Pune, Mumbai, Sambhajinagar

office@chanakyamandal.org

08069015452

bg_image

HR & HRD MCQ's

1 / 210

चुकीची जोडी ओळखा. योजना हेतू

2 / 210

ESI कायदा, 1948 चे राज्य विमा महामंडळ कोणत्या मंत्रालयांतर्गत येते?

3 / 210

‘उडान’ हा कार्यक्रम कोणत्या भागात राबविला जातो?

4 / 210

Moral हा शब्द कोणत्या भाषेतील शब्दावरून घेण्यात आला आहे?

5 / 210

Ethics हा शब्द कोणत्या भाषेतील शब्दावरून तयार झाला आहे?

6 / 210

राष्ट्रीय महिला सबलीकरण अभियान (2010) खालील नावाने ओळखले जाते -

7 / 210

कार्यालयात काम करणाऱ्या व प्रवास करणाऱ्या महिलांना स्तनपानाच्या सोयीसाठी महाराष्ट्र शासनाने कोणत्या कक्षाची स्थापना केली?

8 / 210

नोबेल पुरस्कार विजेते श्री. कैलाश सत्यार्थी यांच्या संघटनेचे नाव काय आहे?

9 / 210

पुढीलपैकी कोणती महाराष्ट्रातील विमुक्त जात नाही?

10 / 210

नवीन भूसंपादन कायदा, 2013 नुसार भारतातील कोणत्या राज्यांमध्ये जमीन अधिग्रहित झालेली आहे? 1. पंजाब 2. केरळ 3. तामिळनाडू 4. ओदिशा

11 / 210

राष्ट्रीय मानव हक्क आयोगाविषयी योग्य विधान निवडा. 1. आयोगाची एकूण सदस्यसंख्या 8 असते. 2. यापैकी चार नियुक्त सदस्य आणि चार पदसिद्ध सदस्य असतात. 3. आयोगाचे विद्यमान अध्यक्ष न्या. एच्. एल्. दत्तू हे आहेत.

12 / 210

विधाने : 1. 1991 साली ‘स्त्री-शक्ती पुरस्कार’ देण्यास सुरुवात झाली. 2. 2007 साली यात ‘राणी रुद्रम्मा’ यांच्या नावाने पुरस्कार दिला जाऊ लागला. 3. पुरस्काराचे वितरण ‘राष्ट्रीय महिला दिनी’ केले जाते.

13 / 210

जिल्हा ग्राहक मंचाबाबत पुढील विधाने वाचा.1. 5 सदस्य असतात.2. स्त्रियांसाठी निश्चित जागांची तरतूद

14 / 210

1. राज्या-राज्यांनुसार अनुसूचित जमातींची यादी बदलू शकते. 2. घटनेमध्ये अनुसूचित जमातींचे निकष दिलेले नाहीत.

15 / 210

1. ‘ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस’ची स्थापना 1920 साली करण्यात आली. 2. ‘भारतीय मजदूर संघा’ची स्थापना 1948 साली करण्यात आली.

16 / 210

मानव विकास अहवालाविषयी (HDR) योग्य विधाने निवडा. 1. हा अहवाल ‘संयुक्त राष्ट्र विकास निधी’ (UNEP) प्रसिद्ध करते. 2. 2015 या वर्षीच्या अहवालाचे शीर्षक ‘मानव विकासासाठी कार्य’ (Work for Human Development) हे होते. 3. 2015 च्या या अहवालानुसार भारताचा मानव विकास निर्देशांक (HDI) 0.609 होता.

17 / 210

हिंदू विवाह कायदा, 1955 खालीलपैकी कोणत्या धार्मिक गटांना लागू पडतो?1. हिंदू 2. बौद्ध 3. जैन 4. शीख5. मुस्लिम

18 / 210

सार्क (SAARC) संघटनेविषयी योग्य विधाने निवडा.1. संघटनेची स्थापना 1985 मध्ये झाली.2. सचिवालयाचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे.3. 2016 या वर्षाची शिखर परिषद पाकिस्तानमध्ये पार पडली.

19 / 210

योग्य पर्याय निवडा. 1. राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना 1992 रोजी झाली. 2. आयोगाच्या विद्यमान अध्यक्षा श्रीमती ललिता कुमारमंगलम् ह्या आहेत.

20 / 210

युवकांमध्ये वैयक्तिक व सामूहिक असंतोष निर्माण होण्यास पुढीलपैकी कोणते घटक कारणीभूत ठरतात?1. दारिद्र्य 2. अपेक्षाभंग3. भ्रष्टाचार 4. वाढती जागरूकता

21 / 210

आसियान (ASEAN) संघटनेबद्दल योग्य विधाने निवडा. 1. सध्या सदस्यसंख्या दहा आहे. 2. मुख्यालय सिंगापूर येथे आहे. 3. युरोपीय संघाप्रमाणे एकच चलनव्यवस्थेचा स्वीकार केला आहे.

22 / 210

अलिप्ततावादी चळवळीविषयी (NAM) योग्य विधाने निवडा. 1. NAM च्या स्थापनेत अमेरिकेचा महत्त्वाचा वाटा होता. 2. शिखर परिषद दर तीन वर्षांनंतर होते. 3. 17 वी शिखर परिषद व्हेनेझुएला येथे सप्टेंबर, 2016 रोजी पार पडली.

23 / 210

1. मागील तीन वर्षांत आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या खेळाडूस अर्जुन पुरस्कार देण्यात येतो. 2. राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मागील वर्षी सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूस दिला जातो. योग्य विधान निवडा.

24 / 210

1. भारतातील आदिवासी लोकसंख्या 10.4 कोटी आहे. 2. 428 जमातींपैकी 11% महाराष्ट्रात आढळतात. अयोग्य विधान निवडा.

25 / 210

‘एकलव्य इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळा’ या 5वी ते 10वी पर्यंतचे शिक्षण पुरवितात. या शाळांना निधीचा पुरवठा कसा असतो?

26 / 210

‘राष्ट्रीय आपत्ती कार्यकारी प्रमुख’ कोण असतात?

27 / 210

युवकांना देशातील सांस्कृतिक वारसा अनुभवता यावा, यासाठी कोण प्रोत्साहन देते?

28 / 210

1. सर्वाधिक आदिवासी लोकसंख्येचा विचार करता मध्य प्रदेशनंतर अनुक्रमे महाराष्ट्र व ओदिशाचा नंबर लागतो. 2. मोठ्या राज्यांचा विचार करता आदिवासी लोकसंख्येची टक्केवारी मध्यप्रदेशपेक्षा छत्तीसगडमध्ये जास्त आहे.

29 / 210

राष्ट्रीय सेवा योजनेची अंमलबजावणी :

30 / 210

राष्ट्रीय युवा महोत्सव कोण आयोजित करते?

31 / 210

अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध करण्यासाठी सर्वसमावेशक योजना?

32 / 210

सर्वप्रथम 1957 मध्ये वृद्धांच्या निवृत्तीवेतनाचा कायदा कोणत्या राज्याने संमत केला?

33 / 210

अयोग्य जोडी ओळखा.

34 / 210

प्रादेशिक संघटनांचा योग्य गट ओळखा.

35 / 210

Upgradation of Merit of ST Student' या योजनेअंतर्गत लाभार्थी गट कोणता?

36 / 210

शिक्षणाच्या अधिकाराला मूलभूत अधिकारांमध्ये समाविष्ट करणारी घटनादुरुस्तीचा योग्य पर्याय निवडा.

37 / 210

‘राष्ट्रीय ग्राहक दिन’ कधी असतो?

38 / 210

‘राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगा’ची स्थापना कधी झाली?

39 / 210

‘हुनर से रोजगार’. 1. सुरुवात : 2009-10 2. केंद्रीय पर्यटन मंत्रालय 3. प्रशिक्षण घेणारी व्यक्ती वयोगट - 18 ते 38. 4. आदरातिथ्य क्षेत्रात कुशल मनुष्यबळाची कमतरता भरून काढण्यासाठी दारिद्र्य रेषेखालील व्यक्तींकरिता योजना. अयोग्य विधान निवडा.

40 / 210

पुढीलपैकी कोणते ‘आंतरराष्ट्रीय महिला वर्ष’ म्हणून घोषित केले होते?

41 / 210

‘संयुक्त राष्ट्र लोकसंख्या विभागा’च्या अंदाजानुसार 2050 साली भारताची किती टक्के लोकसंख्या वृद्धांच्या गटात समाविष्ट असेल?

42 / 210

निर्वासितांच्या विस्थापनाची राजकीय कारणे कोणती? 1. वादळे 2. वंशभेद 3. तत्त्वप्रणाली संबंधी 4. यादवी युद्ध

43 / 210

PCPNDT Act, 1994 (गर्भधारणापूर्वक व प्रसूतीपूर्व निदान तंत्र कायदा, 1994) विषयी योग्य विधान निवडा. 1. या कायद्यान्वये लिंग निवडीसाठी चाचणीवर सरसकट बंदी आहे. 2. 2003 मध्ये या कायद्यात सुधारणा झाली.

44 / 210

ASHA (मान्यताप्राप्त सामाजिक आरोग्य कार्यकर्ती) विषयी पुढील विधाने अभ्यासा. 1. ASHA ची वयोमर्यादा गैरआदिवासी क्षेत्रासाठी 25-45 वर्षे असावी. 2. ASHA ची निवड ग्रामसभेच्या शिफारसींवरून केली जाते. 3. एकूण 25 दिवसांचे प्रशिक्षण पाच टप्प्यांमध्ये घेण्यात येते.

45 / 210

स्त्री-शक्ती पुरस्कारांसंबंधी योग्य पर्याय निवडा. 1. एकूण सहा पुरस्कार दिले जातात. 2. महिला सशक्तीकरण व संबंधित क्षेत्रात असामान्य काम करणाऱ्या फक्त महिलांना पुरस्कार दिला जातो. 3. यातील एका पुरस्काराचे नाव ‘माता जिजाबाई’ आहे.

46 / 210

संयुक्त राष्ट्र संघटनेविषयी योग्य विधाने निवडा. 1. स्थापना 1945 साली झाली. 2. 24 ऑक्टोबर हा ‘संयुक्त राष्ट्र दिन’ असतो. 3. संयुक्त राष्ट्र संघटनेची सदस्यसंख्या सध्या 192 आहे.

47 / 210

संयुक्त राष्ट्र बाल निधी (UNICEF) विषयी योग्य विधाने निवडा. 1. मुख्यालय न्यूयॉर्क येथे आहे. 2. सदस्य देशांत बालविकासासाठी पाच वर्षांचे देशी कार्यक्रम (Country Programmes) चालविते. 3. सन 1965 मध्ये नोबेल पारितोषिक पटकाविले आहे.

48 / 210

योग्य पर्याय निवडा. 1. लिंगगुणोत्तर म्हणजे विशिष्ट प्रदेशातील 1000 पुरुषांमागे त्या प्रदेशातील स्त्रियांची संख्या होय. 2. मानव जातीत 1000:950 हे पुरुष व स्त्रियांमधील प्रमाण इष्टतम आहे. 3. 2011 च्या जनगणनेनुसार देशातील सर्वाधिक लिंगगुणोत्तर केरळमध्ये (1084) आहे.

49 / 210

योग्य पर्याय निवडा. 1. ‘महिलांविरोधातील सर्व विषमतांचे उच्चाटन करार’ (CEDAW) हा 1980 साली संमत झाला. 2. संयुक्त राष्ट्राने (1976-1985) हे ‘महिला दशक’ म्हणून घोषित केले. 3. ‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’ 8 मार्च रोजी असतो.

50 / 210

युरोपियन युनियनबद्दल (EU) योग्य विधाने निवडा. 1. एण चा स्थापना दिवस 9 मे हा मानला जातो. 2. विविधतेत एकता (United in Diversity) हे घोषवाक्य आहे. 3. सध्या पंचवीस सदस्य देश आहेत.

51 / 210

मातृत्व लाभांसंबंधी योग्य तरतुदी निवडा. 1. भारतीय संविधानातील कलम-42 2. मातृत्व लाभासंबंधीचा कायदा, 1971 3. मातृत्व लाभ सुट्ट्यांचा कालावधी (Maternity Leaves) 12 आठवड्यांवरून 26 आठवडे करण्यात आला आहे.

52 / 210

बालमजुरी (प्रतिबंध आणि नियमन) कायदा, 1986 विषयी योग्य विधाने निवडा. 1. या कायद्यांतर्गत 18 घातक व्यवसाय व 65 घातकप्रक्रिया उद्योगांमध्ये बालकांनी काम करण्यास प्रतिबंध आहे. 2. 2015 साली झालेल्या दुरुस्तीनुसार 14 ते 18 वर्षे या नवीन वयोगटाचा समावेश करण्यात आला आहे. 3. शाळेव्यतिरिक्त मोकळ्या वेळेत कौटुंबिक कामे करण्यास मनाई आहे.

53 / 210

एकात्मिक बालविकास योजनेविषयी योग्य पर्याय निवडा. 1. बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी ही योजना 2 ऑक्टोबर, 1976 रोजी सुरू झाली. 2. यामध्ये सहा उपयोजनांचा समावेश होतो. 3. अतिकुपोषित बालकांसाठी 800 कॅलरी व 20-25 ग्रॅम प्रथिनयुक्त पूरक पोषण आहाराची तरतूद आहे.

54 / 210

‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या योजनेविषयी योग्य पर्याय निवडा. 1. ही योजना जानेवारी, 2015 मध्ये सुरू झाली. 2. बाललिंगगुणोत्तर कमी असणाऱ्या मोजक्या शंभर जिल्ह्यांमध्ये योजनेची अंमलबजावणी होते. 3. माधुरी दीक्षित ह्या सध्या या कार्यक्रमाच्या सदिच्छादूत (Brand Ambassador) आहेत.

55 / 210

‘माता-पिता व ज्येष्ठ नागरिक देखभाल व कल्याण अधिनियम’मधील तरतुदी विचारात घ्या. 1. ज्येष्ठ नागरिक म्हणजे 60 वर्षांवरील व्यक्ती. 2. ज्येष्ठ नागरिक किंवा आई-वडील यांची देखभाल न केल्यास दंडात्मक तरतूद आहे.

56 / 210

संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाबद्दल (UNDP) योग्य विधाने निवडा. 1. बोधवाक्य "Empowered Lives, Resilient Nations' हे आहे. 2. मानव विकास अहवाल (HDR) 1995 पासून प्रकाशित करते.

57 / 210

मानवी हक्कांच्या वैश्विक जाहीरनाम्यातील (1948) कलम : योग्य जोड्या जुळवा. i) कलम 3 1) शिक्षणाचा हक्क ii) कलम 7 2) संचार स्वातंत्र्य iii) कलम 13 3) कायद्यासमोर समानता iv) कलम 26 4) जीवित, स्वातंत्र्य आणि सुरक्षिततेचा हक्कi ii iii iv

58 / 210

पुढील विधाने अभ्यासा व योग्य पर्याय निवडा.1. महिला व बालविकास मंत्रालयाची स्थापना 2006 साली झाली.2. त्यापूर्वी ते सामाजिक विकास व सबलीकरण मंत्रालयांतर्गत एक विभाग म्हणून कार्यरत होते.3. श्रीमती स्मृती इराणी ह्या सध्या महिला व बालविकासमंत्री आहेत.

59 / 210

ग्राहक संरक्षण कायदा, 1986 मध्ये आतापर्यंत एकूण किती वेळा दुरुस्ती झाली आहे?

60 / 210

जागतिक महिला परिषदांतील अयोग्य जोडी ओळखा.

61 / 210

मध्यान्न भोजन योजनेबाबत अयोग्य विधान ओळखा.

62 / 210

कोणत्या शास्रज्ञाने मानवी स्वभावाच्या सकारात्मक पैलुवर आधारित 'सेल्फ ॲक्चुअलायझेशन'चा सिद्धांत मांडला?

63 / 210

ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत राज्य आयोगाच्या आदेशाविरुद्ध अपिल ___________ येथे आदेश पारित झाल्यापासून ________________ करता येते.

64 / 210

खालील विधानांचा विचार करून योग्य पर्याय निवडा. (अ) 2011 च्या जनगणनेनुसार भारताच्या शहरी तसेच ग्रामीण भागातील एकूण लिंग गुणोत्तरात 2001 च्या तुलनेत वाढ झालेली आढळते. (ब) बाल लिंग गुणोत्तराचा विचार करता (0 ते 6 वर्षे) 2011 मध्ये भारताच्या शहरी भागात वाढ तर ग्रामीण भागात घट झालेली आढळते. (क) 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील एकूण लिंग गुणोत्तराचा विचार करता ग्रामीण भागात वाढ तर शहरी भागात घट झालेली आढळते.

65 / 210

सप्टेंबर 2019 मध्ये जाहीर झालेल्या 'शालेय शिक्षण गुणवत्ता निर्देशांक' बद्दल (School education quality index) खालील विधानांचा विचार करून योग्य विधान/ने ओळखा. (अ) हा अहवाल मानव संसाधन विकास मंत्रालयाकडून (सध्याचे शिक्षण मंत्रालय) जाहीर केला गेला. (ब) 2019 च्या या अहवालात मोठ्या राज्यांच्या क्रमवारीत महाराष्ट्राने तिसरे स्थान पटकावले. (क) विविध 30 निर्देशकांचा (Parameters) वापर करून हा निर्देशांक काढला जातो.

66 / 210

स्वर्णजयंती शहरी रोजगार योजनेबाबत (SJSRY) खालील विधानांचा विचार करून अचूक विधान/ने ओळखा. (अ) डिसेंबर 1997 मध्ये NRY, UBSP, PMIUPEP या 3 योजनांच्या एकत्रीकरणातून ही योजना सुरू करण्यात आली होती. (ब) या योजनेचा खर्च केंद्रशासन आणि राज्यशासन अनुक्रमे 50% व 50% करणे, अपेक्षित होते.

67 / 210

स्फूर्ती योजना' (SFURTI) खालीलपैकी कशाशी संबंधित आहे?

68 / 210

सर्व शिक्षा अभियानाबाबत खालील विधानांचा विचार करा. (अ) प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकरणासाठी 2000-01 मध्ये हे अभियान सुरू करण्यात आले. (ब) या अभियानासाठी जागतिक बँक तसेच युनिसेफचे सहकार्य मिळाले. (क) या अभियानांतर्गत 2003 पर्यंत सर्व मुलांना शाळेत दाखल करण्याचे तर 2007 पर्यंत सर्व मुलांना 5 वर्षांचे प्राथमिक शालेय शिक्षण देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते.

69 / 210

सरोगसी नियमन विधेयक, 2019' बाबत खालील तरतुदींचा विचार करून योग्य विधान/ने ओळखा. (अ) या विधेयकानुसार केंद्रीय स्तरावर 'राष्ट्रीय सरोगसी मंडळ' तर राज्य स्तरावर 'राज्य सरोगसी मंडळाची' स्थापना करण्यात येईल. (ब) या विधेयकातील तरतुदींनुसार देशातील व्यावसायिक सरोगसीला प्रोत्साहन देण्यात येईल. (क) भारतीय दांपत्याला परोपकारी सरोगसीची परवानगी देण्यात येईल.

70 / 210

महिलांविरोधी हिंसाचार रोखण्यासाठी उपाययोजना विकसित करण्यासाठी ___________ ही संस्था अशासकीय संस्थांसमवेत सेवांची उपलब्धता सुधारण्यासाठी कार्य करीत आहे.

71 / 210

खालील विधानांचा विचार करून योग्य विधान/ने निवडा. (अ) बालकामगारांवर प्रतिबंध करण्यासाठी आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने 1992 मध्ये आंतरराष्ट्रीय कार्यक्रम (IPEC) सुरू केला. (ब) यामध्ये सहभागी होणारा भारत हा पहिला देश होता.

72 / 210

_________________ ला भारतातील शिक्षणाचा मॅग्ना कार्टा म्हणून ओळखले जाते.

73 / 210

विद्यालक्ष्मी' हे वेब पोर्टल खालीलपैकी कोणत्या उद्देशाने सुरू करण्यात आले?

74 / 210

मुले व मुली असा अभ्यासक्रमामध्ये भेद नको व मुलींचे शिक्षण ही एक विशेष समस्या समजली जावी, अशी सूचना सर्वप्रथम ______________ यांच्या अहवालामध्ये करण्यात आलेली होती.

75 / 210

राष्ट्रीय साक्षरता अभियान ___________ या वयोगटातील निरक्षरांना कार्यात्मक साक्षरता देण्यासाठी राबवले जाते.

76 / 210

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेबद्दल (NCERT) खालील विधानांचा विचार करून योग्य विधान/ने निवडा. (अ) केंद्र व राज्य सरकारांना शालेय शिक्षणाशी संबंधित/शैक्षणिक बाबींबद्दल मदत व सल्ला देणारी सर्वोच्च संघटना आहे. (ब) 'ज्ञान-विज्ञान विमुक्तये' हे या परिषदेचे बोधवाक्य आहे. (क) या परिषदेच्या अजमेर, भोपाळ, भुवनेश्वर, म्हैसूर आणि शिलाँग येथे 5 प्रादेशिक शिक्षण संस्था आहेत.

77 / 210

1962 मध्ये युनेस्कोने स्थापन केलेल्या 'शैक्षणिक नियोजनकार व प्रशासकांसाठी आशियाई प्रादेशिक केंद्राचे' खालीलपैकी कोणत्या संस्थेत रुपांतर करण्यात आले आहे?

78 / 210

भारतातील शिक्षणासंबंधातील विविध योजना/सुधारणा व त्यांची सुरू झालेली वर्षे यांच्या जोड्या लावा. (अ) पहिले राष्ट्रीय शिक्षण धोरण (i) 2014 (ब) सर्व शिक्षा अभियान (ii) 2009-10 (क) उन्नत भारत अभियान (iii) 2001 (ड) राष्ट्रीय माध्यमिक शिक्षण अभियान (iv) 1968 (अ) (ब) (क)

79 / 210

राष्ट्रीय वैद्यकीय आयोग कायदा, 2019 बाबत खालीलपैकी अयोग्य विधान कोणते?

80 / 210

राष्ट्रीय लोकसंख्या धोरण, 2000 नुसार 2045 पर्यंत लोकसंख्या स्थिर करण्यासाठी खालीलपैकी कोणती लक्ष्ये निर्धारीत करण्यात आली आहेत? (अ) शिशू मृत्यू दर प्रति हजारामागे 30 पेक्षा कमी करणे. (ब) माता मृत्यू दर प्रति लाखामागे 100 पेक्षा कमी करणे. (क) 80% संस्थात्मक प्रसूती आणि 100% कुशल दायीद्वारे प्रसूतीचे उद्दिष्ट गाठणे.

81 / 210

राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थांबाबत (NITs) खालीलपैकी अयोग्य विधान कोणते?

82 / 210

राष्ट्रीय ज्ञान आयोगाची पाच लक्षणीय क्षेत्रे _______________

83 / 210

राष्ट्रीय ज्ञान आयोगाचे अध्यक्ष ______________ हे होते.

84 / 210

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान (NRHM) बाबत खालीलपैकी अचूक विधाने कोणती? (अ) या अभियानाचा आराखडा व अंमलबजावणीची प्रक्रिया 1978 च्या अल्मा अटा निवेदनामध्ये दिलेल्या प्राथमिक आरोग्य सेवेच्या तत्त्वांनी प्रभावित झाली आहेत. (ब) या अभियानांतर्गत 12व्या पंचवार्षिक योजनेच्या अखेरीस 2017 पर्यंत एकूण जनन दर 2.0 पर्यंत कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. (क) या कार्यक्रमातंर्गत सार्वजनिक आरोग्य सेवांचे व्यवस्थापन आणि पर्यवेक्षण करण्यासाठी पंचायती राज संस्थांना प्रशिक्षण देणे, अपेक्षित आहे.

85 / 210

भारताच्या क्षयरोग निर्मूलन प्रयत्नांबद्दलच्या खालील विधानांपैकी अचूक विधाने कोणती? (अ) 1997 पासून भारतात सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमास सुरुवात झाली. (NTCP) (ब) जानेवारी 2020 मध्ये केंद्र सरकारने या कार्यक्रमाचे नामकरण 'राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम' (NTEP) असे केले. (क) 2030 पर्यंत क्षयरोग निर्मूलन करण्याच्या भारताच्या उद्दिष्टाच्या अनुषंगाने योजनेच्या नावात बदल करण्यात आला आहे.

86 / 210

राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानाचे (RUSA) मुख्य उद्देश कोणते आहेत? (अ) उच्च शिक्षण संस्थांचा दर्जा सुधारणे. (ब) उच्च शैक्षणिक संस्थांचे मूल्यांकन करणे. (क) अभ्यासक्रम आणि परीक्षांमध्ये सुधारणा करणे. (ड) शैक्षणिक संस्थांचा विस्तार उच्च शिक्षणाची सुविधा नसलेल्या प्रदेशात करणे.

87 / 210

राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान (RUSA) बाबत खालीलपैकी अचूक विधाने कोणती? (अ) या अभियानाची सुरुवात 2013 मध्ये झाली. (ब) या योजनेचा उद्देश 11व्या पंचवार्षिक योजनेत उच्चशिक्षणाचा सहभाग दर (GER) 32% पर्यंत वाढवणे. (क) या अभियानात केंद्र-राज्य वाटा 65 : 35 प्रमाणात (नव्या पुनर्रचनेनंतर 60 : 40) ठरवण्यात आला होता.

88 / 210

राष्ट्रीय आरोग्य अहवाल 2019 बाबत खालील विधानांचा विचार करून योग्य विधाने निवडा. (अ) ऑक्टोबर 2019 मध्ये जाहीर झालेला हा अहवाल एकूणामध्ये 14वा अहवाल होता. (ब) हा अहवाल 'सेंट्रल ब्युरो ऑफ हेल्थ इंटेलिजन्स' (CBHI) ही संस्था तयार करते. (क) 2005 सालापासून प्रसिद्ध करण्यात येणारा हा अहवाल दर दोन वर्षांनी तयार करण्यात येतो. (ड) या अहवालानुसार राष्ट्रीय पातळीवर महिलांसाठी विवाहाचे सरासरी वय 22.2 वर्षे होते.

89 / 210

जागतिक मानवी हक्क प्रतिज्ञापत्राच्या कोणत्या अनुच्छेदात प्रत्येकाला सामाजिक सुरक्षा प्राप्त करून घेण्याचा अधिकार आहे, असे म्हटले आहे?

90 / 210

जोड्या लावा. (मानवी हक्काचा जागतिक जाहीरनामा - UDHR) A B (अ) सर्वांना कायद्याचे समान संरक्षण (i) कलम 17 (ब) मतस्वातंत्र्य व भाषणस्वातंत्र्य (ii) कलम 7 (क) नि:पक्ष न्याय मिळवण्याचा अधिकार (iii) कलम 19 (ड) मालमत्ता धारण करण्याचा अधिकार (iv) कलम 10

91 / 210

(अ) 2011 च्या जनगणनेचा विचार करता महाराष्ट्रातील लोकसंख्येच्या दशकीय वाढीचा वेग हा शहरी भागांमध्ये ग्रामीण भागातील वाढीच्या दुपटीपेक्षा अधिक होता. (ब) 2001 ते 2011 या 10 वर्षांच्या काळात महाराष्ट्रातील लोकसंख्येचा वार्षिक वृद्धीदर हा भारताच्या याच 10 वर्षांच्या काळातील वार्षिक वृद्धीदरापेक्षा अधिक होता. वरील विधानांपैकी अयोग्य विधान/ने कोणते/ती?

92 / 210

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेबाबत योग्य विधान/ने ओळखा. (अ) ग्रामीण भागातील अकुशल कामगारांना एका आर्थिक वर्षात किमान 100 दिवस रोजगार उपलब्ध करून देणे, हा मुख्य उद्देश आहे. (ब) संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना (SGRY) व नॅशनल फूड फॉर वर्क प्रोग्रॅम (NFFWP) या दोन योजनांचे एकत्रीकरण करून ही योजना सुरू करण्यात आली. (क) एकूण रोजगार निर्मितीमध्ये स्रियांचा सहभाग 50 टक्के असणे, अनिवार्य आहे.

93 / 210

शिक्षणाचा संबंध उत्पादन क्षमतेशी जोडावा, अशी शिफारस ____________ ने केली.

94 / 210

शिक्षण आयोग (1964-66) या अहवालाचे शीर्षक _______________ हे होते.

95 / 210

भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी देशात 'भारतीय तंत्रज्ञान संस्था' (IITs) या संस्था स्थापन कराव्यात ही संकल्पना सर्वप्रथम मांडणारे व्यक्ती आणि स्वातंत्र्यानंतर अशा संस्था स्थापन करण्यात अग्रेसर भूमिका बजावणारे व्यक्ती अनुक्रमे कोण होते?

96 / 210

भारतातील भूमी/जमीन सुधारणा कार्यक्रमाचे मुख्य दोन हेतू कोणते? (अ) शेती उत्पादन वाढवणे (ब) गामीण विकास (क) सामाजिक न्याय (ड) दारिद्र्य निर्मूलन

97 / 210

2005 मध्ये सुरू झालेल्या भारत निर्माण योजनेत खालीलपैकी कोणत्या मूलभूत सुविधांचा समावेश होतो? (अ) पाणीपुरवठा (ब) स्वच्छता (क) रस्ते (ड) शहरी गृहनिर्माण (इ) विद्युत सेवा (ई) दूरध्वनी

98 / 210

प्रधानमंत्री संसद आदर्श ग्राम, योजनेबाबत अयोग्य विधान कोणते?

99 / 210

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेबाबत अयोग्य विधान कोणते? या योजनेची सुरुवात _____________ करण्यात आली.

100 / 210

(अ) जुलै 2015 मध्ये विविध तीन योजनांच्या एकत्रीकरणातून प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना सुरू करण्यात आली. (ब) या योजनेचे उद्दिष्ट जल वापर कार्यक्षमतेत वाढ करणे तसेच सूक्ष्म सिंचन पद्धतीचा विकास करणे हे होते. वरीलपैकी अयोग्य विधान/ने कोणते/ती

101 / 210

नवीन शैक्षणिक धोरण (2020)' अंतर्गत वेगवेगळ्या संस्थांची स्थापना करण्यात येणार आहे. या संस्थांमध्ये खालीलपैकी कोणत्या संस्थांचा समावेश होतो? (अ) ॲकॅडेमिक बँक ऑफ क्रेडिट (ब) नॅशनल रिसर्च फाउंडेशन (क) भारतीय उच्च शिक्षण आयोग (HECI) (ड) बहुशास्रीय शिक्षण आणि संशोधन विद्यापीठांची स्थापना (MERU)

102 / 210

नवीन शैक्षणिक धोरण 2020 बाबत अचूक विधाने निवडा. (अ) 2020 मध्ये मंजुरी देण्यात आलेले तिसरे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 34 वर्षे जुन्या 1986 च्या शैक्षणिक धोरणाची जागा घेणार आहे. (ब) या धोरणाचा मसुदा डॉ. के. कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय शैक्षणिक धोरण मसुदा समितीने तयार केला. (क) या धोरणानुसार राज्य आणि केंद्राचा शिक्षणावरील सार्वजनिक खर्च जीडीपीच्या 6% पर्यंत वाढवण्यात येईल. (ड) नवीन धोरणानुसार शालेय शिक्षणाचा आकृतीबंध 5+3+3+4 करण्यात येईल.

103 / 210

खालील विधानांचा विचार करा. (अ) तांत्रिक शिक्षण गुणवत्ता वाढ कार्यक्रम (TEQIP) यासाठी युनेस्को निधी पुरवते. (ब) व्यावसायिक शिक्षणामध्ये सध्या सुरू असलेल्या कार्यक्रमांना प्रोत्साहन देणे आणि त्यांच्यातील तंत्रशिक्षणाची गुणवत्ता वाढवणे, हा या कार्यक्रमाचा उद्देश होता. वरील विधानांपैकी अयोग्य विधान/ने ओळखा

104 / 210

जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) व्याख्येनुसार 'आरोग्या'च्या संज्ञेमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होतो? (अ) शारीरिक सुस्थिती (ब) गरीबी (क) रोगाचा अभाव (ड) निरक्षरता (इ) सामाजिक सुस्थिती (ई) मागासलेपणा

105 / 210

जागतिक आरोग्य संघटनेबाबत (WHO) खालीलपैकी अचूक विधाने ओळखा. (अ) ही संयुक्त राष्ट्राची एक विशेषीकृत संस्था असून ती संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक व सामाजिक परिषदेच्या अधीनस्थ कार्य करते. (ब) या संघटनेची स्थापना 1948 मध्ये झाली असून तीचे मुख्यालय जीनिव्हा, स्वित्झर्लंड येथे आहे. (क) सर्व व्यक्तींसाठी आरोग्याचा शक्य तितका उच्चतम स्तर प्राप्त करणे, हे या संघटनेचे उद्दिष्ट आहे.

106 / 210

पुढील विधानांपैकी कोणते विधान अयोग्य आहे? (अ) नवोदय विद्यालयात ग्रामीण भागातील मुलांसाठी 75% आरक्षण असते. (ब) नवोदय विद्यालयात अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींसाठी अनुक्रमे 15% व 7.5 टक्केच आरक्षण असते.

107 / 210

जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमाबाबत खालील विधानांचा विचार करा. (अ) माता मृत्यू व बाल मृत्यू कमी करणे, हा या कार्यक्रमाचा महत्त्वाचा भाग आहे. (ब) हा कार्यक्रम व इतर आनुषांगिक योजना राबवल्यामुळे आरोग्य संस्थांमधील प्रसूतीचे प्रमाण वाढले आहे. (क) केंद्रशासनाच्या सूचनेप्रमाणे माता व बालकांसाठी आवश्यक असणारी औषधे व लागणारे साहित्य यांचा जिल्ह्यांना राज्यस्तरावरून पुरवठा करण्यात येतो. वरीलपैकी अचूक विधाने कोणती?

108 / 210

खडू-फळा मोहीम _________________ अनुसार सुरू करण्यात आली होती.

109 / 210

महाराष्ट्रातील व्यावसायिक शिक्षणाबाबतच्या खालील विधानांचा विचार करून योग्य विधान/ने ओळखा. (अ) महाराष्ट्रात उच्च शिक्षण, तांत्रिक शिक्षण, व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण इ. साठी उच्च व तांत्रिक शिक्षण विभाग प्रशासकीय विभाग म्हणून कार्य करतो. (ब) डिप्लोमा, पोस्ट डिप्लोमा, ॲडव्हान्स डिप्लोमा या तंत्र शिक्षणाचे नियमन, नियंत्रण व पाहणी करण्याचे कार्य महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ करते.

110 / 210

शालेय अभ्यासक्रमामध्ये SUPW चा समावेश खालीलपैकी कोणत्या आयोगाच्या शिफारसींनुसार करण्यात आला होता?

111 / 210

ई-गव्हर्नन्सच्या फायद्यामध्ये खालीलपैकी कोणत्या बाबींचा समावेश होतो? (अ) व्यवहारातील खर्च व वेळ कमी होणे. (ब) नागरिकांना सक्षम करणे व पारदर्शकता वाढवणे. (क) वाढीव कार्यक्षमता व उत्पादकतेकरिता प्रक्रियेचे पुननिर्माण करणे.

112 / 210

खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य अनौपचारिक शिक्षणाकरिता जरुरीचे नाही?

113 / 210

कामगार कल्याणसंबंधित विविध कायदे/योजना व त्यांची वर्षे यांच्या योग्य जोड्या लावा. कामगार कायदे/योजना वर्ष (अ) किमान वेतन अधिनियम (i) 2008 (ब) असंघटित कामगार सामाजिक सुरक्षा (ii) 1965 (क) कामगार पेन्शन योजना (iii) 1948 (ड) बोनस पेमेंट अधिनियम (iv) 1995

114 / 210

भारतातील मानवी हक्क चळवळीबाबत महत्त्वाची असणाऱ्या 'पिपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टिज' संस्थेबाबत अयोग्य विधान कोणते?

115 / 210

खालील विधानांचा विचार करून योग्य विधाने ओळखा. (अ) राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ (NSDC) सार्वजनिक-खासगी भागीदारीतून कार्य करते. (ब) याचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. (क) 2022 पर्यंत 300 दशलक्ष व्यक्तींना प्रशिक्षण देण्यासाठी राष्ट्रीय कौशल्य विकास अभियान, 2015 जुलै 2015 मध्ये सुरू करण्यात आले.

116 / 210

कुपोषणमुक्त भारत अभियानासाठी 8 मार्च 2018 रोजी जागतिक महिला दिनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कोणती योजना सुरू केली?

117 / 210

खालीलपैकी अचूक विधान/ने कोणते/ती? (अ) कृषी व ग्रामीण पतपुरवठ्याबाबत शिखर संस्था आणि पुनर्वित्त संस्था म्हणून नाबार्ड कार्य करते. (ब) नाबार्ड भूविकास बँका, राज्य सहकारी बँका, प्रादेशिक ग्रामीण बँकांना पुनर्वित्तपुरवठा करते. (क) शेतकऱ्यांना आंतरराष्ट्रीय व्यापारसाठी नाबार्ड मदत करते.

118 / 210

ज्या बालकाचे वजन 3SD पेक्षा कमी असेल तर त्याला _____________ म्हणतात.

119 / 210

खालील दिलेल्या विधानांपैकी अयोग्य विधान कोणते?

120 / 210

अखिल भारतीय तांत्रिक शिक्षण परिषदेची स्थापना ______________ च्या शिफारसीनुसार ___________ मध्ये झाली.

121 / 210

जागतिक मानवी तस्करीविरोधी दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो?

122 / 210

2021 साठीच्या घेण्यात येणाऱ्या जनगणनेबाबत खालीलपैकी अचूक विधाने ओळखा. (अ) 2021 ची जनगणना ही एकूणात 16वी तर स्वातंत्र्यानंतरची 8वी जनगणना आहे. (ब) 2021 च्या जनगणनेत पहिल्यांदाच ट्रान्सजेंडर प्रमुख असलेल्या घरांची माहिती गोळा करण्यात येणार आहे. (क) पहिल्यांदाच जनगणना मोबाईल फोन ॲपद्वारा केली जाणार आहे.

123 / 210

मानवी संसाधन नियोजनासाठी खालील टप्प्यांचा क्रम लावा

124 / 210

खालील विधानांचा विचार करून योग्य विधाने निवडा. (अ) महिलांविरोधी भेदभावाच्या सर्व स्वरुपांच्या निर्मूलनाचा करार (CEDAW) जागतिक स्तरावर 1979 साली स्वीकारण्यात आला. (ब) बालहक्कांवरील करार (Convetion on the rights of the Child) 11 डिसेंबर 1989 ला संमत करण्यात आल्याने 11 डिसेंबर हा दिवस 'World Children's Day' म्हणून साजरा केला जातो. (क) भारताने या कराराचा स्वीकार 1992 मध्ये केला.

125 / 210

हेल्प एज इंडिया (HAI) ची स्थापना ______________ मध्ये झाली होती

126 / 210

सूक्ष्मवित्तपुरवठ्याबाबत खालील विधानांचा विचार करा. (अ) सूक्ष्मवित्तपुरवठा म्हणजे गरीब व अल्प उत्पन्न गटांच्या कुटुंबांना वित्तीय सेवा पुरवणे होय. (ब) सूक्ष्मवित्तपुरवठा पुढील गृहितकावर सुरू केला गेला. गरीब लोक कर्जावर कमी व्याजदर देण्यास तयार असतात. वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त?

127 / 210

सार्क (SAARC) संघटनेबाबत पुढीलपैकी कोणते विधान योग्य नाही?

128 / 210

खालील विधानांचा विचार करून योग्य विधाने निवडा. (अ) सामाजिकरण (Socialisation) ही सामाजिक नियंत्रणाचे सात्मीकरणात परिवर्तन वा रुपांतर करणारी एक प्रक्रिया होय. (ब) समाजातील विविध समूहांकडून व्यक्तीचे सामाजिकरण घडवून आणले जाते. त्या समूहांना सामाजिकरणाची माध्यमे, साधने व यंत्रणा असे म्हणतात. (क) कुटुंब, शाळा, महाविद्यालये, समवयस्क मित्रांचे समूह, जनसंपर्क माध्यमे इ. संस्थांकडून व्यक्तीचे सामाजिकरण घडून येते.

129 / 210

खालील विधानांचा विचार करा आणि अयोग्य विधान/ने ओळखा. (अ) 'अस्पृश्यता हा हिंदू समाजाचा गँगरीन ग्रस्त अवयव आहे आणि तो दूर करण्यासाठी उपाययोजना केली नाही तर समाज पंगू होईल', असे महात्मा गांधीजींचे म्हणणे होते. (ब) भारतात अस्पृश्यता निर्मूलनासाठी असलेल्या 'अस्पृश्यता (अपराध) कायदा, 1955' चे नामकरण 1976 मध्ये नागरी अधिकार संरक्षण कायदा असे करण्यात आले

130 / 210

संयुक्त राष्ट्रांच्या सनदेमध्ये (Charter) खालीलपैकी कोणत्या उद्दिष्टाचा समावेश होत नाही?

131 / 210

महाराष्ट्र शासनाच्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेबाबत खालील विधाने विचारात घ्या. (अ) या योजनेंतर्गत निराधार व्यक्तींबरोबर अनाथ मुले, घटस्फोटीत महिला तसेच दुर्धर आजारी रुग्णांचाही समावेश होतो. (ब) या योजनेंतर्गत प्रत्येक लाभार्थी व्यक्तीला मासिक रु. 600 इतके आर्थिक अनुदान दिले जाईल. (क) या योजनेंतर्गत आर्थिक सहाय्य मिळवण्याकरिता कमाल वयोमर्यादा 60 वर्षे इतकी निश्चित करण्यात आली आहे. (ड) एका कुटुंबात एकापेक्षा जास्त लाभार्थी असल्यास त्या कुटुंबास लाभार्थ्यांच्या संख्येच्या प्रमाणात आर्थिक अनुदान दिले जाईल. वरीलपैकी कोणते/ती विधान/ने योग्य आहे/त?

132 / 210

खालील विधानांचा विचार करा आणि अचूक विधान/ने ओळखा. (अ) 'श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना' महाराष्ट्रातील निराधार वृद्ध व्यक्तींना मासिक निवृत्तीवेतन देण्याच्या हेतूने राबवण्यात येते. (ब) या योजनेअंतर्गत 60 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या निराधार व्यक्तींना 600 रु. प्रति महिना दिले जातात. (क) या एकूण रकमेपैकी 400 रु. राज्य सरकार तर 200 रु. केंद्र सरकारकडून दिले जातात.

133 / 210

खालील विधानांचा विचार करून योग्य विधान/ने निवडा. (अ) श्रम ब्युरो (Labour bureau) श्रम आणि रोजगार मंत्रालयांतर्गत कार्यरत असून मुख्यालय मुंबई येथे आहे. (ब) श्रम ब्युरोकडून वार्षिक रोजगारी-बेरोजगारी अहवालाचे संकलन केले जाते. (क) व्यावसायिक प्रशिक्षण क्षेत्रातील धोरणे, मानके व मापदंड ठरवण्याचे कार्य श्रम ब्युरो करते.

134 / 210

'वैद्यकीय गर्भपात कायदा 1971' मध्ये 2020 मध्ये सुधारणा करण्यात येऊन विशेष श्रेणी महिलांसाठी गर्भपाताच्या मुदतीची मर्यादा 20 आठवड्यांवरून ________________ करण्यात आली.

135 / 210

खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा.

136 / 210

खालीलपैकी कोणते हक्क 'अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी (वन हक्क मान्यता) अधिनियम, 2006' अंतर्गत आदिवासींना देण्यात आले आहेत? (अ) व्यावसायिक मर्यादेपर्यंत वनक्षेत्रातील जमिनीची मशागत करण्याचा अधिकार (ब) किरकोळ वनोपज उत्पादनाची मालकी, संकलन, वापर व विल्हेवाट लावण्याचा अधिकार (क) वनक्षेत्राच्या आत राहण्याचा अधिकार (ड) पारंपरिक पशूचराईसारख्या रुढीनिहाय प्रथा सुरू ठेवण्याचा अधिकार

137 / 210

राष्ट्रीय सेवा योजने'बद्दल (NSS) खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत? (अ) विद्यार्थी स्वयंसेवकांना नियमित कार्यक्रम व विशेष शिबिर कार्यक्रम अशी दोन प्रकारची कामे करावी लागतात. (ब) नियमित कार्यक्रमांतर्गत दोन वर्षे मिळून 120 तास काम करावे लागते, ज्यामध्ये ग्रामीण/शहरी झोपडपट्ट्यांमध्ये विकास कामांचा समावेश होतो. (क) विशेष शिबिरांतर्गत 7 दिवसांचे निवासी शिबीर आयोजित केले जाते.

138 / 210

राष्ट्रीय युवा धोरण 2014 बाबत पुढील विधानांचा विचार करा. (अ) या धोरणानुसार युवक म्हणजे 13 ते 35 वर्षे वयोगट होय. (ब) या धोरणानुसार उत्पादक मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी शिक्षण, रोजगार आणि कौशल्य विकास, उद्योजकता हे प्राधान्यक्रम होते. (क) 2014 च्या या धोरणात एकूण 5 उद्दिष्टे व त्यात मिळून 11 प्राधान्यक्रम ठरवण्यात आले होते. वरीलपैकी अचूक विधाने ओळखा.

139 / 210

राष्ट्रीय महिला आयोगाबाबत खालीलपैकी अयोग्य विधान कोणते?

140 / 210

राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम 2014' चा उद्देश काय होता? (अ) किशोरवयीन तरुणांपर्यंत पोहोचणे. (ब) समुदाय पातळीवर समवयस्काद्वारे हस्तक्षेप करणे. (क) सुविधा आधारित सेवामध्ये वाढ करून आधार देणे. (ड) जीवन कौशल्य, सकस आहार, मानसिक आरोग्य, द्रव्य गैरवापर यावर भर

141 / 210

राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाबाबत (NCST) खालीलपैकी अयोग्य विधान कोणते?

142 / 210

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांबाबत खालीलपैकी अयोग्य विधान कोणते?

143 / 210

खालील विधानांचा विचार करून योग्य विधाने ओळखा. (अ) आर्थिक सहकार्य वाढवण्यासाठी 1958 मध्ये युरोपातील 6 राष्ट्रांनी युरोपीयन आर्थिक समुदायाची निर्मिती केली. (ब) या समुदयाच्या संरचनेत कालांतराने बदल होत 1993 मध्ये मास्ट्रिच कराराद्वारे युरोपियन युनियनची स्थापना झाली. (क) सध्या या संघामध्ये 27 सदस्य राष्ट्रे आहेत.

144 / 210

संयुक्त राष्ट्रांची मानवी हक्क परिषद बाबत खालील विधानांचा विचार करून योग्य पर्याय निवडा. (अ) ही परिषद आधीच्या संयुक्त राष्ट्र मानवी हक्क आयोगाच्या जागेवर स्थापन करण्यात आली आहे. (ब) या परिषदेवर एखाद्या देशाची एका वेळेस कमाल 2 वर्षांसाठी निवड केली जाते. (क) ही परिषद Office of the High Commissioner for Human Rights (OHCHR) बरोबर कार्य करते.

145 / 210

मानवी हक्क संरक्षण कायदा, 1993 मध्ये 2019 साली दुरुस्ती करण्यात आली. या नव्या दुरुस्तीमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होतो? (अ) राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष हे सर्वोच्च न्यायालयातील माजी सरन्यायाधीश किंवा इतर न्यायाधीश असू शकतील. (ब) राज्य मानवी हक्क आयोगातील सदस्य संख्या 5 वरून 3 करण्यात आली. (क) राष्ट्रीय तसेच राज्य आयोगाच्या अध्यक्ष व सदस्यांचा कार्यकाल 5 वर्षावरून 3 वर्षांपर्यंत कमी करण्यात आला आहे.

146 / 210

मानव संसाधन विकास संज्ञेमध्ये खालीलपैकी कोणत्या बाबींचा समावेश होतो? (अ) विविध कौशल्यांचा विकास करणे. (ब) व्यक्तीला कार्यक्षम बनविणे. (क) व्यक्तीच्या वर्तणुकीमध्ये बदल घडवून आणणे. (ड) व्यक्तीचा सामाजिक -आर्थिक दर्जा उंचावणे. वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?

147 / 210

मानव विकास अहवाल 2020 बाबत खालील विधानांचा विचार करून योग्य पर्याय निवडा. (अ) यामध्ये 2019 साठीचे मानव विकास निर्देशांक दिले असून या अहवालाचा विषय 'The next frontier : Human development and the Anthropocene' आहे. (ब) 2018 च्या तुलनेत 2019 मध्ये भारताच्या मानव विकास निर्देशांकात वाढ झाली आहे. (क) या अहवालानुसार नॉर्वे, आयर्लंड, स्वित्झर्लंड हे देश मानव विकास निर्देशांकात आघाडीवर आहेत.

148 / 210

'माता-पिता व ज्येष्ठ नागरिक देखभाल व कल्याण कायदा, 2007' बाबत खालील विधानांचा विचार करा. (अ) या कायद्यातील तरतुदींनुसार ज्येष्ठ नागरिकांमध्ये 60 वर्षे व त्यापेक्षा अधिक वयाच्या व्यक्तींचा समावेश होतो. (ब) या कायद्यानुसार माता-पिता व ज्येष्ठ नागरिकांची मुलांनी/नातेवाईकांनी देखभाल करणे अनिवार्य व न्यायाधीकरणाद्वारे न्यायप्रविष्ट करण्यात आले आहे. (क) ज्येष्ठ नागरिकांचा परित्याग केल्यास दंडात्मक तरतूदही या कायद्यामध्ये करण्यात आली आहे. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?

149 / 210

महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन याबाबतच्या कायद्यांसंदर्भात खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे?

150 / 210

खालील विधानांचा विचार करून योग्य पर्याय निवडा. (अ) भारतीय पुनर्वसन परिषद कायदा 1992 अन्वये भारतीय पुनर्वसन परिषदेची स्थापना 1992 मध्ये नोंदणीकृत संस्था म्हणून करण्यात आली. (ब) ही परिषद पुनर्वसन व्यावसायिकांना प्रशिक्षण, प्रमाणित, देखरेख करण्याचे व पुनर्वसनासंबंधित विविध संस्थांना मान्यता देण्याचे काम करते.

151 / 210

1901 नंतर भारताच्या लोकसंख्या वाढीचा अभ्यास करता कालखंड व लोकसंख्या वाढीचे टप्पे यांच्या योग्य जोड्या लावा. कालखंड लोकसंख्या वाढ (अ) 1901 ते 1921 (i) वेगवान व उच्च वाढ (ब) 1921 ते 1951 (ii) अतिवाढीची भिती घालवली (क) 1951 ते 1981 (iii) लोकसंख्येची मंद वाढ (ड) 1981 ते 2001 (iv) लोकसंख्येची स्थिर वाढ

152 / 210

खालील विधानांचा विचार करून योग्य विधाने ओळखा.

153 / 210

बाल कामगार (प्रतिबंध आणि नियमन) अधिनियम, 2016 बाबत खालीलपैकी अयोग्य विधान कोणते?

154 / 210

प्रधानमंत्री श्रम पुरस्कारांबाबत खालीलपैकी योग्य विधान/ने निवडा. (अ) या पुरस्कारांची सुरुवात 1985 मध्ये झाली होती. (ब) केवळ सार्वजनिक क्षेत्रातील कामगारांना हे पुरस्कार दिले जातात. (क) 500 किंवा अधिक संख्येने काम करणाऱ्या कारखान्यातील कामगारांना हे पुरस्कार दिले जातात.

155 / 210

खाली दिलेल्या विधानांपैकी अचूक विधाने कोणती? (अ) सृजनात्मकता, शौर्य, सामाजिक सेवा, कला व संस्कृती या क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या बालकांना बाल शक्ती पुरस्कार देण्यात येतो. (ब) बालकांसाठी उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना बाल कल्याण पुरस्कार देण्यात येतो. (क) केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयातर्फे हे पुरस्कार देण्यात येतात.

156 / 210

शासनाने आदिवासी कल्याणाच्या योजना राबवण्यात एकसूत्रता आणि प्रभावीपणा आणण्यासाठी नवसंजीवनी योजना अंमलात आणली. नवसंजीवनी योजनेअंतर्गत खालीलपैकी कोणत्या आरोग्यविषयक सेवा दिल्या जातात? (अ) मातृत्व अनुदान योजना (ब) दाई बैठक योजना (क) पाणी नमुना तपासणी (ड) पावसाळ्यापूर्वीच्या उपाय योजना

157 / 210

ग्राहक संरक्षण कायदा, 2019 नुसार दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींकरीता CCPA द्वारे निर्माता व जाहिरातींना समर्थन देणाऱ्यास कोणती शिक्षा होते?

158 / 210

थॉमस माल्थसचे लोकसंख्येच्या संदर्भातील कोणते/कोणती विधान/ने सत्य आहे/आहेत? (अ) लोकसंख्या गणितीय श्रेणीने वाढते. (ब) अन्नधान्य भूमितीय श्रेणीने वाढते. (क) जेव्हा लोकसंख्या वाढते तेव्हा निसर्ग नैसर्गिक आपत्तीद्वारे लोकसंख्या कमी करण्याचा प्रयत्न करतो

159 / 210

टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस' ने केलेल्या पाहणीनुसार वृद्धांना जास्तीत जास्त भेडसावणाऱ्या समस्या कोणत्या आहेत? (अ) आर्थिक समस्या (ब) आरोग्य व वैद्यकीय समस्या (क) वेळ कसा घालवावा (ड) एकटेपणा

160 / 210

ग्राहक संरक्षण कायदा, 2019 बाबत पुढील विधानांचा विचार करा आणि योग्य विधान/ने ओळखा. (अ) 2019 चा कायदा ग्राहक संरक्षण कायदा 1986 ची जागा घेणार आहे. (ब) या कायद्यानुसार केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाला 2 वर्षे ते 5 वर्षापर्यंतची शिक्षा तसेच 50 लाख रुपयांपर्यंत दंड करण्याचा अधिकार आहे. (क) या कायद्यानुसार ज्या जिल्ह्यात वस्तू खरेदी केली त्याच जिल्ह्यात तक्रार द्यावी लागते.