MPSC तयारी MPSC Preparation
MPSC बद्दल आपल्याला माहित असणे आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट आणि चाणक्य मंडल परिवार उमेदवारांना यशस्वी होण्यासाठी कशी मदत करतो. Everything you need to know about MPSC and how Chanakya Mandal Parivar helps aspirants succeed.
MPSC म्हणजे काय? What is MPSC?
MPSC (MAHARASHTRA PUBLIC SERVICE COMMISSION) म्हणजेच राज्य लोकसेवा आयोग. ही एक घटनात्मक संस्था असून भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३१५ अन्वये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीतल्या वेगवेगळ्या सेवांसाठी आणि पदांसाठी स्पर्धा परीक्षा घेऊन उमेदवारांची निवड करण्याचं काम ही संस्था करते.
MPSC (Maharashtra Public Service Commission) is a constitutional body established under Article 315 of the Indian Constitution. This institution selects candidates by conducting competitive examinations for various services and posts under the jurisdiction of the Maharashtra Government.
MPSC मार्फत राज्य शासनाच्या वेगवेगळ्या विभागांमध्ये वेगवेगळ्या पदांसाठी स्पर्धापरीक्षा घेऊन उमेदवारांची निवड केली जाते. त्यामध्ये खालील प्रमाणे संयुक्त पूर्व परीक्षा घेण्यात येतात:
MPSC conducts competitive examinations for various departments and positions of the state government. The following combined preliminary examinations are conducted:
- महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट 'अ' आणि गट 'ब' संयुक्त पूर्व परीक्षाMaharashtra Civil Services Gazetted Group 'A' and Group 'B' Combined Preliminary Examination
- महाराष्ट्र अराजपत्रित गट 'ब' सेवा संयुक्त पूर्व परीक्षाMaharashtra Non-Gazetted Group 'B' Services Combined Preliminary Examination
- महाराष्ट्र अराजपत्रित गट 'क' सेवा संयुक्त पूर्व परीक्षाMaharashtra Non-Gazetted Group 'C' Services Combined Preliminary Examination
शिवाय अनेक इतर परीक्षा MPSC मार्फत आयोजित केल्या जातात. MPSC चा अभ्यासक्रम इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, आंतरराष्ट्रीय संबंध, अर्थशास्त्र, विज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञान, सामाजिक न्याय, आंतरिक सुरक्षा, नीतिशास्त्र आणि नितीमत्ता अशा अनेक विषयांचा समावेश आहे.
Apart from these, many other examinations are also conducted by MPSC. The MPSC syllabus covers many subjects including History, Geography, Political Science, International Relations, Economics, Science, Science and Technology, Social Justice, Internal Security, Ethics and Integrity.
संरचित मार्गदर्शन का आवश्यक आहे? Why Structured Guidance Matters
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) परीक्षेची तयारी ही केवळ मेहनतीवर अवलंबून नसून ती योग्य दिशेने केलेल्या नियोजनबद्ध प्रयत्नांवर आधारित असते. दरवर्षी लाखो विद्यार्थी मर्यादित पदांसाठी स्पर्धा करतात. अशा स्पर्धात्मक परिस्थितीत संरचित मार्गदर्शन (Structured Guidance) हे यश आणि अपयश याकरिता निर्णायक घटक ठरते.
MPSC exam preparation is not just about hard work but about planned efforts in the right direction. Every year, lakhs of students compete for limited posts. In such a competitive scenario, structured guidance becomes a decisive factor between success and failure.
MPSC चा अभ्यासक्रम अनेक विषयांनी व्यापलेला आहे. योग्य मार्गदर्शनाशिवाय विद्यार्थ्यांना अनेक प्रश्न पडतात: काय वाचावे? किती वाचावे? काय टाळावे? संरचित अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना स्पष्ट दिशा व नियोजन (Right Direction & Perfect Planning) उपलब्ध करून देतो आणि वेळेचा अपव्यय टाळतो.
The MPSC syllabus covers a vast range of subjects. Without proper guidance, students face many questions: What to study? How much to study? What to avoid? A structured curriculum provides students with the right direction and perfect planning, avoiding wastage of time.
चाणक्य मंडल परिवार का निवडावे? Why Choose Chanakya Mandal Parivar?
इतर कोचिंग क्लासेसप्रमाणे, चाणक्य मंडल परिवार एक क्लास नाही, तर खऱ्या अर्थाने एक परिवार आहे. येथे परीक्षाभिमुख तयारीसोबतच व्यक्तिमत्व विकास, नेतृत्वगुण, शिस्त आणि राष्ट्रनिर्माण यांनाही तितकेच महत्त्व दिले जाते. ही एक मूल्याधारित शिक्षण चळवळ आहे, जी विद्यार्थ्यांना केवळ परीक्षेत यश मिळवण्यासाठी नाही तर यशस्वी, जबाबदार आणि राष्ट्राभिमुख अधिकारी बनवण्यासाठी तयार करते.
Unlike other coaching classes, Chanakya Mandal Parivar is not just a class but truly a family. Here, emphasis is placed not only on exam-oriented preparation but equally on personality development, leadership qualities, discipline, and nation-building. This is a value-based educational movement that prepares students not only to succeed in exams but to become successful, responsible, and nation-oriented officers.
एकाग्र आणि शिस्तबद्ध अभ्यासFocused & Disciplined Study
स्वाध्याय पद्धतीवर आधारित एकाग्र आणि शिस्तबद्ध अभ्यास पद्धती.Focused and disciplined study methods with peer support.
नियमित टेस्ट सिरीजRegular Test Series
नियमित टेस्ट सिरीज व सखोल मूल्यमापन.Regular test series with in-depth evaluation and analysis.
अनुभवी मार्गदर्शकExpert Mentors
अनुभवी मार्गदर्शकांकडून गुणवत्तापूर्ण मार्गदर्शन.Quality guidance from experienced and accomplished mentors.
संकल्पनात्मक शिकवणConcept-Based Teaching
संकल्पनांवर आधारित शिकवण, फक्त पाठांतरावर भर नाही.Concept-based learning focused on understanding, not rote memorization.
वैयक्तिक मार्गदर्शनPersonal Mentorship
वैयक्तिक शंका निरसनासाठी विशेष सुविधा (Personal Mentorship).Special facilities for personal doubt resolution and one-on-one mentorship.
व्यक्तिमत्त्व विकासPersonality Development
व्यक्तिमत्त्व विकासावर (Personality Development) विशेष लक्ष.Special attention to personality development and leadership qualities.
राष्ट्रीय दृष्टीकोनNational Perspective
राष्ट्रीय दृष्टीकोन आणि मूल्याधिष्ठित शिक्षण (Value Based Education).National perspective and value-based education for holistic growth.
ऑनलाइन व ऑफलाइनOnline & Offline
Online आणि Offline दोन्ही माध्यमांमध्ये उपलब्धता.Available in both Online and Offline learning modes.
चाणक्य मंडल परिवारामध्ये प्रेरणादायी वातावरण व सातत्य राखण्यासाठी सतत समर्थन दिले जाते. येथे विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक प्रगतीचे नियमित मूल्यमापन करून त्यांना सुधारण्यासाठी योग्य दिशा दिली जाते.
Chanakya Mandal Parivar provides an inspiring environment and continuous support to maintain consistency. Regular assessment of students' individual progress is conducted and appropriate direction for improvement is provided.
अभ्यास साहित्य (Study Kit) Study Kit
परीक्षेला उपयुक्त असे संदर्भ साहित्य उपलब्ध करून दिले जाते, जेणेकरून परीक्षेच्या तयारीला 'to the point' सुरुवात करता येईल.
Reference material useful for the exam is provided so that exam preparation can begin in a focused and 'to the point' manner.
कोर्सची वैशिष्ट्ये Course Features
मॉड्यूल पॅटर्न: तुमच्या पदवीचे विषय वगळता इतर सर्व विषय तुमच्यासाठी अज्ञात आणि नवीन असतात. जर तुम्ही हे विषय एकेक करून अविरतपणे शिकलात तरच तुम्ही त्यात प्रभुत्व मिळवू शकाल आणि त्यासाठी हा पॅटर्न अतिशय उपयुक्त ठरतो. विद्यार्थ्यांनी त्यांचे स्वयं-अभ्यासाचे वेळापत्रक वर्गांसोबत जुळवून घेतल्यास त्यांना अधिक फायदा होतो.
Module Pattern: Apart from your graduation subjects, all other subjects are new to you. Our experience shows that only by learning these subjects one by one continuously can you master them, and this pattern proves very useful. Students benefit more by aligning their self-study schedule with the classes.
शिकवण्याची पद्धती व कौशल्ये Teaching Methodology & Skills
चाणक्य मंडल परिवारामध्ये केवळ अभ्यासक्रम पूर्ण करण्यावर भर नसून खालील कौशल्ये विकसित करण्यावर विशेष लक्ष दिले जाते:
At Chanakya Mandal Parivar, the focus extends beyond completing the syllabus. Special attention is given to developing the following skills:
परीक्षा पद्धती Exam Pattern
MPSC परीक्षा ही तीन टप्प्यांत घेतली जाते: पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत. प्रत्येक टप्प्यासाठी चाणक्य मंडल परिवारामध्ये विशेष तयारी करून घेतली जाते.
The MPSC examination is conducted in three stages: Preliminary, Main, and Interview. Chanakya Mandal Parivar provides specialized preparation for each stage.
कोर्स कोणासाठी उपयुक्त आहे? Who Should Join?
ऑनलाइन आणि ऑफलाइन शिक्षण Online & Offline Learning
ऑनलाइन तसेच ऑफलाइन बॅचेस उपलब्ध असल्यामुळे महाराष्ट्राच्या विविध भागांतील विद्यार्थी सहजपणे MPSC ची तयारी करू शकतात. द्विभाषिक शिकवणीसह शंका निरसनासाठी विशेष मार्गदर्शन उपलब्ध आहे. विशेषकरून ऑनलाइन सत्रामध्ये प्रश्नोत्तर आणि शंकाचे निरसन केले जाते. परस्पर संवाद अधिक सोयीस्कर केला जातो.
Online as well as Offline batches are available, allowing students from various parts of Maharashtra to easily prepare for MPSC. Special guidance for doubt resolution is available with bilingual teaching. In online sessions, questions and doubts are resolved interactively, making communication more convenient.
प्रत्यक्ष वर्गात शिक्षण. वैयक्तिक संवाद, गटचर्चा आणि शंका निरसनासाठी विशेष सुविधा.
In-person classroom learning with individual interaction, group discussions, and doubt resolution.
दूरस्थ शिक्षणाची सोय. प्रश्नोत्तर सत्र, डिजिटल नोटस आणि लवचिक वेळापत्रक.
Remote learning facility with Q&A sessions, digital notes, and flexible scheduling.
टेस्ट सिरीज व उत्तरलेखन सराव Test Series & Answer Writing Practice
सध्याच्या वर्णनात्मक (मुख्य) MPSC परीक्षा पद्धतींमुळे लेखन सराव अत्यंत महत्वाचा आहे. चाणक्य मंडल परिवारमध्ये ठराविक कालावधीमध्ये होणाऱ्या Test Series वर विशेष लक्ष दिले जाते. पूर्व आणि मुख्य परिक्षा यांच्या स्वतंत्र Test Series परीक्षेच्या अगोदर आयोगाच्या धर्तीवर आणि त्यासारख्याच वातावरणात पार पाडल्या जातात.
Due to the descriptive (Main) MPSC exam pattern, writing practice is extremely important. Chanakya Mandal Parivar gives special attention to test series conducted within a fixed timeframe. Separate Test Series for Preliminary and Main examinations are conducted before the exam following the Commission's pattern in a similar examination environment.
वेळेचे नियोजन करून उत्तरांची अचूकता वाढवण्यासाठी Test Series अत्यंत महत्त्वाची असते. योग्य सरावाशिवाय परीक्षेत यश मिळवणे कठीण आहे.
Test Series is extremely important for time management and improving answer accuracy. Achieving success in the exam without proper practice is difficult.
चालू घडामोडी (Current Affairs) Current Affairs Preparation
पूर्व आणि मुख्य, दोन्ही टप्प्यांवर चालू घडामोडीची अत्यंत महत्वाची भूमिका आहे. पूर्व परीक्षेमध्ये जवळपास 30 गुणांसाठी तर मुख्य परीक्षेमध्ये सामान्य अध्ययनाच्या प्रत्येक घटकात चालू घडामोडीच्या अनुषंगाने प्रश्न विचारले जातात. चालू घडामोडी आणि त्यावर आधारित अपेक्षित प्रश्नांचा सराव चाणक्य मंडल परिवारमध्ये घेतला जातो. शिवाय त्याच्या नोट्स सुद्धा विद्यार्थ्यांना दिल्या जातात.
Current Affairs plays a very important role in both Preliminary and Main stages. In the Preliminary exam, approximately 30 marks are allocated to current affairs, while in the Main exam, questions are asked in every component of General Studies pertaining to current affairs. Practice of current affairs and expected questions based on them is conducted at Chanakya Mandal Parivar, and comprehensive notes are provided to students.
तयारीची सुरुवात कशी करावी? How to Start Preparation
पहिली पायरी: सुरुवातीला अभ्यासक्रम नीट समजून घ्यावा. त्या त्या विषयाची पायाभूत पुस्तके/साहित्याने सुरुवात करावी (जसे- महाराष्ट्र स्टेट बोर्डची पुस्तके: इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र आणि समाजशास्त्र).
First Step: Understand the syllabus thoroughly. Begin with the basic books/material of each subject (e.g., Maharashtra State Board books for History, Geography, Political Science, Economics, and Sociology).
दुसरी पायरी: त्या त्या विषयाच्या संदर्भ साहित्याचा अभ्यास करावा आणि नियमित सराव चाचण्यांद्वारे प्रगतीचे मूल्यमापन करावे.
Second Step: Study the reference material of each subject and evaluate progress through regular practice tests.
सामान्य माहिती General Information
तुमची MPSC यात्रा आजच सुरू करा Start Your MPSC Journey Today
चाणक्य मंडल परिवारासोबत यशस्वी अधिकारी बनण्याचे तुमचे स्वप्न साकार करा. आमच्या बॅचेस बद्दल अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा. Achieve your dream of becoming a successful officer with Chanakya Mandal Parivar. Contact us today for more information about our batches.
© चाणक्य मंडल परिवार© Chanakya Mandal Parivar
कोर्स सुरुCourse Start
| स्थळ / कार्यक्रमLocation / Event | तारीखDate |
|---|---|
| सदाशिव पेठ (पुणे)Sadashiv Peth (Pune) | 1 Aug 2026 |
| वारजे (पुणे)Warje (Pune) | 1 Aug 2026 |
| सायन (मुंबई)Sion (Mumbai) | 24 July 2026 |
| छत्रपती संभाजीनगरChhatrapati Sambhajinagar | 29 June 2026 |
