Pune, Mumbai, Sambhajinagar

office@chanakyamandal.org

08069015452

MPSC Comprehensive Course

MPSC म्हणजे काय? व ती कोणकोणत्या परीक्षा घेते ?

MPSC म्हणजे MAHARASHTRA PUBLIC SERVICE COMMISSION म्हणजेच राज्य लोकसेवा आयोग. ही एक घटनात्मक संस्था असून भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३१५ अन्वये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीतल्या वेगवेगळ्या सेवांसाठी आणि पदांसाठी स्पर्धा परीक्षा घेऊन उमेदवारांची निवड करण्याचं काम ही संस्था करते. MPSC मार्फत राज्य शासनाच्या वेगवेगळ्या विभागामध्ये वेगवेगळ्या पदांसाठी स्पर्धापरीक्षा घेऊन उमेदवारांची निवड केली जाते.

(वर्ष २०२३ पासून आयोग खालील प्रमाणे दोन संयुक्त पूर्व परीक्षा घेणार आहे १.महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट ‘अ’ आणि गट ‘ब’ संयुक्त पूर्व परीक्षा २.महाराष्ट्र अराजपत्रित गट ‘ब’ आणि गट ‘क’ सेवा संयुक्त पूर्व परीक्षा.)

राज्यसेवा परीक्षेतून कुठली पदे भरली जातात ?
क्र. महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षा २०२३ द्वारे पुढील सेवांसाठी एकच पूर्व परीक्षा होईल महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ द्वारे पुढील पदांसाठी एकच पूर्व परीक्षा होईल
राज्य सेवा (३३ संवर्ग) सहायक कक्ष अधिकारी
यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा राज्य कर निरीक्षक
विद्युत अभियांत्रिकी सेवा पोलीस उपनिरीक्षक
स्थापत्य अभियांत्रिकी सेवा दुय्यम निबंधक, श्रेणी-२/मुद्रांक निरीक्षक
विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा कर सहायक
कृषि सेवा दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क
सहायक नियंत्रक वैधमापनशास्त्र उद्योग निरीक्षक
अन्न व औषध प्रशासकीय सेवा लिपिक-टंकलेखक
वनसेवा तांत्रिक सहायक, विमा संचालनालय
१० सहायक मोटार वाहन निरीक्षक
राज्यसेवा परीक्षेचे टप्पे आणि स्वरूप कसे असते?
 • पहिला टप्पा: पूर्व परीक्षा (४०० गुण)
 • दुसरा टप्पा: मुख्य परीक्षा (१७५० गुण)
 • तिसरा टप्पा: मुलाखत (२७५ गुण)

पूर्व परीक्षा स्वरूप:

पेपरप्रश्नसंख्यागुणवेळमाध्यमपेपरचे स्वरूपस्तर
पेपर १ (Compulsory, GS)१००२००२ तासमराठी आणि इंग्रजीबहुपर्यायी (MCQ)पदवी
पेपर २ (Compulsory, CSAT)८०२००२ तासमराठी आणि इंग्रजीबहुपर्यायी (MCQ)पदवी

नोट:

 1. उमेदवारांनी दोनही पेपर देणे बंधनकारक आहे.
 2. दोनही पेपर मध्ये नकारात्मक गुण पद्धती असेल. प्रत्येक चार चुकीच्या प्रश्नांमागे एका प्रश्नाचे गुण वजा केले जातील. (१/४ नकारात्मक गुण पद्धती)

मुख्य परीक्षा स्वरूप:

२०२५ पासून राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक (Descriptive) स्वरूपाची होणार आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षेची नवीन परीक्षा योजना पुढीलप्रमाणे असणार आहे.

क्र.पेपरचे नावगुण
भाषा पेपर १ – मराठी३०० गुण (२५% गुणांसह अर्हताकारी)
भाषा पेपर २ – इंग्रजी३०० गुण (२५% गुणांसह अर्हताकारी)
निबंध (मराठी किंवा इंग्रजी माध्यम)२५० गुण
सामान्य अध्ययन १२५० गुण
सामान्य अध्ययन २२५० गुण
सामान्य अध्ययन ३२५० गुण
सामान्य अध्ययन ४२५० गुण
वैकल्पिक विषय पेपर क्रमांक १२५० गुण
वैकल्पिक विषय पेपर क्रमांक २२५० गुण
 मुख्य परीक्षा एकूण गुण१७५० गुण
१०मुलाखत२७५ गुण
 Final Marks२०२५ गुण

वैकल्पिक विषय:

वैकल्पिक विषयाकरीत खालील विषयामधून एका विषयाची निवड करणे आवश्यक आहे-  

 • Agriculture (कृषी)
 • Chemistry (रसायनशास्त्र)
 • Electrical Engineering (विद्युत अभियांत्रिकी)
 • Law (विधी)
 • Philosophy (तत्वज्ञान)
 • Animal Husbandry and Veterinary Science (पशुसंवर्धन व पशुवैद्यकीय विज्ञान)
 • Civil Engineering (स्थापत्य अभियांत्रिकी)
 • Geography (भूगोल)
 • Management (व्यवस्थापन)
 • Physics (भौतिकशास्त्र)
 • Public Administration (लोकप्रशासन)
 • Zoology (प्राणीशास्त्र)
 • Mathematics (गणित)
 • Marathi Literature (मराठी वाडःमय)
 • Anthropology (मानववंशशास्त्र)
 • Commerce and Accountancy (वाणिज्य व लेखा)
 • Geology (भूविज्ञान)
 • Mechanical Engineering (यांत्रिकी अभियांत्रिकी)
 • Political Science and International Relations (राज्यशास्त्र व आंतरराष्ट्रीय संबंध)
 • Sociology (समाजशास्त्र)
 • Botany (वनस्पतीशास्त्र)
 • Economics (अर्थशास्त्र)
 • History (इतिहास)
 • Medical Science (वैद्यकीय विज्ञान)
 • Psychology (मानसशास्त्र)
 • Statistics (सांख्यिकीशास्त्र)

चाणक्य मंडल परिवार मध्ये पुढील ५ वैकल्पिक विषयांचे मार्गदर्शन केले जाते:

 1. Anthropology (मानववंशशास्त्र)
 2. History (इतिहास)
 3. Sociology (समाजशास्त्र)
 4. Geography (भूगोल)
 5. Political Science and International Relations (राज्यशास्त्र व आंतरराष्ट्रीय संबंध)

टीप: जर एखाद्या विद्यार्थ्याने वरील ५ विषय वगळता इतर विषय वैकल्पिक विषय म्हणून निवडला असेल, तर त्याने आमच्याशी संपर्क करावा. 

राज्यसेवा अभ्यासक्रम

राज्यसेवा पूर्वपरीक्षा अभ्यासक्रम

Paper I (200 marks)

 • राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या चालू घडामोडी.
 • भारताचा इतिहास व भारतीय राष्ट्रीय चळवळ, महाराष्ट्राच्या भारांशासह.
 • महाराष्ट्र, भारत व जगाचा भूगोल- महाराष्ट्राचा, भारताचा व जगाचा प्राकृतिक, सामाजिक, आर्थिक भूगोल.
 • भारत आणि महाराष्ट्र राज्यशास्त्र व प्रशासन संविधान, राजकीय प्रणाली, पंचायती राज, नगर प्रशासन, सार्बजनिक धोरण, हक्क विषयक प्रश्न इत्यादी.
 • आर्थिक व सामाजिक विकास शाश्वत विकास, दारिद्रय, समावेशन, लोकशाही, सामाजिक क्षेत्रातील उपक्रम इत्यादी.
 • पर्यावरण पारिस्थितीकी, जैव विविधता आणि हवामान बदल यांवरील सर्वसाधारण प्रश्न- याला विषय विशेषज्ञांची गरज नाही.
 •  सामान्य विज्ञान

Paper II (200 marks)

 • आकलन.
 • संवाद कौशल्यांसह आंतर व्यक्तिगत कौशल्य,
 • तर्कशुद्ध तर्क आणि विश्लेषणात्मक क्षमता
 • निर्णय क्षमता आणि समस्या निराकरण,
 • सर्वसाधारण मानसिक क्षमता
 •  मूळ संख्याता (अंक आणि त्यांचे संबंध, परिमानाचा क्रम इत्यादी) (इयत्ता दहावी स्तरावरील), Data Interpretation (तक्ता, आलेख, कोष्टक, विदा पर्याप्तता इत्यादी इयत्ता दहावी स्तरावरील)
 • मराठी आणि इंग्रजी भाषा आकलन कौशल्य (इयत्ता दहावी/बारावी स्तरावरील)

राज्यसेवा मुख्य परीक्षा अभ्यासक्रम

सामान्य अध्ययन :- १
(२५० गुण)

भारतीय वारसा आणि संस्कृती, इतिहास आणि जागतिक भूगोल महाराष्ट्राच्या काही भारांशासह 

 • भारतीय संस्कृतीमध्ये प्राचीन ते आधुनिक काळापर्यंत अगलेली कलेची रूपे, साहित्य व स्थापत्य कला यांच्या ठळक पैलूंचा समावेश केला राहील
 • महाराष्ट्रातील संत चळवळीच्या विशेष संदर्भात भक्ती चळवळ आणि त्याचे तत्त्वज्ञान. 
 • आधुनिक भारताच्या इतिहासातील अठराव्या शतकाच्या मध्यापासून आजपर्यंतच्या महत्वपूर्ण घटना, महत्वपूर्ण व्यक्ती आणि समस्या.
 • स्वातंत्र्यलढा स्वातंत्र्य लढ्यातील विविध टप्पे आणि देशाच्या निरनिराळ्या भागांमधील  स्वातंत्र्य लढ्‌यातील योगदान देणारे महत्त्वाचे व्यक्ती व त्यांचे स्वातंत्र्य लढ्यात योगदान
 • जगाच्या इतिहासामध्ये १८ व्या शतकापासून औद्योगिक क्रांती, जागतिक युद्धे देशांच्या भूसीमांची पुनर्रचना, वसाहतवाद, निर्वसाहतवाद, राजकीय तत्वज्ञान जसे की साम्यवाद, भांडवलशाही, समाजवाद इत्यादी. त्यांची रूपे व समाजावरील त्यांचा प्रभाव यांचा समावेश राहील.
 • स्वातंत्र्योत्तर एकत्रीकरण आणि देशांतर्गत पुनर्रचना. 
 • भारतीय समाजाची ठळक वैशिष्टे आणि भारताची विविधता
 • महिला व महिला संघटनांची भूमिका, लोकसंख्या आणि त्या संबंधित मुद्दे, दारिद्रय व विकासात्मक प्रश्न, नागरीकरण यांचेशी निगडीत समस्या व त्यावरील उपाययोजना. 
 • जागतिकीकरणाचे भारतीय समाजावरील परिणाम सामाजिक सबलीकरण, जातीयवाद, प्रांतवाद आणि धर्मनिरपेक्षता.
 • जगाचा प्राकृतिक भूगोल व त्याबी ठळक वैशिष्टे
 • जागतिक प्रमुख नैसर्गिक साधनसंपत्तीचे वितरण (दक्षिण आशिया व भारतीय उपखंड यांसह)
 • जगातील विविध भागातील प्राथमिक, द्वितीय व तृतीय औद्योगिक सेवांच्या स्थानाला जबाबदार असणारे घटक (भारतासह).
 • भूकंप, त्सुनामी, ज्वालामुखी हालचाली चक्रिय वादळ इत्यादी अशा महत्त्वाच्या भूप्प्राकृतिक घटना, भौगोलिक वैशिष्टे आणि त्यांचे स्थान, महत्वाची भौगोलिक वैशिष्टे (जलाशये आणि हिमनग यांसह) तसेच वनस्पती आणि प्राणी यांच्यातील बदल व अशा बदलांचा परिणाम. 

सामान्य अध्ययन :- २

(२५० गुण)

प्रशासन, संविधान, राज्यशास्त्र, सामाजिक न्याय व आंतरराष्ट्रीय संबंध महाराष्ट्राच्या काही भारांशासह

 • भारतीय संविधान – ऐतिहासिक पार्श्वभूमी, उत्क्रांती, वैशिष्टे, सुधारणा, महत्वपूर्ण तरतुदी आणि मूलभूत संरचना.
 • संघ व राज्ये यांबी कार्य व जबाबदाऱ्या संघराज्य रचनेशी संबंधित प्रश्न व आव्हाने, स्थानिक पातळीवर अधिकार आणि वित्त व्यवस्था यांचे प्रदान आणि त्यातील आव्हाने
 • विविध अंगामधील अधिकारांची विभागणी, वाद निवारण यंत्रणा व संस्था
 • भारतीय सांविधानिक योजनेची इतर देशांशी तुलना.
 • संसद व राज्य विधानमंडळे संरचना, कार्यप्रणाली, कामकाज चालविणे, अधिकार व विशेषाधिकार आणि यांपासून उद्भवणारे प्रश्न.
 • कार्यपालिका, न्यायपालिका यांची रचना, संघटन आणि कार्य सरकारची मंत्रालये व विभाग, दबाव गट आणि औपचारिक / अनौपचारिक संघ आणि त्यांची राज्य व्यवस्थेमधील भूमिका.
 • स्थानिक स्वराज्य संस्था
 • लोकप्रतिनिधित्व अधिनियमाची ठळक वैशिष्टे
 • विविध सांविधानिक पदांच्या नियुक्त्‌या, विविध सांविधानिक मंडळाचे अधिकार कार्य व जबाबदाऱ्या
 • वैधानिक, नियामक व विविध अर्धन्यायिक मंडळे
 • विविध क्षेत्रांमधील विकासासाठी सरकारी धोरणे व घटक यांचे संकल्पन व अंमलबजावणी करताना उद्भवणाऱ्या समस्या.
 • विकास प्रक्रिया व विकास उद्योग अशासकीय संघटना स्वयंसहायता गट, विविध गट व संघ, देणगीदार, धर्मादाय संस्था, संस्थात्मक व इतर हित संबंधित व्यक्ती यांच्या भूमिका
 • समाजातील दुबळ्या घटकांसाठी केंद्राच्या व राज्याच्या कल्याणकारी योजना आणि या योजनांची कामगिरी, यंत्रणा, कायदे, या दुबळ्या घटकांच्या संरक्षणासाठी व लाभासाठी गठीत केलेल्या संस्था व मंडळे.
 • आरोग्य, शिक्षण, मानव संसाधन यासारख्या सामाजिक क्षेत्र / संवाशी निगडीत घटकांच्या विकास व व्यवस्थापन संबंधातले प्रश्र. 
 • दारिद्रय व उपासमार यांच्याशी संबंधित प्रश्न.
 • प्रशासन, पारदर्शकता व उत्तरदायित्व, ई-प्रशासनः उपयोजने, प्रतिमाने, यश, मर्यादा, व क्षमता यांबाबतचे महत्त्वाचे पैलूः नागरिकांची सनद, पारदर्शकता व उत्तरदायित्व आणि संस्थात्मक व इतर उपाययोजना.
 • नागरी सेवांची लोकशाही मधील भूमिका.
 • भारत आणि शेजारील राष्ट्रयांचे संबंध
 • द्विपक्षीय, प्रादेशिक व जागतिक गट आणि भारताचा समावेश असणारे आणि / किंवा भारताच्या हितसंबंधाला बाधा पोहोचवणारे करारनामे
 • विकसित व विकसनशील देशांच्या धोरणांचा व राजकारणाचा भारताच्या हितसंबंधांवर आणि भारतीय भांडवलदारांवर होणारा परिणाम

सामान्य अध्ययन :- ३

(२५० गुण)

तंत्रज्ञान, आर्थिक विकास, जैवविविधता, पर्यावरण, सुरक्षा व आपत्ती व्यवस्थापन महाराष्ट्राच्या काही भारांशासह

 • भारतीय अर्थव्यवस्था आणि नियोजनशी संबंधीत मुद्ये, साधनसंपतीचे एकत्रीकरण, वाढ, विकारा व रोजगार
 • सर्वसमावेशक बाढ व त्यातून उद्भवणाऱ्या समस्या
 • सरकारी अर्थसंकल्प.
 • देशाच्या विविध भागातील मुख्य पिके व पीक पद्धती, विविध प्रकारचे सिंचन व सिंचन पद्धती, साठयण, शेती उत्पादनांची वाहतूक व विपणन, मर्यादा व संबंधित अडचणी, शेतकऱ्यांच्या सहाय्यासाठी ई-तंत्रज्ञान. 
 • प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष शेती अनुदान आणि किमान आधारभूत किमतीशी संबंधित मुद्ये, सार्वजनिक वितरण प्रणाली – उद्दिष्ट्ये, कार्यप्रणाली, मर्यादा, सुधारणा, शिलकी साठा व अन्नसुरक्षाची समस्या, तंत्रज्ञान मोहीम, पशुपालनाचे अर्थशास्त्र
 • भारतातील अन प्रक्रिया आणि संबंधित उद्योग-व्याती आणि महत्त्व, स्थान, प्रतिवाह व अनुबाह आवश्यकता, पुरवठा साखळी व्यवस्थापन
 • भारतातील जमीन सुधारणा
 •  अर्थव्यवस्थेवर उदारीकरणाचे परिणाम, औद्योगिक धोरणातील बदल आणि औद्योगिक विकासावर त्यांचे परिणाम, > पायाभूत सुविधाः ऊर्जा, बंदरे, रस्ते, विमानतळ, रेल्वे इत्यादी
 • गुंतवणूक प्रतिमाने.
 • विज्ञान व तंत्रज्ञान बडामोडी व त्यांचे उपयोजन आणि दैनंदिन जीवनातील परिणाम
 • विज्ञान व तंत्रज्ञानातील भारतीयांची कामगिरी, तंत्रज्ञानाचे स्वदेशीकरण आणि नवीन तंत्रज्ञान विकसित करणे.
 • माहिती तंत्रज्ञान, अवकाश, संगणक, रोबोटिक्स, सूक्ष्म तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान या क्षेत्रांमधील जागरूकता आणि बौद्धिक मालमत्ता हक्काशी संबंधित समस्या
 • संवर्धन, पर्यावरणीय प्रदूषण आणि अवनती, पर्यावरणीय आघात निर्धारण.
 • आपत्ती व आपत्ती व्यवस्थापन, आपत्ती जोखीम लवचिकपणा, लवचिक समाज.
 • विकास आणि उग्रवादाचा प्रसार यांच्यामधील दुवे. 
 • अंतर्गत सुरक्षेसाठी आव्हाने निर्माण करण्यात बाह्य राज्य व गैरराज्य घटकांची भूमिका.
 • संप्रेषण जाळ्यामार्फत अंतर्गत सुरक्षेसाठी आव्हाने, अंतर्गत सुरक्षा आव्हानांमध्ये प्रसार माध्यमे व सामाजिक नेटवर्किंग साईटस्ची भूमिका.
 • सायबर सुरक्षेच्या मूलभूत बाबी, आर्थिक गैरव्यवहार व त्यावरील प्रतिबंध
 • सुरक्षा आव्हाने आणि सीमाक्षेत्रातील त्यांचे व्यवस्थापन, दहशतवादाबरोबर संघटित गुन्हेगारीचा संबंध.
 • विविध सुरक्षा दले आणि अभिकरणे व त्यांचे जनादेश. 

सामान्य अध्ययन : ४

(२५० गुण)

नीतिशास्त्र, सचोटी आणि अभियोग्यता

वा अंतर्गत समाविष्ट असलेले प्रमुख विषय म्हणजे नीतिशास्त्र, सचोटी आणि योग्यता. या पेपरमध्ये उमेदवारांची सचोटी सार्वजनिक जीवनातील समंजसपणा आणि समाजाशी व्यवहार करताना त्याला सामोरे जाव्या लागणाऱ्या विविध समस्या आणि संघर्याबाबतच्या समस्या सोडविण्याच्या दृष्टिकोनाशी संबंधित समस्यांबाबत उमेदवारांची वृत्ती आणि दृष्टिगेन तपासण्यासाठीच्या प्रश्नांचा समावेश असेल, यावरील प्रश्रांमध्ये पैलू निश्चित करण्यासाठी घटना अभ्यास (केस स्टडी) याचा वापर केला जाईल.

पुढील स्यूल क्षेत्रांचा समावेश केला जाईल.

अभ्यासक्रम:

 • नीतिशास्त्र आणि मानवी परस्यराभिमुखता मानवतेच्या नीतिमतेचे सार, निर्धारक आणि परिणाम, नैतिकतेचे परिमाण, नीतिशास्त्र खाजगी आणि सार्वजनिक संबंधांमधील, मानवी मूल्ये, महान नेते, सुधारक व प्रशासक यांचे जीवन आणि शिकवण यांपासून धडे, मूल्ये रुजविण्यासाठी कुटुंब, समाज व शैक्षणिक संस्था यांच्या भूमिका.
 • अभिवृत्तीः घटक संरचना कार्य त्याचा प्रभाव आणि विचार व वर्तन यांच्याशी संबंध, नैतिक आणि राजकीय अभिवृत्ती, सामाजिक परिणाम व पाठपुरावा. 
 • नागरी सेवेसाठी अभियोग्यता आणि मूलभूत मूल्ये, सचोटी, निःपक्षपातीपणा आणि पक्षीय निरपेक्षता, बस्तुनिष्ठता, सार्वजनिक रोयेसाठी समर्पण, सहानुभूती, सहिष्णुता आणि दुर्बल घटकांप्रती सहानुभूती.
 • भावनिक बुध्दांक संकल्पना आणि त्याची उपयोगीता प्रशासन आणि कारभारामध्ये त्यांची उपयुक्तता आणि उपयोजन.
 • भारत आणि जगातील नैतिक विचारवंतांचे आणि तत्वाचे योगदान
 • लोक प्रशासनातील सार्वजनिक नागरी सेवा मूल्ये आणि नैतिकता स्थिती व समस्या, सरकारी व खाजगी संस्थांमधील नैतिक चिंता आणि कोंडी नैतिक मार्गदर्शनाचे स्त्रोत म्हणून कायदे नियम विनियम व सदसद विवेकबुद्धी,
 • उत्तरदायित्व आणि नैतिक शासन शासनामध्ये नैतिकता आणि नैतिक मूल्यांचे बळकटीकरण आंतरराष्ट्रीय संबंध आणि निधीकरणामधील नैतिक समस्या निगम प्रशासन.
 • प्रशासनातील सभ्यताः लोकसेवेधी संकल्पना प्रशासन व सभ्यता यांचा तत्वज्ञानात्मक आधार, माहितीची देवाण-घेवाण आणि सरकारमधील पारदर्शकता, माहितीचा अधिकार, नीतिसंहिता, आचारसंहिता, नागरिकांची सनद कार्यसंस्कृती, सेयाप्रदानाचा दर्जा, सार्वजनिक निधीचा विनियोग, भ्रष्टाचाराची आव्हाने
 • वरील समस्यांवरील घटना अभ्यास.
मॉड्यूल पॅटर्न

चाणक्य मंडल परिवार मध्ये सर्व विषय हे मॉड्यूल पॅटर्ननुसार शिकवले जातात.

काय आहे हा मॉड्यूल पॅटर्न..?

मॉड्यूल पॅटर्न म्हणजे सामान्य अध्ययनाचे उपविषय एका मागून एक घेतले जातात. एखादा विषय त्या विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत शिकवला जातो व त्यानंतर दुसरा विषय शिकवला जातो. या विशिष्ट उप विषयाच्या नोट्स देखील त्याच वेळेस दिल्या जातात आणि शिकवल्यानंतर सराव चाचणी देखील घेतली जाते. अशा प्रकारे हा पॅटर्न प्रत्येक उप विषय विद्यार्थ्यांना नीट समजला जाईल याची खात्री करून घेतो.

तुमच्या पदवीचे विषय वगळता इतर सर्व उपविषय तुमच्यासाठी अज्ञात आणि नवीन आहेत. जर तुम्ही हे विषय एकेक करून अविरतपणे शिकलात तरच तुम्ही त्यात प्रभुत्व मिळवू शकाल आणि त्यासाठी हा पॅटर्न अतिशय उपयुक्त ठरतो असा आमचा अनुभव आहे

परंतु, या पॅटर्नमध्ये हे उघड आणि अपरिहार्य आहे की अभ्यासक्रमाच्या शेवटी काही विषय शिकवावे लागतील. कधीकधी काही विद्यार्थ्यांना भीती वाटते की आपण अभ्यासक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात येत आहोत आणि एका विशिष्ट विषयासाठी एकही सत्र आयोजित केलेले नाही. पण यात घाबरण्यासारखे अजिबात काही नाही, कारण प्रत्येक विषय त्याच्या क्रमानुसार शिकवला जाणार आहे. याउलट जे विषय शेवटी शिकवले जातील ते परीक्षेच्या आधी शिकवले जातात आणि तुमच्या मनात ताजे राहतात. विद्यार्थ्यांनी त्यांचे स्वयं-अभ्यासाचे वेळापत्रक वर्गांसोबत जुळवून घेतल्यास त्यांना अधिक फायदा होतो असाही आमचा अनुभव आहे

Course Start:

Sadashiv Peth (Pune)

10 June2024

Sion (Mumbai)

14 June 2024

Warje (Pune)

10 June 2024

Chhatrapati Sambhajinagar

25 June 2024

Interested

अभ्यास महोत्सव

दरवर्षी चाणक्य मंडल परिवार UPSC आणि MPSC परीक्षांच्या तयारीसाठी निवासी अभ्यास शिबिरे आयोजित करते. अभ्यास महोत्सवाची वैशिष्टे
 • एकूण तीन दिवसांचा हा महोत्सव असेल.
 • सकाळी ७:३० ते रात्री ८ पर्यंत म्हणजे दिवसभर सत्र होतील.
 • चाणक्य मंडलचे फॅकल्टिज, प्रशासनातील अधिकारी ते प्रतिभावंत व्यक्तींची सत्र या काळात होत असतात. >> संपूर्ण ‘अभ्यास महोत्सवा’ मध्ये शिबिराच्या ठिकाणी सर्व सहभागींच्या भोजनाची व्यवस्था केली जाते.
 • काही सत्रे सर्व विद्यार्थ्यांसाठी एकत्रित केली जातात आणि ती प्रामुख्याने मराठीत घेतली जातात.
 • अभ्यास महोत्सवाचे महत्वः
  • सलग तीन दिवसांच्या या मॅरेथॉन अभ्यासामुळे विध्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासातील सातत्य आणि एकाग्रता वाढण्यासाठी मदत होते.
  • यासाठी वेगेळे शुल्क आकारले जात नाही. परंतु, अभ्यास महोत्सवाला उपस्थिती अनिवार्य असते.

MPSC Study Kit

चाणक्य मंडल परिवारच्या MPSC Comprehensive Course ला Admission घेतलेल्या विद्यार्थ्यांना चाणक्य मंडल तर्फे एक Study Kit दिला जातो. या मध्ये MPSC राज्यसेवा परीक्षेसाठी लागणारी काही महत्वाची पुस्तके आणि एक बॅग दिली जाते.

 • नवा विजयपथः लेखक-अविनाश धर्माधिकारी सर
 • ७५ सोनेरी पानेः लेखक-अविनाश धर्माधिकारी सर
 • भूगोल व पर्यावरणः लेखक – सवदी
 • Oxford Student Atlas
 • भारतीय राज्यघटना, राजकारण आणि कायदे : लेखक-अभिजित शिंदे सर
 • पंचायतराजः लेखक-मनोज राऊत (Dy. CEO)
 • आधुनिक भारताचा इतिहासः लेखक – डॉ. गाठाळ
 • Lucent’s General Knowledge

This will close in 20 seconds