरावा (जुलै 2024)

सर्व वयाच्या सर्व मित्र-मैत्रिणींनो,नमस्ते! नेहमीसाठीच, शाश्वतदेखील.सर्वांना सर्वकाळ सर्व शुभेच्छादेखील शाश्वत आहेत.तुमचा-माझा आजचा संवाद नेहमीपेक्षा वेगळ्या प्रकारचा आहे. काही दिवसांपूर्वी पुण्याच्या कल्याणीनगर परिसरात मध्यरात्रीनंतर अठरा वर्षांपेक्षा कमी वयाचा मुलगा दारूच्या गुत्त्यावर (ज्याला ‘पब’ हा स्टायलिश शब्द आहे!) दारू प्यायला. त्या ‘पब’नं दारू देताना त्याला कायद्यानुसार त्याचं वय विचारलं नाही. ‘पब’ला धंदा हवाय. त्या पोराकडं आपल्या बिल्डर … Read more

नोकरी नाही, लोकसेवा (ऑगस्ट 2024)

नोकरी नाही, लोकसेवा रणरणत्या उन्हाळ्यात कोरडंठक्क पडलेलं रान असतं. एका ठिणगीचा अवकाश, की ते सारं रान पेटून उठतं. असं काहीसं पूजा खेडकर प्रकरणाबाबत होत आहे… पूजा खेडकर २०२३ च्या तुकडीची, महाराष्ट्र केडरची आयएएस अधिकारी. पहिली दोन वर्षं आयएएस अधिकार्‍याच्या प्रशिक्षणाचा कालावधी असतो. त्यापैकी दोन भागांत वाटलेलं साधारण १२ महिन्यांचं प्रशिक्षण मसुरीच्या लाल बहाद्दूर शास्त्री नॅशनल अ‍ॅकॅडमी ऑफ अ‍ॅडमिनिस्ट्रेशन इथं होतं. या दोन … Read more

बांगलादेश : भारत आणि जगासाठी धोक्याचा इशारा ( सेप्टेंबर 2024)

दिवसभराचे तास संपवून घरी येत असताना बातम्या तपासत होतो. तेव्हा सगळ्यात मोठी, गंभीर, धक्कादायक आणि महत्त्वाचं म्हणजे धोकादायक बातमी डोळ्यापुढं आली. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना वाजेद बांगलादेशमधून निसटल्या. हेलिकॉप्टरमध्ये बसून भारतात आल्या. गाझियाबादमधल्या ‘हिंदॉन’ नावाच्या तळावर त्या उतरल्या. सत्ता ताब्यात घेतल्याचं बांगलादेशच्या सैन्यानं जाहीर केलं. परिस्थिती आता सुरळीत असून नागरिकांनी लष्करावर विश्वास ठेवावा असं आवाहन … Read more

Main

This will close in 0 seconds