शपथविधी देखणा, खरी आव्हानं आता सुरू… ( जानेवारी 2025 )

विधानसभा निवडणूक निकालांनंतर दोन आठवड्यांनी महाराष्ट्रातील नव्या सरकारचा शपथविधी अखेर पार पडला. शपथविधीचा सोहळा देखणा होता. त्याचं व्यवस्थापन खूपच बारकाव्यानं करण्यात आलं आणि अत्यंत नीटस होतं. घटनात्मक द़ृष्ट्या प्रत्यक्ष शपथविधी  असतो त्या निकषांनुरुप अत्यंत सुटसुटीत स्वरुपात हा कार्यक्रम पार पडला. पण त्याच्याआधी सुमारे दीड तास एक अतिशय प्रतिभाशाली सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. तेसुद्धा महाराष्ट्राचं […]

महाराष्ट्राचा कौल: भारतासाठी ( डिसेंबर 2024 )

शनिवार, २३ नोव्हेंबरची माध्यान्ह उलटून चालली आहे. संपूर्ण देशाचं आणि काही प्रमाणात जगाचं लक्ष असलेल्या महाराष्ट्र विधानसभेचे निकाल बाहेर येत आहेत. संध्याकाळपर्यंत विविध आकडे वरखाली होत राहतील. तरीही, महाराष्ट्राच्या मतदारांनी महायुतीला निर्विवाद कौल दिला आहे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. माझ्या मते, हा भारताच्या राष्ट्रवादी विचाराच्या मतदारांचा फार मोठा विजय आहे. प्रथमतः हा लोकशाहीचा विजय […]

शुभ दीपावली………पण धोकादायक वळणावर… ( नोव्हेंबर 2024 )

सर्वांना ही दीपावली, येणारं नवीन वर्ष आणि सर्व आयुष्यात, सुख, समाधान, यश, आनंद लाभो, या शुभेच्छा! – अशी माझी ‘शुभ दीपावली’ची शुभेच्छा! या शुभेच्छा व्यक्त करतानाची माझी भावना आहे, की एका अत्यंत धोकादायक कालखंडातली ही दीपावली आहे. एका अत्यंत धोकादायक कालखंडाच्या सावलीत ‘शुभ दीपावली’ या शुभेच्छा, ही प्रार्थना मी व्यक्त करतो आहे. आपल्या भारतीय संकल्पनांमध्ये […]

विकसित भारतासाठी विकसित महाराष्ट्र (ऑक्टोबर 2024)

लवकरच महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. त्यामुळे अर्थातच लोकशाहीच्या स्वभावाला अनुसरून सर्व विषयांमध्ये फक्त राजकारण एके राजकारण येतं आहे. काही प्रमाणात ते साहजिक आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. मात्र अशावेळी महाराष्ट्राकडं पाहताना, खरोखर अंत:करण पिळवटून टाकणारा प्रश्न मनाला पडतो – या महाराष्ट्राला झालंय तरी काय? …महाराष्ट्राला झालंय तरी काय! महाराष्ट्राचं भारतातलं स्थान […]

बांगलादेश : भारत आणि जगासाठी धोक्याचा इशारा ( सेप्टेंबर 2024)

दिवसभराचे तास संपवून घरी येत असताना बातम्या तपासत होतो. तेव्हा सगळ्यात मोठी, गंभीर, धक्कादायक आणि महत्त्वाचं म्हणजे धोकादायक बातमी डोळ्यापुढं आली. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना वाजेद बांगलादेशमधून निसटल्या. हेलिकॉप्टरमध्ये बसून भारतात आल्या. गाझियाबादमधल्या ‘हिंदॉन’ नावाच्या तळावर त्या उतरल्या. सत्ता ताब्यात घेतल्याचं बांगलादेशच्या सैन्यानं जाहीर केलं. परिस्थिती आता सुरळीत असून नागरिकांनी लष्करावर विश्वास ठेवावा असं आवाहन […]

नोकरी नाही, लोकसेवा (ऑगस्ट 2024)

नोकरी नाही, लोकसेवा रणरणत्या उन्हाळ्यात कोरडंठक्क पडलेलं रान असतं. एका ठिणगीचा अवकाश, की ते सारं रान पेटून उठतं. असं काहीसं पूजा खेडकर प्रकरणाबाबत होत आहे… पूजा खेडकर २०२३ च्या तुकडीची, महाराष्ट्र केडरची आयएएस अधिकारी. पहिली दोन वर्षं आयएएस अधिकार्‍याच्या प्रशिक्षणाचा कालावधी असतो. त्यापैकी दोन भागांत वाटलेलं साधारण १२ महिन्यांचं प्रशिक्षण मसुरीच्या लाल बहाद्दूर शास्त्री नॅशनल […]

अंतहीन पतनाचा पाठपुरावा (जुलै 2024)

सर्व वयाच्या सर्व मित्र-मैत्रिणींनो, नमस्ते! नेहमीसाठीच, शाश्वतदेखील. सर्वांना सर्वकाळ सर्व शुभेच्छादेखील शाश्वत आहेत. तुमचा-माझा आजचा संवाद नेहमीपेक्षा वेगळ्या प्रकारचा आहे. काही दिवसांपूर्वी पुण्याच्या कल्याणीनगर परिसरात मध्यरात्रीनंतर अठरा वर्षांपेक्षा कमी वयाचा मुलगा दारूच्या गुत्त्यावर (ज्याला ‘पब’ हा स्टायलिश शब्द आहे!) दारू प्यायला. त्या ‘पब’नं दारू देताना त्याला कायद्यानुसार त्याचं वय विचारलं नाही. ‘पब’ला धंदा हवाय. त्या […]

अभ्यासाला लागा! (जून 2024)

राज्य लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा मुख्य परीक्षेत वर्णनात्मक पॅटर्न २०२५ पासूनच लागू केला जाईल अशी माहिती आयोगाने दिली आहे. काही विद्यार्थ्यांनी आयोगाकडं माहितीच्या अधिकाराअंतर्गत याविषयी विचारणा केली होती. एमपीएससीच्या या उत्तरामुळं समाजमाध्यमांत असलेल्या परीक्षा पॅटर्नसंबंधित संभ्रमाला पूर्णविराम मिळाला. २४ जून २०२२ रोजी राज्य लोकसेवा आयोगानं सर्वप्रथम हा ऐतिहासिक निर्णय जाहीर केला. हा निर्णय जाहीर करण्यापूर्वी तीन सदस्यांची समिती नियुक्त […]

आकांक्षांचीपरीक्षा (मे 2024)

प्रशासनाचा उल्लेख नेहमी ‘पोलादी चौकट’(स्टीलफ्रेम) असा होतो. ही वस्तुस्थिती आहे की आधुनिक काळातली भारतीय प्रशासनाची ही ‘पोलादी चौकट’ मुख्यतः आणि मुळात ब्रिटिश राज्यकाळात तयार झाली. त्यावेळी या ‘पोलादी चौकटी’चा मुख्य उद्देश नियंत्रणात्मक (रेग्युलेटरी) होता. देशावर ब्रिटिशांचं राज्य कायम करणं आणि ब्रिटनच्या भल्यासाठी भारताचं शोषण करणं हे त्या ‘पोलादी चौकटी’चे मुख्य हेतू होते. परंतु, भारताला स्वातंत्र्य […]

नागरिकत्व सुधारणा कायदा : गरज, विरोध आणि वास्तव (एप्रिल 2024)

अठराव्या लोकसभेसाठीच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा होण्यास काही तास उरलेले असताना केंद्र सरकारने नागरिकत्व सुधारणा कायदा अर्थात सीएए संदर्भातील अधिसूचना काढली आहे. ९ आणि ११ डिसेंबर २०१९ रोजी हे नागरिकत्व सुधारणा विधेयक राज्यसभा आणि लोकसभेमध्ये मांडले गेले आणि मंजूरही झाले होते. २०१४ च्या लोकसभा निवडणुकातील भाजपच्या मूळच्या जाहीरनाम्यामध्ये हा मुद्दा समाविष्ट होता. लोकशाही संकेतांनुसार याचा अर्थ […]

अर्थसंकल्प आणि अर्थव्यवस्था (मार्च 2024)

Economics is to social sciences, what Mathematics is to sciences असं मला नेहमी वाटतं. याला वाक्याला दोन अर्थ आहेत. गणित हे इतर सर्व विज्ञानशाखांचं मूळ आहे. म्हणून जितकं चांगलं तुम्हाला गणित कळतं, तितक्या प्रमाणात फिजिक्स, केमिस्ट्री किंवा बायोलॉजीदेखील कळतं. गणिताप्रमाणे अर्थशास्त्र हे इतर समाजशास्त्रांचं मूळ आहे. अर्थशास्त्र जर चांगलं कळत असेल तर इतिहास, राज्यशास्त्र आणि […]

राम जन्मभूमी प्राण प्रतिष्ठा (फेब्रुवरी 2024)

राम! राम!! सर्व वयाच्या सर्व मित्र-मैत्रिणींनो – राम! राम!! मला ओळखणारे तुम्ही सगळे क्षणभर विचारात पडले असाल; असे विचारात पडे-पडेपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल, की एरव्ही माझ्या बोलण्याची सुरुवात – सर्वांना सर्वकाळ सर्व शुभेच्छा! पासून होते. पण आजची सुरुवात ‘राम राम’नं होते आहे. सर्वत्र ‘राम’संपूर्ण भारतभर, सर्व भाषांमध्ये, हजारो वर्षांपासून दोन भारतीय सहज एकमेकांना भेटले […]

‘सर्वोच्च’ निकालाचा बोध (जानेवारी 2024)

११ डिसेंबर २०२३…. या दिवसाचीही भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद होईल. या दिवशी भारताच्या सर्वोच्च न्यायालयानं जम्मू-काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे आणि जम्मू-काश्मीर भारताशी एकरूप आहे, या मुद्द्यावर ‘संविधानिक (कॉन्स्टिट्यूशनल)’ मान्यतेची मोहोर उमटवली. ऑगस्ट २०१९ चा क्रांतिकारक निर्णय केंद्र सरकारनं लोकसभा आणि राज्यसभेत ५ ऑगस्ट २०१९ ला कलम ३७० मध्ये काही बदल केले होते. ते बदल […]

आत्म विनाशाच्या वाटेवर…(डिसेंबर 2023)

एखाद्या संपूर्ण समाजव्यवस्थेलाच, चुकीच्या मुद्द्याच्या आधारे, चुकीच्या मार्गावर नेता येतं का आणि अशी एखादी संपूर्ण समाजव्यवस्थाच चुकीच्या मार्गावर निघाली, तर त्याचे काय परिणाम होतात, हे सर्व समजून घ्यायचं असेल तर सध्याचं, अत्यंत दुःखद उदाहरण म्हणजे पंजाबमधली खालिस्तान चळवळ. नुसते ‘पंजाब’ हे शब्द ऐकू आले तरी, खरं म्हणजे, डोळ्यापुढं उभा राहतो हिरवागार प्रदेश. अत्यंत कष्टाळू शेतकरी […]

समान नागरी कायदा (नोव्हेंबर 2023)

स्वातंत्र्याच्या शंभरीकडं वाटचाल करत असताना भारत देशासमोर अनेक गंभीर मुद्दे उभे आहेत. संपूर्ण देशासाठी समान नागरी कायदा लागू करणं हा त्यातलाच एक महत्त्वाचा मुद्दा. या विषयाच्या मुळाशी जात त्याची सखोल आणि अभ्यासपूर्ण माहिती या दीर्घ लेखात मांडली आहे. दीपावलीनिमित्त ‘चाणक्य मंडल परिवार’च्या सर्व विद्यार्थ्यांना, वाचकांना ही शब्दरूपी भेट! गंमत म्हणून, कधी कुणी मला विचारलं, किंवा […]

जागतिक कारस्थानाचे धागेदोरे (ऑक्टोबर 2023)

भारत-कॅनडा संबंधात ताणतणाव भारताची चांद्रयान मोहीम संपूर्णतः यशस्वी झाली. त्यानंतर जी२० परिषदेचं यशस्वी समापन झालं. रशिया-युक्रेन युद्धसहित एकूणच जागतिक परिस्थिती, जगाच्या मुख्य शक्तींमध्ये असलेले मतभेद (उदा. अमेरिका आणि चीन इ.) लक्षात घेता जी२० परिषदेच्या यशासमोर अनेक प्रश्नचिन्हं होती. परिषदेच्या शेवटी सर्वानुमते घोषणापत्र जाहीर होईल का, यावरदेखील प्रश्नचिन्ह होतं. मात्र या सर्व अवघड राजनैतिक आव्हानांना सामोरं […]

समान नागरी कायदा (सप्टेंबर 2023)

समान नागरी कायदा देशात समान नागरी कायद्याची पुन्हा एकदा, नव्यानं चर्चा होताना दिसते आहे. शाहबानो खटल्यात सर्वोच्च न्यायालयानं निकाल दिला. वयाच्या सत्तरीत असलेल्या शहाबानो यांना तो अनुकूल होता. हा निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाचं खंडपीठ म्हटलं होतं, की आता सरकारनं समान नागरी कायद्याच्या दिशेनं पावलं टाकायला हवीत. त्यानुसार, खरं म्हणजे, तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी त्या […]

चांद्रयान ३ (ऑगस्ट 2023)

नमस्ते! आणि अर्थातच, नेहमीप्रमाणे, कायमसाठी, सर्वांना सर्वकाळ सर्व शुभेच्छा! खूप आधीपासून मी माझ्या डायरीत एका भेटीच्या वेळेची काळजीपूर्वक नोंद करून ठेवली होती. शुक्रवार, १४ जुलै, दुपारी दोन वाजून ३५ मिनिटं. ती ठरलेली अपॉइंटमेंट होती – टीव्हीसमोर बसणं. कारण चांद्रयान ३ चं प्रक्षेपण त्यावेळी ठरलं होतं. ते प्रक्षेपण डोळे भरून पाहणं ही माझी ठरलेली अपॉइंटमेंट! ‘चांद्रयान […]

११ जून : एकेक दिवस असा की (जुलै 2023)

नमस्ते! …आणि अर्थातच, जे तुम्हा सर्वांना माहीतच आहे, ज्यावर तुमचा विश्वास आहे, ते म्हणजे – सर्वांना सर्वकाळ सर्व शुभेच्छा! जगताना एक दिवस असा येतो, की त्या दिवसाच्या आवृत्तीत जीवन नावाच्या ब्रम्हांडाचं दर्शन घडून जातं. जीवन जगण्यातली सुखं आणि दुःखं, यशापयश, आशा-निराशा, चढउतार या सर्व द्वंद्वाचं दर्शन एका दिवसात घडून जातं. तरीही त्या द्वंद्वाचा सामना करताना […]

‘द केरला स्टोरी’ (जून 2023)

मी केरला स्टोरी पाहिला. मी ‘केरला स्टोरी’ पाहिली. गेल्या अनेक वर्षांपासून अस्वस्थ, दुःखी आणि संतप्त अंत:करणानं मी ‘केरला स्टोरी’ पाहत आहे. समाजमाध्यमांत या चित्रपटाचा जेव्हा ट्रेलर आला, तेव्हाच वाटलं होतं की आपल्याकडून हा चित्रपट बघवलादेखील जाणार नाही. पडद्यावर मांडल्या जाणाऱ्या वास्तवाचा आपल्याला त्रास होणार आहे. पाश्चात्त्य सांस्कृतिक परंपरेत एलियट आणि ओडिसी ही दोन महाकाव्यं आहेत. […]